नवीन लेखन...

देणं – घेणं (हायकू)

निसर्ग देणं वापरा हो जपून आहे ते लेणं घेणे हा हक्क दिला आहे सर्वांना घेतो की चक्क किती ही हाव सदा ओरबाडतो नाशास वाव ऊस चाखावा नको चाखूस मुळ वंश जपावा हो रे सावध विनाशकाली स्वत: होशी पारध निसर्ग जप परहितात हित हे असो तप सौ.माणिक शुरजोशी नाशिक ८८७९३3८०१९

कायदा पाळा गतीचा (मार्मिक लेख)

माधव ज्युलीयन म्हणतात,”कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला.” ह्या ओळी गुणगुणतांना लहानपणी ऐकलेली ससा आणि कासवाची गोष्ट आठवल्याशिवाय रहात नाही. […]

माझी माय मराठी (मुक्तछंद)

माझी माय मराठी शिवबाची कणखर देशाची, ज्ञानेशाची माझी माय मराठी अलंकृत अलंकार तिचे खुलवित सौंदर्य माझी माय मराठी वृत्तात बंदिस्त गझलकारा करितसे उत्तेजित माझी माय मराठी नव रसात चिंब चिंब भिजलेली रसा -रसातून गर्जे भाव-स्पंदनांची तराणी माझी माय मराठी छंदात रमलेली वाकवाल तशी वाकणारी मराठीच आमुचा बाणा मराठीच आमुची माता तिच्या साठी झिजणार सारस्वत हाच तयांचा […]

बोबडी माझी वळाली (बालगीत)

आली आली थंडी आली बोबडी माझी वळाली।।धृ।। स्वेटर ना नवा हवा कानटोपी हवी बुवा थंडी लगेच पळाली बोबडी माझी वळाली ।।१।। नको शाळा सकाळची दांडी मला मारायची आई-बाबा हो म्हणाली बोबडी माझी वळाली ।।२।। गोधडीत गुडीगुप चिंचा खाल्या गुपचुप खोकल्याची ढास आली बोबडी माझी वळाली ।।३।। प्रश्न एक माझा ऐका शाळेचा कशास हेका शक्कल माझी निराळी […]

अंधारलेल्या वाटा

चालत होते ,चालत होते पुढचे काही दिसत नव्हते अमानुष हात बाटवत होते मन माझे आक्रंदत होते मदतीस आक्रोश करीत होते कुणी न माझे ऐकत होते नशिबाचे फेरे फिरले होते नर वर्चस्व मज मातीमोल करीत होते क्षणिक हव्यास आयुष्य लोळवित होते स्वप्न माझे अग्नित जळत होते अंधारलेल्या वाटा ठेचकाळत होते मी माझे जीवन संपवत होते — सौ.माणिक […]

तुझ्या रुपाचं चांदणं

तुझ्या रुपाचं चांदणं आलं माझ्याच घरात दुडू दुडू चाल तुझी घर करते मनात तुझ्या रुपाचं चांदणं फुले माझ्या गं दारात त्याचा परिमळ पहा बघ पसरे जनात तझ्या रुपाचं चांदणं नेण्या राजपुत्र आला पाठवणी तुझी केली सुखी रहा सासरला तुझ्या रुपाचं चांदणं भास आभास हा झाला जिथे तिथे तुझी झबी असा वेडा बाबा झाला — सौ.माणिक शुरजोशी […]

प्रकाश फुलं

लयबद्ध चमचमाट अग्निशिखांचा।। रात्रीच्या गर्भातला प्रकाशित फुलांचा।। लोभसवाणी उतरली तारकादळे।। सोहळा फुलविती अंधाऱ्या अवसेचा।।१।। चंदेरी दुनिया लखलख तेजाची।। भूवरी भंडारदऱ्यास शोभा स्वर्गाची।। चला पाहूया मौज सरत्या वैशाखाची।। ही विलोभनिय दृश्य प्रकाशफुलांची।।२।। किर्र रात्री,धडपड निसर्ग प्रेमींची।। इवल्या काजव्यांचे नर्तन बघण्याची।। वाढताच संख्या अशा सोन किटकांची।। सांगता मान्सून येताच मयसभेची।।३।। — सौ.माणिक शुरजोशी

सुवास (चारोळी)

शेलकाव्य रचना – वर्ण ८ विषय – सुवास मज आवडे सुवास सुवास रातराणीचा ही दरवळते रात्री रात्री बाग सुगंधाचा — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

देवा तुझे द्वार (चारोळी)

काव्याक्ष चारोळी देवा तुझे द्वार असे भक्तीचा सागर येऊन करी स्तुती जागर तिथे तू असशी का तारणहार? — सौ.माणिक शुरजोशी ७/१२/१९

अपेक्षांचा डोंगर (मुक्तछंद)

अपेक्षांचा डोंगर वाढतच जातो त्या मागे माणूस धावतच राहतो अपेक्षांचा ओघ वाहवत असतो कुठेतरी विश्राम द्यायचा असतो आणि ……….. इथच चुकतं,नव्वद टक्के मार्कस् मिळाले आई म्हणे बाळा थोडा अभ्यास केला असतास तर…… तर नक्कीच वाढले असते टक्के पाच लाखाचं पॅकेज अमुक कंपनी जास्त देईल पॅकेज तृप्ती नाहीच…….. अपेक्षांचा नाही….. तृप्तीचा डोंगर वाढू दे प्रयत्न सोडू नको […]

1 5 6 7 8 9 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..