डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग ४

आपल्याकडे संगीत म्हटलं की गीतकार, संगीतकार आणि गायक अशी त्रिमूर्ती असावी लागते. हिंदीमधे गीतकार शैलेंद्र किंवा हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन आणि गायक मुकेश किंवा गीतकार शकील बदायुनी, संगीतकार नौशाद आणि गायक महमद रफी किंवा गीतकार राजा मेहेंदी अली खां, संगीतकार मदन मोहन आणि गायिका लता मंगेशकर असे त्रिवेणी संगम असले की डोळे मिटावेत आणि शब्द […]

अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग ३

१९५० च्या सुमारास, टेनेसी राज्यातले नॅशव्हील हे गाव म्हणजे कंट्री म्युझिकची मांदियाळी म्हणून नावारूपाला येत होतं. नॅशव्हील मधल्या रेकॉर्डिंग कंपन्या, नवीन कलाकारांना संधी देऊन त्यांना प्रकाशात आणत होत्या. देशभरातून धडपडणारे उदयोन्मुख कलाकार, नॅशव्हीलची वाट चोखाळत होते. याच नॅशव्हीलने, या दशकात कंट्री म्युझिकचे दोन महान कलाकार पैदा केले – एल्वीस प्रिस्ले आणि जॉनी कॅश! एल्वीसने आपल्या संगीतमय […]

अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग २

कंट्री म्युझिक म्हणजे अनेक लोकप्रिय संगीत प्रकारांची खिचडी आहे. त्याचा उगम अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांत आणि अ‍ॅपलाचियन पर्वतराजीच्या आसपासच्या भागात आढळतो. त्याचं मूळ शोधूं गेलं तर, पूर्वापार चालत आलेलं लोकसंगीत, खास आयरीश ढंगाचं सेल्टिक संगीत, चर्चेसमधून पिढ्यान पिढ्या चालत आलेलं भावपूर्ण भक्ती संगीत, अशा विविध ठिकाणी सापडतं. साधारणपणे १९२० च्या सुमारास कंट्री म्युझिकचा उगम व्हायला लागला. सुरवातीला […]

अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग १

भारतात असताना, शाळा कॉलेजच्या लॅब्जमधे गाणी ऐकण्यासाठी रेडिओ, टेपरेकॉर्डर वगैरे गोष्टी स्वप्नात देखील येणं शक्य नव्हतं. पुढे NDDB च्या गुजराथमधील फार्मवर, गायींमधे भृणप्रत्यारोपण (Embryo Transfer) च्या लॅबमधे काम करताना आम्ही “साब” झालो होतो. त्यामुळे सायबासारखं वागणं भाग होतं. “साब” लोक बिहारपासून राजस्थानपर्यंत आणि पंजाबपासून केरळापर्यंत वेगवेगळ्या राज्यातले होते. त्यामुळे गाण्याची आवड निवड जुळणं अवघड होतं. नवरात्रीच्या […]

अमेरिकेतील धार्मिकता – भाग १०

जाता जाता, या धार्मिकतेच्या सामाजिक अंगाकडे लक्ष गेल्याशिवाय रहात नाही. मिशनरी काम, अ‍ॅडॉप्शन आणि चॅरीटी या गोष्टींना अमेरिकन जीवनामधे मोठं महत्वाचं स्थान आहे. येशु ख्रिस्ताच्या काळापासून गेली २००० वर्षे, मिशनरी काम जगाच्या कानाकोपर्‍यात अव्याहतपणे चालूच आहे. आजही अमेरिकेच्या छोट्या मोठ्या गावांतून, लोक मिशनरी काम करायला एशियन, आफ्रिकन देशांमधे जात आहेत. आमच्या बाजूच्या ऑरेंजसिटीमधल्या नॉर्थ वेस्टर्न कॉलेजमधले […]

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ९

संख्येने तुलनात्मक रित्या कमी असूनही, अमेरिकेच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक जीवनावर फार मोठा प्रभाव टाकणारे म्हणजे ज्यू. तसे ज्यू अमेरिकेत १७ व्या शतकापासून होते. परंतु त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली ती १९ व्या आणि २० व्या शतकातल्या, मध्य आणि पूर्व युरोपातील वंशद्वेषी अत्याचारांमुळे. या अत्याचारांतून सुटका करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ज्यू अमेरिकेकडे धाव घेऊ लागले. आज अमेरिकेतील […]

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ८

दुसर्‍या महायुद्धानंतर, इंग्लंड आणि इतर युरोपियन देश, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड या प्रगत आणि प्रामुख्याने ख्रिश्चन देशांमधे धार्मिकतेचा प्रभाव कमी होत गेलेला दिसतो. परंतु अमेरिका मात्र आपल्या धार्मिकतेला सोडायला तयार नाही असे वाटते. आजदेखील एकंदर प्रगत राष्ट्रांचा विचार करता, केवळ आयर्लंड आणि पोलंड या दोन देशांचा अपवाद सोडला, तर अमेरिका हा सर्वाधिक धार्मिक देश आहे. आजच्या […]

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ७

अमेरिकेच्या पहिल्या तेरा वसाहतींमधे प्रामुख्याने प्रॉटेस्टंट लोकांचा भरणा होता. वर उल्लेखल्याप्रमाणे, या सुरवातीच्या काळात अमेरिकेस जाणार्‍या लोकांमधे, युरोपातील जाचक धार्मिक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी पळ काढणार्‍या लोकांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे १७७६ साली अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू होईपर्यंत अमेरिका हा प्रामुख्याने प्रॉटेस्टंट पंथीय देश होता. यात प्रामुख्याने इंग्लंड आणि उत्तर युरोपीयन देशातल्या लोकांचा समावेश होता. यात अ‍ॅंग्लीकन, […]

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ६

पेनसिल्व्हेनियामधे आमिश लोक दिसायचे. पेनसिल्व्हेनियाच्या दक्षिण भागात या लोकांची मोठी संख्या आहे. या पंथातले लोक आधुनिकतेला शक्यतो दूर ठेवणारे. हे लोक आपल्या फार्मवर राहून, अगदी जुन्या काळासारखं, घोड्यांना नांगर लावून शेती करणारे. आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांचे वाकडे. त्यामुळे ट्रॅक्टर वगैरे वापरणे दूरच, गाड्यादेखील वापरायच्या नाहीत. हे वापरणार घोड्यांच्या बग्ग्या. या भागातून जाताना हायवेवर देखील या आमीश लोकांच्या […]

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ५

इंग्लंड आणि इतर उत्तर युरोपियन देशांतले लोक, अमेरिकेच्या पूर्व / ईशान्य किनारपट्टीवर (न्यू इंग्लंड) वसाहती स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना, सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत, स्पॅनिश मुसाफिरांनी (explorers) अमेरिकेचा बहुतांश दक्षिण आणि नैऋत्य भाग धुंडाळून काढला होता. सोन्या चांदीच्या लालसेने काढलेल्या या मोहीमा हात हलवत परत फिरल्या होत्या. या धाडसी मुसाफिरांनंतर, काही काळातच, स्पॅनिश कॅथलिक मिशनरी अमेरिकेतल्या दक्षिण भागात […]

1 2 3 4 9