वाचस्पती अरविंद मंगरूळकर
मंगरूळकर यांची व्याकरणातील तलस्पर्शी दृष्टी ‘मराठी व्याकरणाचा पुनर्विचार’ या ग्रंथात, तर वाङ्मयाची सूक्ष्म आणि साक्षेपी जाण, ‘मम्मटाचा काव्यप्रकाश’ (सहलेखक अर्जुनवाडकर) आणि ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथात व्यक्त झाली आहे. त्यांना सर्वच ललितकलांविषयी जिव्हाळा होता. त्यांची संगीतातील व्यासंगी-जाणकारी त्यांच्या ‘नादातील पाउले’ या पुस्तकातील विविध लेखांत प्रकट झाली आहे. अरविंद मंगरूळकर हे “कालिदासाचे मेघदूत”, “नीतिशतक” , “मराठी घटना रचना आणि परंपरा” अशा अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे संपादक देखील होते. […]
