शुद्ध बीजापोटी- पुरुषबीज शुक्र

Semen Analysis- AyurvedicPperspective

संत तुकाराम महाराज म्हणतात;
‘शुद्ध बीजापोटी; फळे रसाळ गोमटी’
आयुर्वेदाने गर्भनिर्मितीसाठी जे चार अनिवार्य घटक सांगितले आहेत त्यातील एक म्हणजे बीज हा होय. बीज म्हणजे शब्दश: बी-बियाणे. जसे शेती करताना ठराविक पीक येण्यास त्याचे उत्तम दर्जाचे बियाणे पेरावे लागते तसेच गर्भधारणेसाठी पुरुष आणि स्त्री या दोहोंची बीजे शुद्ध असणे गरजेचे असते. याकरताच आचार्य सुश्रुतांनी तर ‘शुक्रशोणितशुद्धीशारीर’ नामक अध्यायच सविस्तरपणे लिहिला आहे. सध्या आपण पुरुषबीज म्हणजेच शुक्राच्या शुद्धतेच्या आयुर्वेदोक्त आणि आधुनिक विज्ञानाच्या कसोट्या जाणून घेणार आहोत.
वंध्यत्वसंबंधित समस्यांवरील उपचारासाठी जेव्हा एखादे जोडपे येते तेव्हा त्यातील पुरुषाला करायला सांगण्यात येणारी पहिली तपासणी म्हणजे semen analysis होय. यात प्रयोगशाळेत वीर्याचा नमुना देऊन त्याची तपासणी होते. यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा विचार केला जातो.
 १. रंग:
Whitish grey हा सामान्य रंग मानला गेला असून आयुर्वेदात हाच रंग ‘स्फटिकाभम्’ म्हणजेच स्फटिकाप्रमाणे दिसणारा या शब्दात सांगितला आहे. अन्य एके ठिकाणी लाह्यांच्या पाण्यासारखा हा रंग असतो असेही वर्णन वाचायला मिळते. हा वैशिष्ट्यपूर्ण रंग असणे हे वीर्यात शुक्राणू उपस्थित असल्याचे द्योतक असते. शुक्राणूच नाहीत अशा रुग्णांत (azoospermia) हा रंग दिसत नाही.
 २. द्रवता:
द्रव असणे हा शुक्राचा गुण आहे असे आयुर्वेद सांगतो. आधुनिक विज्ञानानुसार साधारणतः अर्ध्या तासात वीर्याचा नमुना हा पातळ होणे अपेक्षित असते. आयुर्वेदालादेखील याबाबतच सुचवायचे असेल का?
 ३. फ्रुक्टोज:
वीर्यात फ्रुक्टोज नामक शर्करा असणे गरजेचे असते. या शर्करेमुळे शुक्राणूंना हालचालींसाठी आवश्यक ऊर्जा प्राप्त होत असते. आयुर्वेदीय ग्रंथांत ‘मधुर’ हा सांगितलेला शुक्राचा गुण या गोष्टीकडेच तर निर्देश करत नसेल?
 ४. वीर्याचे प्रमाण:
WHO नुसार एका वेळेस १.५-६ मिली इतके प्रमाण हे सामान्य मानले गेले आहे. आयुर्वेदाने याबाबत विचार करताना वाजीकरण या विषयात शुक्र हा प्रमाणत: अधिक असणेही महत्वपूर्ण आहे हा विचार नोंदवलेला आढळतो.
 ५. शुक्राणू संख्या:
WHO च्या मतानुसार प्रत्येक वीर्याच्या नमुन्यात किमान १५ दशलक्ष/ मिली इतकी शुक्राणूसंख्या असणे योग्य स्तर आहे. यापेक्षा कमी शुक्राणू असल्यास वंध्यत्वामागे ते एक प्रमुख कारण ठरू शकते.
 ६. शुक्राणू हालचाल:
शुक्राणूंची केवळ संख्याच पर्याप्त असणे पुरेसे नसून ते गतिशील असणेदेखील आवश्यक असते. नमुना घेतल्यावरील पुढील तासाभरात सुमारे ५०- ६०% गतिशील शुक्राणू असणे (rapid linear progression) अपेक्षित आहे. त्यांच्या गतिमानतेनुसार a,b,c,d अशा चार गटांत त्यांचे वर्गीकरण केले जाते.
 ७. शुक्राणूंची सामान्य रचना:
रचनात्मकदृष्ट्या Head, midpiece, tail असे भाग असलेल्या शुक्राणूंमध्ये काही विकृती असू शकतात. त्यांचा अभ्यास आणि प्रमाण यांबाबत येथे निरीक्षण नोंदवले जाते. आयुर्वेदानेही या गोष्टीचा सखोल विचार केला असून त्या संबंधाने शुक्रशोधक महाकषायाचे वर्णनही चरकसंहितेत आलेले दिसून येते.
याव्यतिरिक्त मधाच्या गंधासारखे असणे, स्निग्ध असणे असेही शुक्राचे गुण आयुर्वेदात सांगितले आहेत. हे सारेच गुण महत्वपूर्ण आहेत हे अर्थातच वेगळे सांगायला नको. शिवाय शुक्राच्या विकृतीदेखील वर्णन केल्या आहेत त्यावरही एखादा स्वतंत्र लेख लिहिनच. तूर्त ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की ज्या आयुर्वेदाने पुरुषबीजाच्या शुद्धतेची परिमाणे निश्चित केली आहेत, त्यातील विकृती वर्णन केल्या आहेत; त्या आयुर्वेदानेच त्यातील विकृतींवरील उपचारही सविस्तर वर्णन केलेले आहेत. Semen analysis सारख्या आधुनिक तपासण्यांचा ‘आयुर्वेदीय दृष्टिकोनातून’ केल्यास सोने पें सुहागा!
 © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदीय वंध्यत्व उपचार तज्ज्ञ
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..