नवीन लेखन...

‘व्हेगन डाएट’च्या अनुयायींसाठी….

‘अति सर्वत्र वर्ज्ययेत्।’ अशी एक म्हण आहे. एखादी गोष्ट कितीही चांगली असली तरी तिचा अतिरेक वाईटच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हेगन डायट. १९४४ साली इंग्लंडमध्ये व्हेगन ही संकल्पना जन्माला आली. याचे प्रणेते डोनाल्ड वॉटसन यांच्यावर गांधींच्या अहिंसावादी तत्वज्ञानाचा प्रभाव होता. १९२० साली गांधींनी नैतिकतेच्या बळावर शाकाहाराचा पुरस्कार करायला हवा असे भाषण इंग्लंड येथील ‘व्हेजिटेरियन सोसायटी’समोर दिल्यावर […]

जागतिक आरोग्य दिनानिमित्त…

डिप्रेशन ही सध्या झपाट्याने वाढणारी जागतिक समस्या झाली आहे. खरंतर आम्हा भारतीयांच्या मनाला नैराश्याने स्पर्शही करायला नको. नैराश्यावर दोन रामबाण उपाय आपल्याकडे आहेत. […]

तुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का?

तुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का?…..हा घ्या उपाय!! तोतरेपणा, बोबडं बोलणं, जीभ जड असणे अशा विविध समस्या कित्येक लहान मुलांना भेडसावत असतात. कित्येकांना तर ‘स्पीच थेरपी’चा उपयोग करूनही काही फायदा होत नाही. सारे उपाय थकल्यावर अशा मुलांचे पालक ‘अखेरची आशा’ म्हणून आयुर्वेदाकडे वळतात. आयुर्वेदात ‘वाक्शुद्धिकर’ म्हणजे वाणी शुद्ध करणारी काही औषधे सांगितली आहेत. त्यांचा वापर केल्यास […]

ब्रेड (Bread)

पांढरा ब्रेड वाईट आणि ब्राऊन ब्रेड चांगला ही आपली नेहमीची अंधश्रद्धा. […]

शुद्ध बीजापोटी- पुरुषबीज शुक्र

संत तुकाराम महाराज म्हणतात; ‘शुद्ध बीजापोटी; फळे रसाळ गोमटी’ आयुर्वेदाने गर्भनिर्मितीसाठी जे चार अनिवार्य घटक सांगितले आहेत त्यातील एक म्हणजे बीज हा होय. बीज म्हणजे शब्दश: बी-बियाणे. जसे शेती करताना ठराविक पीक येण्यास त्याचे उत्तम दर्जाचे बियाणे पेरावे लागते तसेच गर्भधारणेसाठी पुरुष आणि स्त्री या दोहोंची बीजे शुद्ध असणे गरजेचे असते. याकरताच आचार्य सुश्रुतांनी तर ‘शुक्रशोणितशुद्धीशारीर’ […]

निसर्गोपचारतज्ज्ञ नेहमीच डॉक्टर नसतात…

कायद्यानुसार; स्वतःला निसर्गोपचारतज्ज्ञ म्हणवणाऱ्या व्यक्तीकडे आयुर्वेदाची BAMS ही पदवी नसल्यास ती व्यक्ती रुग्णांना कोणतेही आयुर्वेदीय औषध वा पंचकर्म इत्यादि देऊ शकत नाही. आपण ज्यांच्याकडून असे उपचार घेत आहात त्यांच्याबद्दल वरील मुद्द्यांबाबत खात्री करून घ्या. […]

डिलिव्हरी नंतर काय कराल; काय टाळाल?

सध्याच्या काळात हा एक यक्षप्रश्नच झाला आहे. खरं तर हा काही गहन प्रश्न नाही. पण दुर्दैवाने एखाद्या शास्त्राची काहीही माहिती नसलेले लोक ‘असं काही शास्त्र नसतंच’ अशी अवैज्ञानिक विधानं करून आपली मतं लोकांच्या डोक्यावर थापण्याचे प्रकार करत असतात त्यातलाच हा भाग. काही मुद्दे क्रमाने पाहूया. – तेलाचे मालिश करावे का? पूर्वीपासूनच बाळ-बाळंतीण यांना कोमट तेलाने मालिश […]

अपत्यमार्ग शुष्कता

अपत्यमार्गातील कोरडेपणा या तक्रारीवर प्रणयाचा कालावधी वाढवणे हा उत्तम उपाय ठरेल. त्याने लाभ न झाल्यास वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा. व्यतिरिक्त क्वचित प्रसंगी ल्युब्रिकंट्स चा उपयोगदेखील करता येईल; मात्र तोदेखील वैद्यकीय सल्ल्यानेच!! […]

गर्भसंस्कार नव्हे…..’सुप्रजाजनन’

गरोदर स्त्री आणि आयुर्वेद असं समीकरण असलं की ‘गर्भसंस्कार’ हा शब्द कानावर पडलाच म्हणून समजा. गेल्या काही वर्षांत तर मार्केटिंगमुळे गर्भसंस्कार या शब्दाला फार मोठे वलय प्राप्त झाले आहे. प्रत्यक्षात मात्र; आयुर्वेदात गर्भसंस्कार हा शब्द सापडतच नाही!! आयुर्वेदाला अपेक्षित आहे ते सुप्रजाजनन. कै. वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांसारख्या सिद्धहस्त वैद्यांनी या संकल्पनेवर सखोल अभ्यास करून आयुर्वेदीय सुप्रजाजननावर […]

‘सु’संवाद साधा !!

‘शादी का लड्डू’ खाऊन झालेल्यांना प्रत्येक वेळेस तो पचतो असं नाही. काही काळातच छोट्या छोट्या कुरबुरी सुरु होतात. या छोट्या छोट्या कुरबुरी दुर्लक्षित ठेवल्या तर काही काळातच मोठ्या कटकटी बनतात आणि हळूहळू त्या जोडप्यांत वादविवाद सुरु होतात. या अडचणी ठरवून केलेल्या लग्नांतच (arranged marriage) येतात असं नाही हं!! काही महिने ते काही वर्षं ‘डेटिंग’ नंतर झालेल्या […]

1 2 3 4 5 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..