जागतिक वसुंधरा दिवस
आपल्या पिलांना मोकळा श्वानस घेत बागडण्यासाठी ‘स्पेस’ आणि उडण्यास ‘आकाश’ देण्यासाठी सुजाण प्रयत्न केवळ आपल्याच हातात आहेत. तंत्रज्ञानाचा वापर ‘ग्राउंड टु स्मार्ट अर्थ’ असा करीत सुंदर, सुव्यवस्थापित आणि सुसज्ज वसुंधरेचे ‘खरेखुरे स्वप्न’ पाहण्याची संधी भावी पिढीला केवळ आपणच उपलब्ध करून देऊ शकतो. मला काय करायचे, यापेक्षा ‘मी काय करू शकतो’ ही आपली भूमिकाच खरंतर आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, अशी ‘सेल्फ आयडेंटिटी’ (स्वतःची ओळख) निर्माण करते. […]
