नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ख्यातनाम मराठी लोकशाहीर अमर शेख

मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९१६ रोजी झाला. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही […]

हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री, कवयित्री लीना चंदावरकर

लीना चंदावरकर यांचे वडील आर्मी ऑफिसर होते. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९५० रोजी धारवाड येथे झाला. सुरुवातीला जाहिरातीत काम केल्यावर मा. सुनील दत्त यांनी लीना चंदावरकर यांना पहिला ब्रेक दिला. तो चित्रपट होता मन की मित, १९६९ ते १९७९ या काळात त्यांनी अनेक चित्रपटात कामे केली. पण मेहबुब की मेहंदी या चित्रपटाने त्यांना नाव कमावून दिले. सिद्धार्थ […]

क्रीडा दिन

आज २९ ऑगस्ट हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस त्यामुळेच देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेले या महान हॉकीपटूचा जन्म दिवस आपल्या देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप होता. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलहाबाद येथे झाला. भारतीय हॉकीतील नव्हे तर […]

मराठी लेखक आणि चित्रकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे ग.दि. माडगूळकर यांचे हे धाकटे बंधू. त्यांचा जन्म ६ जुलै १९२७ रोजी झाला. व्यंकटेश माडगूळकर हे आकाशवाणीवर नोकरीत होते. आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी ‘माणदेशी माणसे’ (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे […]

संगीतकार राम कदम

मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले त्यात राम कदम यांचे स्थान वरचे आहे. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९१६ रोजी मिरज येथे झाला. राम कदम यांच्या घरात कलेचं काहीही वातावरण नव्हतं, परिस्थिती यथातथाच, शाळेतील अभ्यासातही लक्ष नव्हते. त्यांना लहानपणापासून वाद्यांबाबत फार आकर्षण होतं यामुळे राम कदम यांच लक्ष कायम बॅंन्डपथकाकडे जायचं. इथेच […]

ज्येष्ठ सतारवादक विलायत खाँ

विलायत खाँ यांचे घराणे मूळचे रजपूत, पण पुढे मुस्लिम धर्म स्वीकारलेले. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. घराण्यात सूरबहार आणि सतारवादनाची पिढ्यानपिढ्यांची परंपराच होती. त्यांचे वडील उस्ताद इनायत खाँ हे त्या काळचे इटावा किंवा इमदादखानी घराण्याचे आघाडीचे सूरबहार आणि सतारवादक होते काका वाहिद खाँ यांच्याकडे त्यांचे सूरबहार आणि सतारीचे शिक्षण सुरू झाले. आई बशीरन बेगम यांचे माहेरचे घराणे […]

मराठी चित्रपटांतील अभिनेत्री मनोरमा वागळे

मनोरमा वागळे यांनी अभिनय शिकावा, संगीत विषयात प्राविण्य मिळवावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे शाळा-महाविद्यालयातून अनेक दर्जेदार नाटकांमधून त्यांनी अनेक भूमिका केल्या. त्यासोबतच गोवा हिंदू असोसिएशन मुळे मास्टर दत्ताराम यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. गोविंदराव अग्नी, बी.आर देवधर, पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांसारख्या दिग्गज मंडळींकडून संगीत आणि गायनाचं शिक्षण त्यांनी घेतलं, तर ज्येष्ठ पार्श्वगायक आर.एन. पराडकरांकडून सुगम आणि […]

महान पार्श्वगायक मुकेश

मुकेश यांचे संपूर्ण नाव मुकेश चंद माथुर. त्यांचा जन्म २२ जुलै १९२३ रोजी झाला. १९४१ साली ‘निर्दोष’ या चित्रपटाद्वारे अभिनेता-गायक म्हणून या क्षेत्रात पदार्पण केलेल्या मा. मुकेश यांनी खऱ्या अर्थाने पार्श्वगायनाला सुरुवात केली ती १९४५ पासून ‘पहली नजर’ या चित्रपटातील ‘दिल जलता है..’ ह्या गाण्यापासून. हे लोकांना खुप आवडले आणी मुकेश रातोरात स्टार झाले त्यानंतर त्यांनी कधी […]

पन्नास वर्षांहून अधिक काळ अस्सल भारतीय मातीचा सुगंध आपल्या चित्रपटांना देणारे दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी

हृषिकेश मुखर्जी… भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्म ३० सप्टेंबर १९२२ रोजी झाला. दिग्गज दिग्दर्शक बिमल रॉय यांचे शिष्य आणि ‘आनंद’, ‘अभिमान’, ‘गोलमाल’, ‘बावर्ची’, ‘खुबसुरत’ अशा उत्तमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून आणि चंदेरी दुनियेतल्या झगमगाटात प्रदीर्घ काळ राहूनही साधेपणा जपणारे प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हिंसाचार किंवा लैंगिकतेला त्यांनी आपल्या चित्रपटांत कधीही स्थान दिले नाही. किंबहुना […]

चित्रपट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य

बासू भट्टाचार्य यांनी दिग्दर्शक म्हणून ‘तिसरी कसम’ मधून आपला वेगळा ठसा उमटवला. ‘तिसरी कसम’ला १९६६ मध्ये उत्कृष्ट चित्रपटाचं राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालं. पुढे १९७० आणि १९८० च्या दशकांत त्यांनी समांतर चित्रपट चळवळीत अनुभव आविष्कार आणि गृहप्रवेश असे काही चांगले चित्रपट दिले; मात्र ‘तिसरी कसम’ची सर त्यांना आली नाही. बासू भट्टाचार्यांचा ’अनुभव’ हा आधुनिक भारतीय समाजव्यवस्थेमधे पारंपरिक लग्न […]

1 319 320 321 322 323 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..