नवीन लेखन...

प्रश्नोत्तर चारोळी

प्रश्न जय कशाला म्हणतात हो? उत्तर कुणी देणार का? प्रतिस्पर्धि होता पराजित त्यालाच जय म्हणावे का? उत्तर आपला हक्क हस्तगत करणे आक्रमकाला समज देणे नाहीच येता समज,पराभूत करणे अशी जयाची परिभाषा करणे सौ.माणिक (रुबी)

कहाणी तारुण्याची

कहाणी तारुण्याची तुझ्या माझ्या प्रितीची अलगद मिठीची ओढ सहवासाची।।१।। स्वप्ने सुखी संसाराची तुझ्या नी माझ्या प्रेमाची धुंदी असे जवानीची चिंता नाही भविष्याची।।२।। चल दुर जाऊ एकांतात हितगुज साधू आपसात हातात गुंफूनी आपले हात चल जाऊ घरी झाली सांजवात।।३।। हा गजरा मलाच राहू दे तनस्पर्श तुझा दरवळू दे सुवासातला मादछक सहवास दे नित्य जवळी असा वास असू […]

शरद ऋतू

दिसभर उकाडा हा कुणासही सोसवेना त्यावर फुंखर म्हणून का केशरी चंद्राच्या दुधाळ चांदण्यांची शितलता… आश्विन पोर्णिमेसी वाढली निरभ्रता,सवे पिठूर चांदण्यांची मोहीनी मनाला…. अंबाबाईचा उत्सव जोडीला भुलाबाईचा जागर शिव-पार्वतिचा संगम… झाला दिवस लहान,आता होई रात्र महान त्या रात्रीला ओवाळण्यास दिपावली आली सत्वर… शरदाचे हे दिवस सुगीचे शेतकरी राजा सुखी शय्येवरी आरामात निजे…. सौ.माणिक (रुबी)

गुणधर्म

साखर ही नित्य खावी जिवनाला गोडी लावी चव टाका साखरेची लज्जत ही पदार्थाची जोडीलाही मीठ हवे स्वयंपाकी अन्ना सवे मीठ घाला चव येई अणू रेणू मान घेई ताजी मेथी खावी सदा नित्य तिच्या खुप अदा या मेथीची उसळही छान होई पौष्टीकही न्यारी मजा तुरटीची आवडही शुद्धतेची गाळ खाली बसविला फिरवता तुरटीला कारल्याचे करा कापं खाती सारे […]

वीर बालक

मुक्तछंद उगवतिचा सुर्य मज वाटतो एक गेंद टोलवावा उंच नभात हीच प्रबळ मनिषा मनात सागर किनारी प्रभातवेळी उगवतो हा पुर्वेला भल्या भल्यांना मोहवितो खट्याळ आहे जरा चित्रकार येती जाती असंख्य चित्र रेखाटती; मधेच येई छाया चित्रकारही छबी खेचतो हजारदा प्रेमी युगले इथेच येती गुज मनीचे सांगण्यास प्रेमाच्या आणा भाका देती तुझ्याच साक्षीने दिनकरा साधूसंतही कितीक येती […]

विश्वात्मक पसायदान

पुर्ण झाली ज्ञानेश्वरी वाङ् मयी यज्ञ करी विश्वात्मक तुम्ही देवा प्रसादाचा द्यावा मेवा नाथ माझा हा निवृत्ती सद्गुरु करी तृप्ती दुष्टपण सुटावेच मैत्रीस्तव सत्कर्मेच तम,पाप नष्ट होवो सर्वामुखी घास जावो त्रय गुणी बाधा नको षड् रिपू देवा नको ईश निष्ठ समुदाय मांगल्याची असे माय ज्ञानदिप प्रकाशिले आचरण शुद्ध झाले सज्जन हे कल्पतरू चिंतामणी गाव जणू संतजन […]

कान्हा तू माझाच ना

कान्हा तू माझाच ना तुझीच मीरा मोहन शाम हृदयातला हीरा दिनरात भजन हे राधेशाम कृष्णभक्तित लिन हे माझे नाम मी भक्त गिरिधारी तद्रुप झाली मी नाही दुजी तुझ्या मंदीरी आली देता विषाचा प्याला अमृत भासे त्यातही तुच हेच मनात ठासे रिचवला मी प्याला तुच दिसला माझाच तुरे प्राण तुला दिधला प्राण तुला दिधला — सौ. माणिक […]

सप्तपदी – लघुकथा

हसता हसता रमाकांतांनी सप्तपदीची शेवटची सुपारी ढकलली ती शेवटचीच ठरली. अवघ्या महिन्याभरात सगळा खेळ संपला होता. […]

तू माझाच श्वास तुच

तू माझाच श्वास तुच ध्यास तुच आस तुच तू माझाच आहे राम घनश्याम स्वप्नी शाम तू माझाच प्रियकर युगे युगे हा गिरधर तू माझाच गोकुळीचा कृष्णसखा मुरळीचा तू माझाच भेटतोस वृंदावनी रमतोस तू माझाच मी तुझीच अलगुज ही माझीच अलगुज ही माझीच — सौ. माणिक (रुबी) नाशिक

गोदावरी तिरी

गोदावरी तिरी, नाशिक माझे गाव तोच आहे जिल्हा, द्राक्षनगरी असे भाव महाराष्ट्रातील नाशिक कुंभमेळा, असे मजला ठाव कणखर, दगडांच्या देशाची कन्या, माणिक माझे नाव सौ. माणिक (रुबी)

1 7 8 9 10 11 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..