नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

सिने अभिनेत्री, निर्माती जूही चावला

जूही चावला १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. […]

नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर

नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. त्यांची पटकथा असलेले एकाहून एक दर्जेदार चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. एका मागोमाग एक असे त्यांचे ७५ पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपटाबरोबर प्रेक्षकांची आवड ओळखून त्यांनी विपूल नाट्यलेखन केले. […]

ज्येष्ठ गायिका श्यामा चित्तार

‘ओम जय जगदीश हरे’ सारखे अजरामर गीत गाणाऱ्या ज्येष्ठ गायिका श्यामा चित्तार यांचा ‘अनाग्रही स्वरमुग्धा’ असा त्यांचा उल्लेख केला जायचा. आपले काम नेटाने करायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा ही वृत्ती त्यांनी आयुष्यभर जोपासली. श्यामा चित्तार यांनी मोजकीच पण लक्षात राहणारी गाणी गायली. […]

दक्षिणेचे सुपरस्टार कमल हासन

दक्षिणेचे सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेले कमल हासन यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी `कलतूर कन्नम्मा’ या तमिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये त्यांनी ‘एक दुजे के लिए’ या सिनेमाद्वारे पदार्पण केले होते. कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. […]

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी

बाहुबली चित्रपटात देवसेनाची भूमिका करणारी अनुष्का ही रियल लाइफमध्ये मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनुष्का शेट्टी हे साऊथ सिने इंडस्ट्रीतील एक मोठं नाव असून तिकडे ती टॉपची हिरोईन आहे. इतकेच नाहीतर सिनेमासाठी पैसे घेण्याबाबतीतही ती साऊथमधील सर्व अभिनेत्रांच्या कितीतरी पुढे आहे. […]

मराठी व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले

“शास्त्रीय मराठी व्याकरण‘ हा सुमारे एक हजार पृष्ठांचा ग्रंथ मोरो केशव दामले यांनी लिहिला. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांस आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हटले गेले. […]

जेष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर

`भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी’ हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले. […]

ख्यातनाम लेखिका सरोजिनी शारंगपाणी

“आहुती’, “गुन्हेगारी आणि शासन’, “गुन्हेगारांचे जग’, “पुरुषप्रधान संस्कृती’, “दुर्दैवाशी दोन हात’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे चिरंजीव श्रीनिवास शारंगपाणी यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी…   […]

रंगभूमीवरचा नटसम्राट डॉ.श्रीराम लागू

नटसम्राट’ हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, डॉक्टर श्रीराम लागू. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच. […]

1 219 220 221 222 223 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..