नवीन लेखन...

काळे सरांचे अखेरचे शब्द

१ ऑक्टोबर २००२ रोजी ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गुणिजन पुरस्कार मला मिळाला. अध्यक्षस्थानी ठाण्याचे महापौर रमेश वैती, तर प्रमुख पाहुणे ठाण्याचे माजी महापौर सतीश प्रधान होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येतो. विख्यात व्हायोलिन वादक पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या एन्. राजम या संगीताच्या क्षेत्रातील माझ्याबरोबरच्या मानकरी होत्या. हा पुरस्कार आणि पेढे घेऊन मी लगेचच माझे […]

‘स्वर-मंच’ची जडणघडण

या नंतरचा काही काळ मात्र मी स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमीच्या जडणघडणीसाठी दिला. सुगम संगीताचे सर्व प्रकार मी शिकवत होतो. पण रागदारी संगीत, हार्मोनियम, तबला, गिटार अशी अनेक वाद्ये शिकण्यासाठी लोक चौकशी करायला लागले. माझ्या काही निपुण विद्यार्थ्यांनाच मी शिक्षक बनवले. अल्पावधीतच श्रीरंग टेंबे, सागर टेमघरे, प्रज्ञा टेंबे, मनिषा शहा, मनोज कांबळे, समीर टेमघरे, अमेय ठाकूरदेसाई, कुलकर्णी असे […]

नाबाद ५०० ….

१० मार्च २००१ ही गडकरी रंगायतनची तारीख कार्यक्रमासाठी नक्की केल्यावर अतिशय वेगाने कामाला सुरुवात झाली. अनेक नामवंत कलाकार कार्यक्रमाला येणार होते. त्यामुळे प्रायोजकही मिळाले. गिरीश प्रभू, अजय दामले, अमेय ठाकुरदेसाई, सागर टेमघरे आणि इतर वादक कलाकार मित्रांबरोबर रात्रीच्या रिहल्सल सुरू झाल्या. अनेक कार्यक्रमांच्या आठवणी आणि गिरीशचे हास्यविनोद यात अनेक रात्री रंगल्या. कार्यक्रमाची तारीख उजाडली. ज्येष्ठ संगीतकार […]

वेध ५०० व्या प्रयोगाचे

दरम्यान माझ्या गाण्यांच्या अनेक कॅसेटस् व सीडीज मार्केटमध्ये हिंदी भजनांच्या प्रकाशित होत होत्या. हिंदी-ऊर्दू गझलच्या आणि कॅसेटसने माझे नाव संपूर्ण भारतभर पोहोचवले होते. कार्यक्रमांच्या निमित्तानेही संपूर्ण देशभर मी फिरत होतो. या सर्वांची पोचपावती लवकरच पावली. ‘अचिव्हर ऑफ दी मिलेनियम ॲवॉर्ड १९९९’ या मानाच्या पुरस्कारासाठी एक गझल-गायक म्हणून माझी निवड झाली. हॉटेल ताज पॅलेस, नवी दिल्ली येथे […]

जिंगल्स आणि बरेच काही

गाणे हा एक योग असतो, हे विलासचे म्हणणे मला पटले. कारण अजून दोन उत्तम योग यापुढील काळात आले. मुंबई विभागाच्या संस्कृत विभागासाठी पं. वेलणकर यांनी लिहिलेले आणि संगीतकार प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेले माझ्या आयुष्यातील पहिले संस्कृत गीत गायलो. रेकॉर्डिंगच्या वेळी पं. वेलणकर यांना भेटलो. पत्रावर पत्ता लिहिताना आपण जो पिनकोड नंबर लिहितो, त्याचे जनक पं. […]

गझल रेकॉर्डिंग आणि ४०० वा कार्यक्रम

या संपूर्ण काळात पं. विनायकरावजी काळे आणि श्रीकांत ठाकरे गाण्याचे शिक्षण या गुरुंकडे माझे सुरूच होते. माझ्या गझल गायकीतील प्रगतीबद्दल श्रीकांतजी खूष होते. ‘दिलोजानसे’ या गझल अल्बमनंतर आजपर्यंत मी अनेक चित्रपटगीते व इतर गाणी गायलो होतो. पण गझलचे रेकॉर्डिंग काही झाले नव्हते. श्रीकांतजींच्या मते आता गझलचा पुढचा अल्बम करायची वेळ आली होती. यावेळी गायिका रंजना जोगळेकरबरोबर […]

गाण्याचा पहिला परदेश दौरा

आत्तापर्यंत संपूर्ण देशभर हिंडून मी गायलो होतो. भारताबाहेर कार्यक्रम सादर करण्याची माझी इच्छा होती. त्या दृष्टीने मी प्रयत्नही केले होते, पण एक अडचण येत होती. काही कार्यक्रमाचे दौरे काही महिन्यांचे होते. इतके दिवस कंपनीची कामे थांबवून देशाबाहेर राहणे मला अशक्य होते. गायिका रंजना जोगळेकरबरोबर अमेरिका दौऱ्याची संधी देखील आली होती. पण तो दौराही अडीच महिन्यांचा असल्याने […]

सरकार दरबारी यश पहिला पुरस्कार

कार्यक्रमांसाठी मी थोड्या वेगळ्या वाटेने जायचे ठरवले आणि तशी संधीही मला लवकरच मिळाली. सरकारतर्फे एक निवेदन टाईम्स ऑफ इंडियामध्ये आले होते. हे निवेदन मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि डिपार्टमेंट ऑफ कल्चरतर्फे छापले होते. नॅशनल इंटिग्रेशन थ्रू म्युझिक अॅन्ड डान्स या विभागात समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता अशी शिकवण देणारे संगीत व नृत्याचे प्रोजेक्टस् मागवले होते. त्यांचे कार्यक्रम छोट्या […]

द्विशतक महोत्सव

एव्हाना मी दोनशे कार्यक्रमाच्या जवळ पोहोचलो होतो. दोनशेव्या जाहीर पोस्ट केली. मुक्काम कार्यक्रमाची आखणी आम्ही जोरात सुरू एक हजारच्या वाटेवरचा पुढचा मैलाचा दगड जवळ आला होता. या प्रोजेक्टची आखणी करीत असतानाचे भाऊंचे शब्द आठवले. ‘या हजार कार्यक्रमांसाठी बराच मोठा कालावधी लागेल. आज तुझ्याबरोबर आहेत ती माणसे कदाचित एवढा काळ असणार नाहीत.’ आज दोनशेव्या कार्यक्रमाच्या आखणीच्या वेळीच […]

स्वर प्रवासातील पुढचे पाऊल

या दोन-तीन महिन्यानंतर मी गाण्याचे काम पुन्हा सुरू केले. विवेक देशपांडे यांच्या ‘निष्पाप’ या मराठी चित्रपटासाठी विश्वास पाटणकर यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये मृदुला दाढे-जोशी बरोबर एक द्वंद्वगीत मी रेकॉर्ड केले. याचवेळी विश्वास पाटणकर यांचा मुलगा मिथिलेश पाटणकर याने कवी ग्रेस यांच्या गाण्याला त्याने बांधलेली अतिशय सुंदर चाल ऐकवली. मिथिलेश त्यावेळी शाळेत होता. सातवी-आठवीत असेल. पण उत्तम संगीतकाराचे […]

1 2 3 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..