नवीन लेखन...

मराठी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक मकरंद देशपांडे

डोक्यावर भरपूर वाढलेले अस्ताव्यस्त केस, शिडशिडीत अंगकाटी असलेला मकरंद देशपांडे म्हणजे अभिनयाचा बंदा रूपाया. त्यांचा जन्म ६ मार्च १९६६ रोजी रत्नागिरी येथे झाला.‘दगडी चाळ’ आणि ‘स्वदेश’, ‘सत्या’ ‘कयामत से कयामत तक’ या हिंदी सिनेमांसह अनेक मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेते मकरंद देशपांडे यांचे दिग्दर्शन हे वेगळे असते. त्याचसोबत लूक, व हेअर स्टाईल यामुळेही त्यांची एक वेगळी ओळख आहे. मकरंद देशपांडे याच्या भूमिका असलेले चित्रपट रिस्क, डरना जरूरी है, हनन, एक से बढकर एक, स्वदेश, चमेली, विस्फोट, मकडी, लाल सलाम, रोड, प्यार दिवाना होता है, जंगल, घात, सरफरोश, सत्या, उडान, नाजायज, अंत, तडीपार, पहला नशा, सर इत्यादी. त्यांचा ‘दगडी चाळ’ हा चित्रपटात नुकताच येवून गेला. यात त्यांनी साकारलेली अरूण गवळीशी साधर्म्य दाखवणारी भूमिका चांगलीच गाजली आहे. त्यातला ‘चुकीला माफी नाही’, हा डायलॉग तर फारच प्रसिद्ध झाला आहे. आत्ता पर्यत ४० चित्रपट व नाटके त्यांनी केली आहेत. त्यांनी ५ पेक्षा अधिक चित्रपटासाठी दिग्दर्शक केले आहे. मकरंद देशपांडे यांनी कन्नड चित्रपटातही काम केले आहे. ‘दंडूपाल्या’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये त्यांची खलनायकाची भूमिका आहे. मकरंद देशपांडे यांनी अनेक नाटके लिहिली आहेत. त्यांची अंश नावाची थिएटर कंपनी आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..