नवीन लेखन...

एक नवी जबाबदारी

‘भावनिक जगातील या उलथापालथीनंतर व्यावहारिक जग माझी वाट पहात होते, भाऊ गेल्यानंतर केवळ दुसऱ्याच दिवशी या व्यावहारिक जगाच्या मैदानात मला उतरावे लागले. कारण आमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवहार सुरूच होते. माझे काका गजानन जोशी, वसंत जोशी, श्रीकृष्ण जोशी, माझे मामा सुरेश धनवटकर आणि आमच्या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट आणि भाऊंचे जवळचे मित्र सहदेव चौगुले यांच्या सल्ल्यानुसार माझे […]

एक आघात

या नंतर मात्र पुढील महिन्यात मी एकही कार्यक्रम घेतला नव्हता. माझा सख्खा चुलत भाऊ प्रकाश याचे लग्न १ डिसेंबर १९९१ ला ठरले होते. त्यामुळे जोशी परिवारात प्रचंड धावपळ सुरू होती. लग्न भिवंडीला होते आणि दोनच दिवसांनी मोठ्या स्वागत समारंभाचे आयोजन पुण्याला करण्यात आले होते. दिवस गडबडीत जात होते. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे ३० नोव्हेंबरलाच आम्ही सर्वजण […]

‘एक हजार’च्या दिशेने

मुक्काम पोस्ट एक हजारमुळे माझ्याकडे असलेल्या मर्यादित वेळेची मला प्रो. अरुण गाडगीळ याने भिवंडी कॉलेजसाठी माझा कार्यक्रम आयोजित केला. महाराष्ट्र राज्य अल्पबचत योजनेतर्फे केंद्रिय अपंग कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी मान्यवर गायिका पुष्पा पागधरे, चंद्रशेखर गाडगीळ आणि श्याम हर्डीकर यांच्याबरोबर खोपोली, रोहा आणि ठाणे येथे तीन कार्यक्रम केले. या मदतीसाठी अजून दोन कार्यक्रम पालघर आणि डहाणू येथे सादर केले. […]

ध्येय कॅसेट विक्रीचे

कॅसेटचे प्रमुख वितरक ग्रँटरोडला होते. त्यांच्याकडे मी कॅसेट घेऊन गेलो. माझ्या कॅसेटची प्रत्येक बाब त्यांना नापसंत होती. माझ्यासारखा कॅसेट मार्केटला तसा अनोळखी, नवीन गायक, एकदम नवीन कंपनी, कॅसेटची अपुरी जाहिरात अशी अनेक कारणे देऊन त्यांनी नकार घंटा वाजवली. एव्हाना नकार ऐकण्याची मला सवय झाली होती. कॅसेटची भरपूर जाहिरात करण्याचे आश्वासन मी त्यांना दिले. पण त्यांनी स्वर-मंचतर्फे […]

माझी पहिली कॅसेट

एक गायक म्हणून संपूर्ण कॅसेट गाण्याची माझी योग्यता आहे का, हे विचारण्यासाठी शंकर वैद्यांकडे गेलो. ‘ही तुझ्या आवाजातील संपूर्ण कॅसेट आतापर्यंत रिलीज व्हायला हवी होती. थोडा उशीरच झालाय असे समजून कामाला लाग,’ या शब्दात त्यांनी प्रोत्साहन दिले. कॅसेटच्या खर्चाचा अंदाज घेतला. तीस ते चाळीस हजार रुपये अपेक्षित खर्च होता. भाऊंनी कर्जाऊ पैसे देण्याचे मान्य केले. हे […]

सुगम संगीताला प्रारंभ

आत्तापर्यंतच्या धाडसाचे आणि मेहनतीचे चांगलेच फळ मला मिळाले होते. टेलिव्हिजनवर पूर्वी मी युवदर्शनमध्ये गायलो होतो. आता मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम मिळाला. या कार्यक्रमात श्रीकांत ठाकरे यांची दोन नवी गाणी मी सादर केली. कार्यक्रम मिळत होते. आत्मविश्वास वाढत होता. आता एक संपूर्ण कॅसेट गाण्यासाठी प्रयत्न करायचे मी ठरवले. अनेक कॅसेट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना भेटलो. पण माझी संपूर्ण कॅसेट […]

वाटचालीला प्रारंभ

या कार्यक्रमाचा, या प्रसिद्धीचा थोडा परिणाम दिसायला लागला. मला केलेले कमी बजेटचे कार्यक्रम माझ्यासाठी खूपच मोठे होते. लोकांना माझे गाणे आवडते आहे, याची ती पावती होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कार्यक्रम मला आयोजित करायचे नव्हते, तर त्यात मला फक्त गायचे होते. एक मोठा डोंगर चढून आल्यावर सपाट रस्त्यावर चालण्यासारखेच हे होते. फक्त एक गोष्ट हळूहळू […]

नांदी स्वर सोहळ्याची

‘स्व र-मंच’तर्फे पहिला जाहीर कार्यक्रम संगीतबद्ध करण्याची विनंती मी प्रभाकर पंडितांना केली आणि त्यांनी आनंदाने ती मान्य केली. संपूर्ण तीन तासांचा कार्यक्रम मला सादर करायचा होता, पण प्रभाकरजींनी मला सल्ला दिला की, पहिला कार्यक्रम मी काही मान्यवर कलाकारांबरोबर सादर करावा, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढेल. त्यांचा सल्ला मला पटला. मराठी अभंगांच्या या कार्यक्रमात रंजना पेठे-जोगळेकर आणि मी […]

वडिलांची शिकवण

या सर्व प्रकारच्या तयारीनंतर कार्यक्रम करण्यासाठी मी अगदी अधीर या झालो होतो. पण भाऊंनी एक वेगळीच कल्पना माझ्यासमोर मांडली. त्यांचे म्हणणे होते की माझा स्वतःचा कार्यक्रम आयोजित करण्याअगोदर मी वेगळ्या कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करावा आणि केवळ आयोजनाचा अनुभव घ्यावा. कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी किती मोठी असते, याची मला थोडी देखील कल्पना नव्हती. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्वतःच्या बॅनरचीही […]

व्यवहारिक जगतात

फायनल परीक्षेच्या वेळेपासूनच व्ही.जे.टी.आय.मध्ये विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू सुरू झाले. आमचे कॉलेज उत्तम रँकिंगचे असल्याने अनेक मोठ्या कंपन्या नोकरी देण्यासाठी येऊ लागल्या. त्यावेळी व्ही.जे.टी.आय.मधून इंजिनियर होणाऱ्या मुलांच्या खिशात दोन ते तीन कंपन्यांची अपॉईंटमेंट लेटर्स असत. एकंदरीत उत्तम नोकरी मिळणे त्यावेळी बरेच सोपे होते. निदान आमच्या कॉलेजसाठी तरी. एम.आय.डी.सी. च्या सरकारी नोकरीसाठी मी निवडलो गेलो आणि त्यानंतर एका इंटरनॅशनल […]

1 3 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..