नवीन लेखन...

संत तुकाराम: ऐहिकाकडून अलौकिकाकडे

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. डॉ. सयाजी निंबाजी पगार यांनी लिहिलेला हा लेख महाराष्ट्रात श्री विठ्ठल भक्तीच्या स्नेहाने चंद्रभागेत सुस्नात होऊन जीवन कृतार्थ करण्याचा राजमार्ग दाखविणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा कळस म्हणून गौरविलेले संतश्रेष्ठ म्हणजे तुकाराम महाराज होत. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा वैचारिक पाया ज्ञानेशांनी घातला. अनुभवामृत, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांनी उत्तुंग असे चिविलासाचे व प्रेमबोधाचे तत्त्वचिंतन […]

तुका आकाशाएवढा

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी लिहिलेला हा लेख महाराष्ट्राच्या संत परंपरेचे रहस्य आपल्या अभंगातून मांडताना बहिणाबाईंनी सार्थपणे असे म्हटले आहे की ज्या वारकरी धर्माचा पाया ज्ञानोबांनी घातला त्याच्या कलश स्थानी तुकोबा आहेत. तुकोबांचा अभ्यास म्हणजे एका महायात्रेच्या प्रस्थानासाठी सिद्ध होणे आहे. ही आंतरिक अशी यात्रा आहे. ही धरणीवरल्या माणसाला आकाशाची […]

संत तुकाराम महाराज

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. नयना अशोक मेंगळे  यांनी लिहिलेला हा लेख संत तुकाराम महाराजांचे अभंग नावाप्रमाणेच अभंग आहेत! अंतर्गत शक्तीची जबरदस्त ताकत त्यांच्या ठायी होती. भक्ती हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ मूल्य होते. त्यांना नीतीमूल्याची जाण होती. जनजागृतीचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. विट्ठल नाम हे अमृतापेक्षाही त्यांना गोड वाटे. नामचिंतन जसेजसे खोलवर रूजले तसेतसे त्यांचे […]

संत तुकारामाची घोंगडी

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये भालचंद्र केशव गन्द्रे यांनी लिहिलेला हा लेख श्रीकृष्ण परमात्म्यांनी द्रौपदी वस्त्रहरणांत सातत्याने तिला वस्त्रे पुरवून तिची अब्रू वाचविली. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातही अशाच एका परीक्षेच्या वेळी, तत्सम प्रसंग घडला नि श्रद्धेमुळे ईश्वरी-लीला कशी घडते हे साऱ्यांनाच जाणवले. तुकाराम महाराजांचे गुरुबंधू श्री. गोचर स्वामी! तुकाराम महाराजांवर गुरुकृपेचा वरदहस्त होता. त्यामुळे ते […]

तुकारामांच्या अभंगांचं गारूड

तुकारामांचं व्यक्तित्त्व अंतर्मुख होतं. वाचन-मनन-चिंतन परिशीलन हा त्यांचा स्व-भाव होता. म्हणूनच त्यांच्या अभंगांना सुभाषितांची कळा लाभली आहे. कथा-कीर्तन-प्रवचनांप्रमाणे या अभंगांचा सर्रास प्रयोग केला जातो. साध्यासुध्या या अभंगांचा सर्रास प्रयोग केला जातो. […]

एका शर्तीच्या जीवनाची..

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये दे. ना. चौधरी  यांनी लिहिलेला हा लेख माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील भालोद गावचा. घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडिलांना शेतीच्या उत्पन्नातून चरितार्थ चालवणे जिकीरीचे होऊ लागल्यावर त्यांनी शैक्षणिक साहित्य विक्रीचे दुकान टाकले. जिद्द, चिकाटी व त्याच्या जोडीला सचोटी यामुळे त्यांच्या उद्योगाचा विस्तार वाढला. अशा वातावरणातच माझा १९३० मध्ये जन्म […]

अधुरे स्वप्न

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. राम नेमाडे यांनी लिहिलेला हा लेख जीवनाचा मार्ग सरळ नसतोच कधी. त्यात वेडीवाकडी वळणे, खाचखळगे असतातच. फुलांचे ताटवे फुललेले पाहावयाचेत ना मग त्यातून वाट काढण्याचीही तयारी ठेवावी लागते. प्रत्येक मोठा माणूस शून्यातूनच मोठा झालेला असतो. शून्याचा आकार लहान मोठा असू शकतो पण मूल्य त्याचे तेवढेच. मोठेपण मिळते खरे पण […]

काही गोष्टी नाहीच मिळाल्यात….

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये विश्वंभर दास यांनी लिहिलेला हा लेख ‘वीस वर्षानंतर तुम्ही नाराज व्हाल अशासाठी की ज्या गोष्टी तुम्ही करू शकलात त्यापेक्षा तुम्ही काही गोष्टी करू शकला नाहीत यामुळे’ या उक्तीने मी माझे विचार मांडणार आहे. जगात असं कुणीही नसेल की त्याला आयुष्यात काहीतरी मिळवावयाचे स्वप्न नसेल अगदी रस्त्यावरील भिकारी याचे देखील काही […]

मला अजुन काय करायचे आहे.

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये ब्रिगेडीअर श्री. हेमंत महाजन यांनी लिहिलेला हा लेख माझा देश महान करण्यासाठी नागरिकांनी काय करावे, या करता मला जनजागृती करायची आहे. सैन्यामधील ट्रेनिंग, कारवाया आणि जबाबदाऱ्या मी, इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून, मध्ये जुलै १९७३ला रुजू झालो आणि १५ जून १९७५ रोजी “कमिशन्ड ऑफिसर” म्हणून पायदळातील ७-मराठा-लाईट-इन्फन्ट्रीत प्रवेश केला. जम्मू-आणि-काश्मीरच्या सीमावर्ती […]

डॉक्टरी पेशातील मूल्य जपताना

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. भागवत चौधरी यांनी लिहिलेला हा लेख माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील फुलगाव या छोट्याशा गावी २९/१०/१९५१ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. वडील जेमतेम चौथीपर्यंत शिकलेले तर आईने शाळेचे तोंडच बघितलेले नव्हते. आमच्या गावाजवळ विल्हाळे म्हणून गाव आहे. तिथे तलाव खोदण्याचे काम चालू होते. कारण त्यावर्षी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला होता. […]

1 5 6 7 8 9 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..