Avatar
About दासू भगत
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

काळजाला हात घालणारा गायक : मुकेश

प्रत्येक व्यक्तीच्या घशात “व्होकल कॉर्ड’’ नावाचा अवयव निसर्गत: असतो. एक अत्यंत पातळ पापूद्र्या सारखा दिसणारा हा अवयव आम्हाला बोलताना किंवा गाताना मदत करत असतो. मी कुठे तरी वाचल्याचं आठवतं की लता दिदीनी आपल्या घशाचा विमा उतरविला आहे. कारण त्यांचा घसा हाच सर्वात महागडा असा अवयव आहे. निसर्गत:च आवाजाची देगणी अनेक कलावंताना लाभलेली असते मात्र प्रत्येक आवाजाचा […]

‘शिवाजी’ हे नाव आयुष्यभर सन्मानपूर्वक धारण करणारा अभिनेता शिवाजी गणेशन्

विल्लुपूरम चिनय्या गणेशन हे त्यांचे मूळ नाव. दक्षिणेत “श” ऐवजी “स” चा वापर होतो म्हणजे सिवाजी गणेसन. मध्यमवर्गीय तमीळ कुटूंबात त्यांचा जन्म झाला. एकदा शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर बेतलेल्या नाटकात त्यानां मूख्य भूमिका मिळाली. नाटकाचे नाव होते “शिवाजी कंदा हिंदू राज्यम्” यातील शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. एका सार्वजनकि सभेत त्यावेळचे प्रसिद्ध समाजसेवक ई.व्ही.रामास्वामी यांनी त्यांचा “सिवाजी” असा उल्लेख केला आणि नंतर आयुष्यभर त्यांचे हेच नाव रूढ झाले. काय गंमत आहे बघा तमीळ ‘विल्लुपूरम चिन्नय्याचा’ शिवाजी गणेशन झाला तर मराठी ‘शिवाजी गायकवाडचा’ तमीळ रजनीकांत झाला. आणि दोघेही आपापल्या काळातले श्रेष्ठ अभिनेते ठरले. […]

वक्त ने किया क्या हँसी सितम : गीता दत्त

जॉर्ज वॉशिग्टंन कार्व्हर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होऊन गेले. हा माणूस अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा होता. मीना गवाणकर यांनी या शास्त्रज्ञाचे “एक होता कार्व्हर” नावाचे एक छोटेखानी सुंदर असे आत्मचरित्र लिहीले आहे. त्यात एके ठिकाणी असा उल्लेख आहे की हा शास्त्रज्ञ एकदा चर्च बाहेर बसला असतानां त्याच्या तोंडून अत्यंत गोड आवाजात उस्फूर्त असे गीत बाहेर पडले ज्याचा […]

आनंद कभी मरा नही, आनंद कभी मरते नही: राजेश खन्ना

१९६६ मध्ये “आखरी खत” हा चेतन आनंद यांचा कृष्णधवल चित्रपट प्रदर्शीत् झाला. यात बंटी नावाच्या एका दिड वर्षाच्या मुला सभोवती या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली होती. जाल मिस्त्री या प्रतिभावान छायाचित्रकाराने या मुलाचे विविध अंगाने इतके अप्रतिम छायाकंन केले होते की तेवढ्यासाठी प्रेक्षकवर्ग थिएटरकडे खेचला गेला. या चित्रपटात चेतन आनंद यांनी २३ वर्षाच्या एका तरूणाला सर्वप्रथम […]

वारणेचा वाघ : अण्णाभाऊ साठे

१९८२ मधील ऑगष्टचा महिना. त्यावेळी मी मुंबईच्या जे.जे. इन्स्टिट्युट ऑफ अप्लाईड आर्ट मध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होतो. अचानक मुंबई पोलिसांचा स्ट्राईक सुरू झाला. मुंबईतील सर्व दळवळण बंद झाले. लोकल, बेस्ट गाड्या, टॅक्सीज. कॉलेजमध्ये आम्हाला सांगितले की-ज्यानां शक्य आहे त्यानां लगेच घरी जावे. रस्त्यावर मिलट्रीच्या व्हॅन फिरू लागल्या. आमचे होस्टेल बांद्र्याला होते. हार्बर किंवा पश्चिम रेल्वे लोकलने […]

किंग ऑफ द कॉमेडी : मेहमूद

प्राचीन भारतीय ग्रंथात रसानुभूती बद्दल खूप सविस्तर असे वर्णन आले आहे. यात रसांचे चार अंगे सांगितली आहेत. मनात जे विविध भाव प्रगट होतात त्याना “संचारी भाव” असे म्हटले जाते. या संचारी भावात एकूण ३३ प्रकारचे भाव सांगितले आहेत. तर रसांचे एकूण ११ प्रकार नोंदवले आहेत. यामधील एक आहे हास्य रस. हे सर्वप्रकार भारतीय नृत्य शैलीत अत्यंत […]

आता कशाला उद्याची बात : शांता हुबळीकर

जगातल्या संपूर्ण मानव जातीतल्या संस्कृतीत स्त्रीचे नेमके स्थान काय? वरवर सोपा वाटणाऱ्या या प्रश्नाच्या खोलात जसजसे आपण जाऊ लागतो तसतसे प्रश्नांचे जाळे आम्हाला चारही बाजूनी वेढू लागते. स्त्रीयांची शेकडो रूपे जगभरातल्या सर्वच प्राचीन अतिप्राचीन ग्रंथात व आधुनिक वाडमयात विखूरलेली आढळतात. यातील एक रूप म्हणजे वारागंना, गणिका, वेश्या. अमरकोशात हे सर्व शब्द समानअर्थी मानले गेले आहेत. ‘मेधातिथी’ […]

चित्रपटातील वास्तविक खरा नायक : दारासिंघ

माझ्या लहानपणा पासून अनेकजण असे म्हणतानां मी ऐकले आहे की- ‘’ सिनेमामुळे मुलं बिघडतात.’’ त्यापूर्वी असे म्हटले जाई की नाटक वा तमाशामुळे मुलं बिघडतात. त्याही पूर्वी असे म्हटले जाई की नवीन शिक्षणामुळं मुलं बिघडतात… मला पडलेला प्रश्न असा आहे की नाटक, तमाशा, सिनेमा वगैरे वगैरे कलां १८ व्या शतका पासूनच्या आहेत. मग त्यापूर्वी माणसं मुलं बिघडतच […]

तालाचा ठेकेदार : मास्टर दत्तराम

जन्मत: प्रत्येक माणसाच्या शरीरात ताल आणि मनात लय असतेच. अगदी लहान बाळ पण आईच्या अंगाई गीताने किंवा बाबाच्या चुटकीने क्षणभर का होईना रडायचे थांबतेच ना !!! खरं तर लक्षपूर्वक आपण निसर्गातले ध्वनी ऐकायला शिकलो तर त्यात नक्कीच लयबद्ध ताल ऐकू येईल. जसजशी आपली वाढ होत जाते तसतसे मग कानावाटे सूर मनात तर शरीराद्वारे ताल शरीरात भिनत […]

1 2 3 4