नवीन लेखन...

कालाय तस्मै नमः

पुर्वीच्या काळी घराघरात रेडियो ऐकला जायचा. काळ बदलला, पुढची पिढी आली तसे रेडियोच्याही पुढच्या पिढीचे आगमन झाले. पिढीदरपिढीगणिक नवनवीन गोष्टी येतात, जुन्या गोष्टी बदलतात, त्याचप्रमाणे टेलिव्हीजन नामक रेडीयोच्या पुढील जनरेशननेही लोकांच्या आयुष्यात बदल घडवुन आणला . काम करता करता रेडियो ऐकणे शक्य व्हायचे , तसे टीव्हीचे नाही . त्यासाठी काम सोडुन त्याच्यासमोर बसावे लागते. आमच्या लहानपणी […]

कमिशनरीणबाईंची पार्टी !

कमिशनरसाहेब जेवायला बसले. नोकरानी ताट आणि पाणी पुढे आणुन ठेवले. ताटात फक्त साध वरण आणि भात होता. हल्लीहल्ली त्यांना ताज इंटरकॉंन्टिनेंटलमधले जेवण पचत नसे. लगेच डायरिया व्हायचा. त्यामुळे महिन्याभरापासुन त्यांनी फाइव्ह स्टार हॉटेल , इंटरनॅशनल रेसिपिज , लेट नाइट पार्टीज , चिअरलीडर्स सर्व काही बंद केले होते. सकाळ संध्याकाळ फक्त साधं वरण आणि भात. तेवढ्यात कमिशनरीणबाई […]

शिक्षणाचा इतिहास !

नुकताच मी आणि गजा एका व्याख्यानमालेत “ शिक्षण दशा आणि दिशा ” यावर एका शिक्षणसम्राटांचे व्याख्यान ऐकायला गेलो होतो. मी नेहमीच नवनवीन व्याख्याने ऐकायला जातो . याचे दोन फायदे होतात. एकतर नवनवीन गोष्टी कानावर पडतात . दुसरा फायदा म्हणजे व्याख्यानानंतर असणारी रिफ्रेशमेंट . ही मात्र व्याख्यात्यावर अवलंबुन नसुन प्रायोजकांवर अवलंबुन असते. या गोष्टीचा मात्र माझा बराचसा […]

आम्हाला भेडसावणारा एकमेव प्रश्न !

सध्या अचानक महाराष्ट्राला चांगले दिवस आले आहेत. सगळीकडे सुबत्ता आली आहे. विजेचा प्रश्न मिटलेला आहे. महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त झाला आहे. शेतकर्‍यांना पाहिजे तितके पाणी उपलब्ध आहे. तीन तीन पिके वर्षभरात घेतली जातायत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्यात , त्यांच्या घरात एसीपासुन मायक्रोवेवपर्यंत सर्वकाही उपलब्ध आहे. कुपोषणाचा प्रश्न सुटलाय , सगळी लहान मुले एकजात निरोगी दिसतायत . सरकारी नोकरांचे पगार […]

रिसेशन येती घरा !

आमच्या बॅंकेच्या लोन डिफॉल्टरच्या लिस्टवर दर तीन महिन्यानी सही करायचे काम फिल्ड ऑफिसर म्हणुन माझ्याकडेच आहे , सहसा मी या यादीवर नुसती नजर टाकतो , आणि सही करुन टाकतो . यात विशेष असे काहीच बघण्यासारखे नसते. ही लिस्ट आमच्या रिकव्हरी एजन्सीकडे जाते , आणि ती एजन्सी येन केन प्रकारेण लोनची रिकव्हरी करुन बॅंकेत भरते. याबद्दल काही […]

पिंटु द लिटील चॅम्प

“वहिनी चहा टाका दोन कप ” अशी हाक मारणारा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसुन माझा बालमित्र गजा. आम्ही दोघेही बालपणापासुन एकत्रच वाढलो. शिक्षण , लग्न आणि नंतर मुलेही साधारणतः एकाच वेळी. तो एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणुन नोकरीला लागला , आणि मी बैंकेत. प्रोफेसर असल्यामुळे बराचसा वेळ तो रिकामाच असतो. आणि या रिकाम्या वेळात काहीतरी खुळ डोक्यात […]

महाराष्ट्राचे मदिराशास्त्र

महाराष्ट्र शासनाने नुकतीच धान्यापासुन मद्य बनविण्याच्या कारखान्यांना परवानगी दिली, यातील बरेचसे कारखाने विदर्भात असुन त्यांची यंत्रसामुग्रीही तयार आहे , फक्त शासनाच्या परवानगीचाच काय तो उशिर होता , असेही समजले. आता यावर बर्‍याच लोकाना आक्षेप होता . शेतकर्‍यांच्या आत्महत्या जास्त असणार्‍या विदर्भात हे कारखाने कशाला ? असे काहींचे म्हणणे होते , तर गरिबी जास्त असताना धान्याचा उपयोग […]

अखेर पिंटु शाळेत जातो !

यंदा आमच्या पिंटुला अडीच वर्षे पुर्ण झाली. ‘ आमची मुलगी अठरा वर्ष पुर्ण झाली ‘ असे म्हणताक्षणीच पुढचे वाक्य जसे ‘ आता तिच्यासाठी स्थळ बघायला हवे ‘ आपसुकच येते , तसे पिंटु अडीच वर्षाचा झाला म्हणजे शाळेत घालायच्या वयाचा झाला , असे हल्ली समजतात . मुलाच्या जन्माचे प्लॅनिंग करायच्या आधीच त्याच्या शाळेचे प्लॅनिंग आइवडील करतात , […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..