राष्ट्रीय पंचायती दिवस
लोकशाहीची सत्ता विकेंद्रीकरणाचा घटक लोकशाहीच्या विकेंद्रीकरणातील महत्त्वाचा घटक म्हणून महात्मा गांधींनी पंचायती राज व्यवस्थेची संकल्पना मांडली होती. सूक्ष्म नियोजनातून अगदी दुर्गम भागातही उत्तम शासन देण्याचा हा पर्याय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रूपाने १९५८ मध्ये स्वीकारण्यात आला. राजस्थान राज्याने सर्वप्रथम ही व्यवस्था स्वीकारली. त्यापाठोपाठ महाराष्ट्रानेही ही व्यवस्था अंगीकारत त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था निर्माण केली. […]
