नवीन लेखन...

महान पार्श्वगायक मुकेश

मुकेश यांचे संपूर्ण नाव मुकेश चंद माथुर. त्यांचा जन्म २२ जुलै १९२३ रोजी झाला. १९४१ साली ‘निर्दोष’ या चित्रपटाद्वारे अभिनेता-गायक म्हणून या क्षेत्रात पदार्पण केलेल्या मा. मुकेश यांनी खऱ्या अर्थाने पार्श्वगायनाला सुरुवात केली ती १९४५ पासून ‘पहली नजर’ या चित्रपटातील ‘दिल जलता है..’ ह्या गाण्यापासून. हे लोकांना खुप आवडले आणी मुकेश रातोरात स्टार झाले त्यानंतर त्यांनी कधी मागे वळुन पाहिले नाही. त्यांच्या आयुष्यातील एक टर्नींग पॉइंट म्हणजे त्यांची राज कपूर यांच्याशी झालेली भेट. आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट अशा बोटावर मोजता येणार्याद गायकांमध्ये मुकेश यांचा क्रम वरचा आहे. त्यांची गाणी आजही आवडीने ऐकली जातात, गुणगुणली जातात.

आवारा, श्री ४२० चित्रपटातील गाण्यांचा जगभर बोलबाला झाला. आजही परदेशी लोक ‘आवारा हूँ’ असे म्हणून अभिवादन करतात. मुकेश यांच्या आवाजात दु:ख व्यक्त करण्याचा नैसर्गिक असा, त्यावर फुंकर घालण्याचा, गाण्यातून दु:ख विसरण्याचा भाव आहे. त्याला तोड नाही. जवळपास सर्व संगीतकारांनी, अभिनेत्यांनी त्यांचा आवाज वापरला होता. दिलीपकुमार, देवआनंद यांनीही सुरुवातीला त्यांचा आवाज घेतला आहे. ‘आग’मध्ये राज कपूर यांच्यासाठी मुकेश यांनी प्रथम पार्श्वगायन केले. येथूनच मग राज कपूर-मुकेश हे समीकरण जुळले आणि उदयास आली अवीट गोडीची श्रवणीय गाणी ! आग, आवारा, श्री 420, बरसात, परवरिश, अनाडी, संगम ते मेरा नाम जोकर असे मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांनील नटलेले ‘आरके’ कॅम्पमधले चित्रपट म्हणजे कानसेनांना मेजवानीच होती. प्रख्यात गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी सांगितले आहे की, उर्दूचे निर्दोष उच्चारण मुकेश यांच्याएवढे दुसरे कोणाचेही नाही.

‘संगीतसम्राट तानसेन’ शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट असूनदेखील ‘झुमती चली हवा’ हे गाणे मुकेश यांना दिल्याबद्दल संगीतकार एस. एन. त्रिपाठी यांना विचारले असता त्यांनी सांगितले होते की, या गाण्यातील भावना समर्थपणे व्यक्त करणारा दुसरा कोणीही गायक नाही. हिंडोल रागातील हे नितांतसुंदर गीत आहे. मन्ना डे एकदा बोलताना म्हणाले होते की, मुकेश यांच्या गाण्यातील सहजता आम्हा कोणातही नाही. त्यांना सूर व भाव अतिशय लवकर पकडता येतात. निर्माता म्हणून त्यांनी मल्हार, आक्रमण या सिनेमांची निर्मिती केली. त्यांनी दुख-सुख, आदाब अर्ज, माशूका, आह, आक्रमण, दुल्हन यांसारख्या सिनेमातून अभिनेता म्हणून कामही केले.पण ते या अभिनेता म्हणून काही विशेष चमक दाखवू शकले नाही. त्यानी अभिनायासाठी काही काळ गायन ही बाजूला ठेवले होते पण योग्य वेळीच ते सावरले आणि पुन्हा गायनावर लक्ष केन्द्रित केले. त्यांनी आपल्या तीन दशकाच्या कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त चित्रपटात पार्श्वगायन केले. त्यांना चार वेळा फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ पा‌र्श्वगायक हा पुरस्कार मिळाला. १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीगंधा मधील गाणे ‘कई बार यू हीं देखा…’ साठी मुकेश यांना राष्ट्रिय पुरस्कार मिळाला.

मुकेश यांचे २७ ऑगस्ट १९७६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

मुकेश यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=Ks0k3YQRu90

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on महान पार्श्वगायक मुकेश

  1. best I have completed diploma in hotel mgt married is catering business is any opportunity staying at katraj

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..