नवीन लेखन...
धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

कनकधारास्तोत्रम्- मराठी अर्थासह

एका दंतकथेनुसार, आचार्यांच्या कालडि गावातील एका निर्धन ब्राह्मणाला दारिद्र्यापासून मुक्त करण्यासाठी रचलेले हे ‘कनकधारा स्तोत्र’ लक्ष्मी स्तुतिपर एक अत्यंत श्रेष्ठ स्तोत्र आहे. या अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण स्तोत्रात मुख्यत्वे वसंततिलका, रथोद्धता व वैतालीय/सुंदरी या वृत्तांचा उपयोग केला आहे. खिल(श्री)सूक्तातील ‘सरसिजनिलये’ हा श्लोक  औपच्छन्दसिक/पुष्पिताग्रा वृत्तात आहे. […]

भगवन्मानसपूजा – मराठी अर्थासह

श्रीमद् शंकराचार्यांच्या या भक्तिपूर्ण स्तोत्रात श्रीकृष्णरूपातील श्रीविष्णूची मानसपूजा वर्णिली आहे. शिखरिणी या भावनाप्रद वृत्तात केलेली ही रचना भाविकांच्या मनाला भिडल्याखेरीज रहाणार नाही. […]

ललिता पञ्चकम् – मराठी अर्थासह

श्रीमत् आदिशंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र म्हणजे देवी ललिता त्रिपुरसुंदरीचा भक्तिप्रद मंत्र आहे. शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या श्रीचक्राची (श्रीयंत्र) ती अधिष्ठात्री देवता आहे. काही अभ्यासकांच्या मते ती सोळा वर्षांची कन्यका (षोडशी) कल्पिलेली आहे, तर काहींच्या मते ती सोळा विद्यांनी परिपूर्ण असल्याने तिला षोडशी असे नाव मिळाले आहे. […]

कालभैरवाष्टक – मराठी अर्थासह

श्रीमत् आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे. रूप रौद्र असले तरी त्याचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्तांविषयी कणव असणारा आहे. या स्तोत्राचे पठण करण्याने भगवान कालभैरव अत्यंत भयावह भूत प्रेतादिकांना दूर ठेवतो, भीती, दुःख दारिद्र्य, क्लेशांना नष्ट करतो व सर्व संकटे दूर होतात. स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते, आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपले जीवन निरोगी, श्रीमंत आणि संपन्न बनते, असा भाविकांचा विश्वास व अनुभव आहे. […]

गणेशपञ्चरत्नम् – मराठी अर्थासह

आदि शंकराचार्यांनी रचलेल्या या श्री गणेशाच्या स्तुतीपर स्तोत्रात पाच श्लोक आहेत. सहावा फलश्रुतीचा आहे. यातील श्लोकांचे / चरणांचे विविध अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावलेले दिसतात. […]

अर्धनारीश्वरस्तोत्रम् सार्थ

श्रीमद आदिशंकराचार्यांनी रचलेले हे अर्धनारीश्वर स्तोत्र शिव आणि शक्ती यांचे एका शरीरात कल्पिलेल्या संयुक्त रूपाचे स्तोत्र आहे. शिव हा लिंगभेदापलिकडे, अप्रकटित, स्वरूपविहीन चेतना आहे तर शक्ती ही प्रकटित ऊर्जा आहे. शिव आणि शक्ती हे अविभाज्य, एकरूप आहेत. अर्धनारीश्वर हा शब्द अर्ध+नारी+ईश्वर असा बनलेला असून मूर्तिविद्येमध्ये अर्धनारीश्वर मध्यातून दुभागलेला अर्धा पुरुष व अर्धी स्त्री स्वरूपात दाखवला जातो. […]

श्री वेंकटेश मंगलाशासनम् – मराठी अर्थासह 

स्वामी `प्रतिवादी भयंकर’ अण्णा रचित मंगलाशासनम् म्हणजे व्यक्तिगत स्वार्थांपासून दूर होऊन अत्युच्च पातळीची भक्तिपूर्ण प्रार्थना जेथे केवळ भगवंताच्याच कल्याणाचा विचार केलेला असतो. मंगलाशासनम् म्हणजे भक्ताची वेंकटेशाबद्दलची सततची वचनबद्धताच होय. […]

श्री वेंकटेश स्तोत्रम् – मराठी स्वैर अनुवादासह

आपल्या आराध्य देवतेची स्तुती करून तिला प्रसन्न करून कृपाप्रसाद प्राप्त करणे हे कोणाही भक्ताचे उद्दिष्ट असते. स्तोत्र पठण हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रतिवादी भयंकर’ स्वामी अण्णा यांनी मुख्यत्त्वे तोडक वृत्तात (सससस) रचलेल्या या स्तोत्रात श्री व्यंकटेशाचे गुणवर्णन व स्तुती आहे. कृपा किंवा उपकार एखाद्या गोष्टीची परतफेड म्हणून किंवा कारणाविना निर्हेतुक असू शकतात. येथे याच निर्हेतुक कृपेची तसेच आपल्या हातून जे अनेक अपराध, दुष्कृत्ये घडल्रेली आहेत त्याबद्दल क्षमा मागून याचना केली आहे. […]

श्रीमत् आदिशंकराचार्यांचे श्रीलक्ष्मीनृसिंहपंचरत्नम् मराठी अर्थासह

नृसिंहपंचरत्न स्तोत्रात श्रीमत् शंकराचार्य मनाला भ्रमराची उपमा देऊन, या वैराण वाळवंटासारख्या जगातील नश्वर गोष्टींमध्ये सुखासाठी वेड्यासारखे फिरण्याऐवजी भगवान लक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील शाश्वत मकरंद ख-या आनंदासाठी तू सतत सेवन करावास, असे विविध उदाहरणे देऊन पटवून देतात. हे अवघ्या पाच श्लोकांचे स्तोत्र अतिशय लालित्यपूर्ण आणि मधुर आहे. […]

1 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..