नवीन लेखन...
Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

नोटाबंदी – बर्बादीची दोन वर्ष

भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटांवर प्रहार करून दहशतवादी कारवायांना मिळणारी रसद संपविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला ८ नोव्हेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशाने काय साध्य केले, याचं स्पष्टीकरण अद्याप पंतप्रधान किंव्हा सरकारने दिलेलं नाही. देशाच्या एकंदर जडणघडणीसाठी नोटबंदीच्या निर्णयाला ऐतिहासिक ठरविण्यात आले होते. […]

पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’

राजकीय पक्षांकडून ‘राम’ नामाचा जप सुरु झाला कि निवडणूक आली, हे आता लोकांना माहीत झालेले आहे. श्रीरामाचे नाव घेऊन देशातील बहुसंख्य हिंदूं मतांचे भावनात्मक ध्रुवीकरण करता येते, याची जाण राजकारण्यांना असल्याने प्रत्येक निवडणुकीत ‘राममंदीर’ हा काही राजकीय पक्षांच्या ठेवणीतील मुद्दा राहिला. निवडणुका आल्या कि ‘बनायेंगे मंदिर’ चा नारा द्यायचा. आणि निवडणुका झाल्या कि तांत्रिक मुद्द्यांचा कीस पाडून त्याला बगल द्यायची. हे राजकारण अनेक वर्षांपासून देशात केल्या जातेय. […]

कानडी दंडेली

गेल्या सहा दशकापासून कानडी झेटिंगशाहीचा सामना करणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या अस्मिता दुखावण्याचा खेळ अजूनही सुरूच असून कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी भाषिक तरुणांची डोकी फोडून आता तर कहरच केला आहे. १ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य स्थापनेचा दिन सीमा भागातली मराठी जनता काळा दिन म्हणून पाळते. महाराष्ट्रद्वेषाने पछाडलेल्या कानडी सरकारने कार्यकर्त्यावर लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले आणि कर्नाटक पोलिसांनी शेकडो मराठी भाषकांची डोकी फोडली. याला महाराष्ट्रद्वेषाचा कळस म्हटला पाहिजे. […]

हवामान बदलाचे गहिरे संकट!

दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीला अवकळा आली आहे. त्यामुळे बदलत्या पर्जन्यमानाचे स्वरूप लक्षात घेऊन शेती पद्धतीतही बदल करण्याची गरज आहे? नैसर्गिक बदलाचे संकेत समजावून घेऊन त्यावर वेळीच उपाय योजल्या गेले नाहीत तर परिणाम अजून दाहक होण्याची भीती आहे.  […]

राज्यकर्त्यांचे बौद्धिक ‘गहाणखत’?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अभ्यासू आणि राजकारणातील सावध व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत. राज्य गहाण ठेवण्याच्या त्यांच्या वक्तव्यामागील उद्देश हा स्मारकासाठी निधी कमी न पडू देण्याबाबतचा असेलही. मात्र तो व्यक्त करत असताना योग्य शब्दांचा वापर केला जावा. नाहीतर टाळ्याखाऊ विधानं करण्याच्या नादात गफलत होऊन जायची. डॉ. आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून  व्हायचे ते राजकारण आजवर खूप झाले. आता निधीच्या मुद्द्यांवर राजकारण केल्या जाऊ नये. एव्हडीच अपेक्षा..! […]

शिक्षेच्या ‘तीव्रते’ सोबत ‘हमी’ही वाढवायला हवी!

निर्भया, कोपर्डी, कठुवा, उन्नाव, सुरत ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. अशा अनेक घटना सातत्याने देशभर घडत असतात. यातील बहुतांश प्रकरणामधील आरोपींना गुन्हेगारी पार्श्वभूमी असते. म्हणजेच त्यांनी आधी देखील छोटेमोठे गुन्हे केले होते परंतु त्यांना तेव्हाच कठोर शिक्षा होऊन अद्दल घडली नाही. आणि म्हणून ते शिरजोर होत गेले. अश्या छोट्याछोट्या गुन्ह्यांसाठी सुद्धा जेव्हा कठोर शिक्षेची हमी निर्माण होईल, तेव्हा गुन्हेगारीला आळा बसणं सोपं होईल.अर्थात ही प्रक्रिया सोपी नाही. परंतु बलात्कार थांबवायचे असतील तर…”व्यवस्थापरिवर्तन”साठी मेहनत तर घ्यावीच लागेल..!!! […]

न्यायपालिकेची प्रतिष्ठा जपली जावी!

२०१८ हे वर्ष भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आघात करणारे ठरत आहे. वर्षाच्या प्रारंभीच सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायमूर्तीनी माध्यमांसमोर येऊन देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेत सर्व काही ‘‘ऑलवेल’’ नसल्याची बाब समोर आणल्यानंतर न्यायदेवतेच्या प्रतिष्ठेला पहिला धक्का बसला. या धक्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता देशाच्या इतिहासात प्रथमच भारतीय सरन्यायधीशांविरुद्ध महाभियोग चालविण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे. […]

नृशंसतेचा कडेलोट !

‘मानवप्राणी’ असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते. मात्र या प्राण्यातही माणूसपण जपले जावे, अशी अपेक्षा कुणी केली, तर ती वावगी ठरू नये. […]

‘मूषक’पुराण!

सर्व उंदरांवर मंत्रालयातील उंदीर वरचढ ठरले असून त्यांनी थेट सरकारचा ‘पारदर्शक’ चेहराच कुरतडविल्याचा आरोप सरकारमधीलच एका जेष्ठ नेत्याने केला आहे. त्यामुळे बिळात राहणार ‘उंदीर’ आज थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. […]

सोशल मीडियाचा काळा ‘फेस’!

सोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव समोर येत असल्याने भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. […]

1 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..