Avatar
About हिमगौरी कर्वे
मी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.

हे टिपूर चांदणे

हे टिपूर चांदणे, सख्या तुला बोलावे, आकाशातील घनमाला, घराची तुला वाट दाखवे, –||१|| डोईवरचा चंद्रमा, माझिया प्रियाला स्मरण देई, एक चंद्र घरी वाट पाहे, सारखा सूचित करत राही,–||2|| शांत नीरव वातावरणी, बघ सजणा बोल घुमती, विरहव्याकूळ तुझ्या प्रियेचे, कानात कसे गुपित सांगती,||3|| भवतीचा काळोखही, येण्याची तुझ्या वाट पाहे, मिलन कल्पून मनाशी, दोन जिवांची संगत देई, –||4|| […]

श्रीरामा, घन:श्यामा,sssss

श्रीरामा, घन:श्यामा,sssss— घनघोर या काननी, किती पुकारु तुमच्या नावा,ssss- लक्ष्मण भावजी गेले सोडुनी,–!!! ‌. अयोध्येस परतल्यावरी, बसले मी राणीपदी, आदर्श जोडप्याचा मान देऊनी जनतेने केले धन्य जीवनी,– त्यातच आणखी गोड बातमी, स्वर्गच दोन बोटे राहिला,–!!! कुणाची नजर लागली, ग्रहस्थिती विपरीत फिरली, तुम्ही का सोडले मज रानी, जावे कुठे एकाकी मी आता,–!!! मनोरथे सगळी संपली तुमची सेवा […]

विस्तीर्ण समुद्र किनारी

विस्तीर्ण समुद्र किनारी, फिरत फिरत निघाले, वाळूत चालताना ठसे, पावलांचे उमटलेले, –!!! दूर क्षितिजी सूर्यबिंब, घाईत होते चालले, रंगांची आरास पाहून, अचंबित की झाले,–!!! ढगांमागून निघाला, संधिप्रकाश आता, दिसू लागला धरणीवर, पखरुन घातलेला, –!!! याच ढगांवर स्वार होऊन, निघाला सोन्याचा गोळा, आभाळाला सप्तरंगी, आज साज चढवलेला,–!!! किती रंगांची रासक्रीडा, गगनी होती चाललेली, चकित होऊनी धरा, कशी […]

अबोलीची केशरी वेणी

अबोलीची केशरी वेणी, नेसले केशरी साडी, अस्सल सोन्याने मढले ग, जसा जाईचा जणू बहरच ग, केशरी सुंदर टिळा लाविते, मोगऱ्याचे फूल केशी ग, भोवती दरवळ भारते ग, टपोरे मोतीच पेडी गुंफते ग, हाती गुलाब घेऊन माझ्या, प्रियाची वाट मी पाहते ग, गुलाब प्रतिक ना प्रेमाचे, गुलाबी पाकळ्या गाली ग,–!!! लाजलाजूनी म्हणते मग, कोण त्यांचा खरा वाली […]

बाळ चिमुकले

बाळ चिमुकले, गोड हासले, रांगत आले , पायाला धरुनी, उभे राहिले, बाळकृष्ण ते, मला भासले, — वदनांतून कोवळे, ध्वनि उमटले, बोबड्या स्वरांनी, मज जिंकीयले, उचलून घेता , कसे आनंदले, हात हलवून , मज कुरवाळले, कोण लहान, मग वाटले, कुशीत त्याच्या, मीच शिरले , हलके हलके, त्याने थोपटले, गा,—गा कर , मज म्हणाले, निश्चिंत जीव,—!!! निश्चिंत मन […]

दोघे एका डहाळीवरच झुलू

दोघे एका डहाळीवरच झुलू, निसर्गाचे ,देणे किती पाहू, बघ, रसरशीत खाली फळे, दोघे मिळून चवीने खाऊ,–!!! पक्ष्यांची जात आपुली, निसर्गमेवा”आपुल्याचसाठी, मानव त्याचा बाजार मांडे, निसर्गराजा, फिरवी कांडी, एका वृक्षा,– किती फळे, रसाळ,गोड,चविष्ट मधुर, तुझ्यासमवेत स्वाद वाढे, फळ बने आणखी रुचिर, प्रेमसंगत वाढून आपुली, एकमेकांचे उष्टे’ खाऊ,–!! त्यागातच प्रेम असते, सखे, दुनियेस दाखवून देऊ,–!! दोन “सांसारिक” जीव […]

हिरवेगार तृणपाते

हिरवेगार तृणपाते, वाऱ्यावर डोलत होते, मजेत इकडून तिकडे, मान करत गुणगुणत होते,— लहान बालिश वय कोवळे, कंच हिरव्या रंगात खुलत, खुशीत झोके घेत होते, बाळां काय ठाऊक असे, किती कठीण असते जगणे-? मौजमजा आणि हुंदडणे, करत करत एकदम कोसळणे वास्तवाशी सामना होतां, भलेभले धुळीस मिळती, हे तर इवलेसे तृणपाते, कितीशी असेल लढाऊ शक्ती,-? कुणीतरी आले तिकडून, […]

या अशा सांजवेळी

या अशा सांजवेळी, बाहुपाशी, घे जवळी, रात्र उतरून आली खाली, तुजविण जिवाची काहिली, हुरहुरते मन अशा समयी, तुझ्यासाठी,आंत तुटते काही जीव कांतर कांतर होई, आत्मा तरसे मिलनासाठी, लौकिक सुखे भोवताली, जीव कसा जळे त्यातही, तरसवे मज विरहाग्नी, तुझ्या शपथांची येतां स्मृती, उले काळीज माझे किती, तुला कल्पनाही नाही, प्रेमाचीच लागे कसोटी, ताटातुटीचीव्यथा ही, कोरडेपण तुझे मजसी, […]

असे दान द्यावे की

असे दान द्यावे की, समोरचा अचंबित व्हावा, मापे भरून ओतावे, हात ओसंडून वहावा, करावे रक्तदान सारखे, रुग्णांसाठी ते जीवनदान, अन्नदानासारखे पुण्य नसते, भुकेल्याला करते तृप्त, विद्यादान श्रेष्ठ दान, सरस्वती प्रसन्न होई, दुसऱ्याला दिल्याने ज्ञान, आपुले बघा वाढत जाई कला दान करता आपण, निर्मितो एक कलाकार, सेवा तिची करत करत, जिवंत,ठेवेल कला तर , अवयव दान केल्याने […]

धागा धागा मिळून

धागा धागा मिळून, बांधले,खास घरटे, फांदीचा आधार घेऊन, उभ्या झाडास लटकवले, एक चोंच करी किमया, केवढी मोठी कारागिरी, पिल्लांस सुरक्षित करण्यां, माय बापाची चाले हेरगिरी, घर मोठे प्रशस्त हवेशीर, वारा चारी बाजूंनी वाहे, निसर्ग सान्निध्यातले, वाटते मोठे आरामशीर, अंडी घालून ती उबवती, वाट जन्माची पाहती, कारागीरच ते नव्या उमेदी, दार घरट्याचे असे बांधले, सहजी कोणी उतरू […]

1 2 3 4 5 11