महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् – मराठी अर्थासह – भाग २
पं. रामकृष्ण कवी यांनी रचलेले प्रस्तुत महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे ‘देवी माहात्म्य’ वर आधारित असून त्यात मधु,कैटभ,महिषासुर तसेच शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध करण्यासाठी देवीने घेतलेल्या दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या रूपांचा उल्लेख आहे. दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण (गण- न ज ज ज ज ज ज ल ग) या वृत्तात रचलेल्या व अनुप्रास अलंकाराने नटलेल्या या स्तोत्रात शब्दांची अत्यंत आकर्षक रचना असून एकच शब्द पुनःपुनः वेगवेगळ्या अर्थांनी उपयोजल्याने कवीची संस्कृत भाषेवरील विलक्षण पकड जाणवते. […]