नवीन लेखन...
सुभाष नाईक
About सुभाष नाईक
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

स्वातंत्र्यदिन-गीत – (२) : सुंबरान मांडलं ऽ

स्वातंत्र्याच्या वाढदिवशीं सुंबरान मांडलं ऽ आजपुरतं आनंदाला आवतान धाडलं ऽ ।। रोज-रोज रडन्याचा कट्टाळा आला रं येका दिवसापुरतं दु:ख खोलखोल गाडलं ऽ ।। आयतं मिळालं म्हनुन, किंमत न्हाई रं त्याची ठाऊक हाये कां रं, रगत किती सांडलं ऽ ? धर्माच्या कुर्‍हाडीनं आईचं तुकडं कां ? सांग की रं, कशासाठी भाऊ-भाऊ भांडलं ऽ ? जातपात अन् जमात, […]

स्वातंत्र्यदिन-गीत – (१) : पुढे काय ?

स्वातंत्र्य मिळालें, पुढें काय ? चालेल पुढें हें मढें काय ? स्वातंत्र्यासाठी फुकटच लाखों पडले अम्हि-तुम्हि घेतले धडे काय ? सत्तर वर्षें स्वातंत्र्याला होतिल रे गाजण्यांयोग्य पण घडे काय ? सांडलें रक्त हें खरेंच आहे, परी अविरत त्याचे चौघडे काय ! राज्यावर शिवबांच्या बाजिराव-दुसरा ! मग राज्य बुडालें, अडे काय ? जो खाली, तो तर खाली-खाली […]

पारशांची नवीन शव-व्यवस्था

बातमी : पारसी समाजात आतां दहनसंस्कार संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. २५.०६.२०१६. • कांहीं पारसी ग्रूपस्.नी वरळीला तयार केलेल्या नवीन शवव्यवस्थेद्दलची बातमी, कांहीं दिवसांपूर्वी वाचनात आली. त्यांनी आतां शव-दहनासाठी इलेक्ट्रिक-क्रेमरटोरियम स्थापलें आहे. • मी यावर धार्मिक दृष्टीकोनातून कांहींही भाष्य करत नाहींये, कारण प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. मी एक प्रकारें सामाजिक दृष्टिकोनातून या गोष्टीकडे पहात आहे. […]

टिप्पणी – ८ : ‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर’

बातमी : ‘संगम’ सिनेमातील गीत , ‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर’ संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, लोकरंग पुरवणी, दि. ०७.०८.१६ मधील, ‘पडसाद’. • वर उल्लेखलेल्या ‘पडसाद’ मध्ये वसंत खेडेकर यांची, ‘आधी कोंबडी की .. ?’ या शीर्षकाची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यात उल्लेखलेल्या , ‘संगम’ सिनेमातील गीतावर ही टिप्पणी. • पुढे जाण्यापूर्वी एक लहानशी चूक आपण सुधारूया. खेडेकर […]

कॅन्सर न्यूज – कॅन्सर व कॅनबीज् : मराठी-१६०८१३

बातमी : कॅनबीज् (Cannabies) संदर्भ : CNN, USA वरील १२ ऑगस्ट २०१६ ची बातमी. • बातमी अशी आहे – ‘Canada allows patients to grow own canabies’. • तुम्ही स्वत: कॅन्सर पेशंट अथवा केअर-गिव्हर असल्याशिवाय, आणि त्याचबरोबर तुम्हाला Alternate medicine बद्दल कांहीं माहिती असल्याशिवाय, या बातमीचें महत्व ध्यानात येणार नाहीं. • ( आणखीही कांहीं व्याधींसाठी कॅनबीज् चा […]

तुझी आठवण जागी : ( स्मृतिकाव्य )

तूं गेलिस, मी उरलो मागे सखा तुझा अनुरागी जोवर मी, तोंवर राहीलच तुझी आठवण जागी ।। रात्र पसरतां, भवतालीं निद्रिस्त सर्व दुनिया मीच फक्त असतो जागा अन् तुझी आठवण जागी ।। चुकुनी आली झोप कधी मज, तरि मी निजूं कसा ? ठेवायची असे दिनरातीं तुझी आठवण जागी।। भाग्य झोपलें माझें, कायमचीच झोपलिस तूं मी कायम झोपेतों, […]

नाग नाग

नाग हा जमिनीखाली रहातो. गुप्त खजिन्यावर पहारा देतो. कुणी पुढे ठाकलं, तर फत्कारतो; कधी चावतोही. लोक त्याला भितात, त्याची पूजा करतात नागपंचमीला. हा नाग जमिनीवर रहातो. गुप्त खजिन्यावर पहारा देतो. कुणी पुढे ठाकलं, तर फूत्कारतो; कधी चावतोही. लोक त्याला भितात. त्याची पूजा करतात काल-आज-उद्या, कायमच. किमानपक्षीं, निवडणुकीनंतर पांच वर्षं तरी. — सुभाष स. नाईक. Subhash S. […]

गणपति : विज्ञानयुगीन उकल : गणपतीचे विविध अवतार

पुराणवाङ्मयात गणेशाच्या अवतारांचा उल्लेख आहे. पुराणें वेदांहून खूपच अर्वाचीन आहेत हें खरें. (पुराणाचा काळ आहे, इ.स. च्या पहिल्या सहस्रखातीक पहिली काही शतकें). परंतु, आधी म्हटल्याप्रमाणें, एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, कालप्रवाहात जनसमूहांमधे अनेक प्रकारची माहिती व ज्ञान पिढ्यान् पिढ्या मौखिक स्वरूपात चालत येते, व नंतरच त्याचा लिखित साहित्यात समावेश होतो. त्यामुळे, हें गृहीत […]

स्मृतिकाव्य : तूं अजुन-जगीं-असण्याचा दिनरात भास होतो

संभ्रम तुझ्या हंसण्याचा नित काळजास होतो तूं अजुन-जगीं-असण्याचा दिनरात भास होतो ।। १ हलकीशी झुळूक गंधित अंगावरून जाई कुठुनी हा सोनचाफा उधळत सुगंध राही ? स्मृतिचा, मनात माझ्या अविरत सुवास होतो ।। २ मज कोण बोलवी हें , कां नेत्र ओलवी हे ? कंठात हुंदका कां दाटुन उगीच राहे ? संसर्ग विकलतेचा, आहत-मनास होतो ।। ३ […]

टिप्पणी : ७ : ये कहाँ जा रहे हम ?

बातम्या : * दलितांवरील अत्याचार * स्त्रियांवरील अत्याचार * स्त्रियांचे समाजातील unequal स्थान संदर्भ : वृत्तपत्रें व इलेक्ट्रॉनिक मीडियांमधील विविध बातम्या . • सामाजिक असमानतेच्या व अत्याचारांच्या विविध बातम्या वाचल्या-ऐकल्यानंतर , खरंच आपण २१व्या शतकात आहोत कां, असा मनाला प्रश्न पडतो. कुठे दलितांवर अत्याचार होताहेत, तर कुठे स्त्रियांवर ; तर अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला जातोय. […]

1 21 22 23 24 25 30
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..