नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

पार्ले टिळक विद्यालयाची १०० वर्षे

‘पार्ले टिळक विद्यालय’ संस्थेचा जन्म राष्ट्रीय अस्मितेतून, त्याग भावनेतून व उच्च महत्त्वाकांक्षेतून झाला आहे. उत्तमोत्तम मुख्याध्यापक, शिक्षक यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. केवळ ४ विदयार्थी व १ शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विद्यालयाचा श्रीगणेशा झाला. चार विदयार्थ्यांसह ९९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या विद्यालयात आज दीड हजाराहून अधिक विदयार्थी शिक्षण घेत आहेत. […]

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा वाढदिवस.

‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले. ’कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक. मोहन जोशी यांनी मराठी, हिंदीसह भोजपुरी आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आजपर्यंत २५० चित्रपटात काम केले आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. […]

मराठी लेखक सुहास शिरवळकर यांचा स्मृतिदिन.

सुहास शिरवळकर हे एक जबरदस्त लोकप्रिय लेखक होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘पुण्यापासून गोव्यापर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत मी चालत गेलो तर प्रत्येक गावात मला माझा चाहता भेटेल. मला हॉटेलात जेवावं लागणार नाही. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ‘ दुनियादारी ‘ या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. […]

मेघदूत काव्य

मेघदूत या महाकवी कालिदासाच्या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला तो रामगिरीवर अर्थात सध्याचं रामटेक. मेघदूत हे दूतकाव्य तसेच विरह काव्यसुद्धा. या मेघदूत काव्याचा नायक यक्ष कुबेराच्या शापामुळे आपल्या प्रिय पत्नीपासून दूर एकांतवासात एका वर्षासाठी रामगिरीवर राहत असतो. पत्नीचा विरह त्याला सहन होत नाही. अशातच त्याला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात मेघ दिसतो. आपल्या पत्नीपर्यंत आपला खुशालीचा निरोप देऊ शकेल, पोहोचवू शकेल अशा विचाराने मेघाला दूत बनवायचं यक्ष ठरवतो. […]

महाकवी कालिदास जयंती

आज आषाढ मासारंभ होत आहे़. हा महिना जसा शेतकऱ्यांच्या, अध्यात्मिक भाविकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तसाच तो साहित्य विश्वाच्याही दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा आहे़ आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे आजची तिथी ही महाकवी कालिदास जयंती अलिकडे  ‘संस्कृत दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. संस्कृत साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली ‘मेघदूतम’ ही कवी कालिदासांची साहित्यकृती अजरामर ठरली. […]

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी साम्य असलेली विद्यार्थी संघटना आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केली होती. देशातील विविध विद्यापीठांमधील डाव्या विचारांचा पगडा कमी करणं हा अभाविपच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश होता. […]

ट्रॅजिडी किंग अभिनेते दिलीपकुमार

पेशावर मधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते. उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले. […]

मिरॅकल ऑफ सेंच्युरी

मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युनिअर बंधूंनी पॅरिस मध्ये त्यांच्या या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत उत्कृष्टता सिद्ध केल्यानंतर भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला. […]

४९ वर्षांचा ‘बावर्ची’ चित्रपट

एका मोठ्या एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असलेल्या घरात रघु (राजेश खन्ना) नोकर म्हणून येतो आणि त्या घरातील सगळा माहौलच बदलून टाकतो. हसतखेळत काही कौटुंबिक समस्या सोडवतो. संपूर्ण चित्रपटभर राजेश खन्नाची छान बकबक आहे. अमिताभ बच्चनच्या निवेदनाने या चित्रपटाची सुरुवात होते. तपन सिन्हा दिग्दर्शित ‘Galpo Holeo Satti’ (१९६६) या बंगाली चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे. […]

भारतातील पहिली मालिका ‘हमलोग’

१९७५ साली आलेल्या व्हेन कॉन्मिगो (Ven Conmigo) या मेक्सिकन दूरचित्रवाणी मालिकेच्या धर्तीवर हमलोग या मालिकेची निर्मिती केली. या मालिकेची कल्पना तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री वसंत साठे यांना १९८२ मध्ये मेक्सिकन दौऱ्याच्या वेळी मिळाली. भारतात आल्यावर मंत्री वसंत साठे यांनी याच्यावर काम करण्यास सुरुवात केली. व ‘हमलोग’ या मालिकेचे निर्मिती झाली. […]

1 183 184 185 186 187 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..