गणपतराव जोशी
शेक्सपिअरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका अजोडपणे वठवणारे गणपतराव जोशी. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८६७ रोजी रत्नागिरी, राजापूर येथे झाला. गणपतराव जोशी हे मराठी रंगभूमीवरील एक असामान्य नट. त्यांनी शाहूनगरवासी नाटक मंडळीची स्थापना १८८१ साली केली. तेव्हापासून ती मराठी रंगभूमीच्या गद्य शाखेतील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली. शेक्सपिअरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका अजोडपणे वठवून गणपतरावांनी अतिशय लोकप्रियता संपादन केली. […]
