नवीन लेखन...

गॉडफादरच्या शोधात…

सध्या राज्याच्या राजकारणात गॉडफादरची चर्चा रंगली आहे. चित्रसृष्टीत गॉडफादर असल्याशिवाय काम होत नाही हे माहीत होते पण, राजकारणात ही त्रुटी तीव’तेने जाणवत असेल असे वाटले नव्हते. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ही गरज नुकतीच बोलून दाखवली आणि राज्याची राजकीय पृष्ठभूमी चांगलीच थरथरली.
[…]

राजकारणाचे मोदीकरण !

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पाच महापालिकांमध्ये भाजपला दोन तृतियांश मिळाले तर एका महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात 80 टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरांना 20 टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. भाजपच्या या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जात असून गुजरातमध्ये राजकारणाचेच मोदीकरण झाल्याचे पहायला मिळत आहे.
[…]

न्यायालयाची प्रत्ययकारी तळमळ

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सरकारी अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचारी वृत्तीवर ताशेरे ओढून सामान्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. बांधकाम, शिक्षण, पाटबंधारे आणि महसूल या महत्त्वाच्या खात्यांमध्ये आढळणार्‍या भ्रष्टाचारामागचे मूळ कारण म्हणजे किचकट कायदे. सरकारी कामांमध्ये होणार्‍या दिरंगाईबाबत ठोस कायदे तयार झाले तर भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो. त्या दृष्टीने पावले उचलल्याशिवाय तरणोपाय नाही.
[…]

पाकिस्तानमधील प्रश्नांचा गुंता वाढला

दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी जोरदार मोहिम न राबवल्यास अमेरिका आपले भूदल पाकिस्तानमध्ये आणेल हा अमेरिकेचा इशारा, काश्मिरमध्ये सार्वमत घेण्याची पाकिस्तानने युनोत केलेली मागणी आणि जनरल मुशर्रफ यांची नव्या पक्षाची घोषणा या घडामोडींमुळे पाकिस्तानमधील प्रश्नांचा गुंता सुटण्याऐवजी वाढण्याचीच चिन्हे आहेत. अशा स्थितीत भारताने आपल्या भूमिकेवर ठाम रहाणे अधिक महत्त्वाचे आहे. […]

खरेच संपतोय नक्षलवाद

नक्षलवादाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असताना मोहिमेतील अधिकार्‍यांनी नक्षलवाद्यांचा प्रभाव संपत असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन केले असता या दाव्यात तथ्य नसल्याचे दिसते. नक्षलवाद फोफावण्याची अनेक कारणे आहेत आणि तो संपवायचा असेल तर या कारणांचे उत्तर शोधले पाहिजे. तसे केले तरच नक्षलवाद संपतोय की वाढतोय हे लक्षात येईल.
[…]

निर्णयात भक्ती-भावनेचा विचार

बहुचर्चित रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाचा निकाल अखेर लागला आणि अख्ख्या देशातील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. सुदैवाने या निर्णयाचे सर्व स्तरांमध्ये शांततेने स्वागत झाले. या निर्णयात न्यायालयाने भक्ती आणि भावनांचा अधिक विचार केल्यासारखे वाटते. तसेच वादग्रस्त जागेवर पूर्वी मंदिर होते असे सांगण्यापेक्षा रामाचा जन्म त्याच ठिकाणी झाला असे सांगणे संयुक्तिक वाटत नाही.
[…]

लढा दारिद्र्य हटवण्यासाठी

जगातील बहुतांश देशांमध्ये आर्थिक सुधारणांचे वारे वाहत असले तरी दारिद्रयरेषेखाली जगणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये दोन वेळचे अन्नही धड न मिळणार्‍यांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत संपन्न देशांनी आपल्या संपत्तीचा छोटा हिस्सा गरिब देशातील जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यावर खर्च करायला हवा. या धारणेतून आता काही ठोस प्रयत्न केले जात आहेत. […]

कांबळेंचे भाग्यशाली अध्यक्षपद

ठाणे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या साहित्यिक उत्तम कांबळे यांची ‘वाट तुडवताना’ आणि ‘आई समजूनघेताना’ हीआत्मचरित्रात्मक पुस्तके आणि इतर साहित्य सुपरिचित आहे. त्यांनी मराठी वाचन चळवळ गावोगावी पोचवणे, सामान्य माणसाला वाचनसंपन्न करणे, मांडवाबाहेरच्या पुरोगामी मंडळींना मुख्य मंडपात विचारमंथन करण्याची संधी देणे वगैरे उपक्रम योजले आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे वय यौवनाकडे झुकवणार्‍या कांबळेंसाठी हे अध्यक्षपद भाग्यशाली ठरावे. […]

लुटीचे नवे साधन

खासगीकरणातून बांधण्यात आलेल्या विविध रस्त्यांवर सुरू असलेल्या अन्याय्य टोलवसुलीच्या विरोधात आता वाहनधारकांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे या विषयाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मुदत संपून गेल्यानंतरही टोलवसुली सुरू असल्याचे प्रकार यापुर्वी उघडकीस आले आहेत. त्यामुळे जनतेच्या आर्थिक लुटीचे नवे साधन बनलेल्या टोलबाबत सरकार फेरविचार करणार का हा खरा प्रश्न आहे.
[…]

न्यायव्यवस्थेला नवा हादरा

गेल्या काही दिवसांपासून न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराची चर्चा मोठ्या प्रमाणात गाजते आहे. कधी न्यायमूर्तींनी आपली संपत्ती घोषित करण्यावरून तर कधी एखाद्या न्यायमूर्तींकडे बेहिशेबी संपत्ती असल्याचे आरोप होतात. या बातम्यांमुळे जनमत बिघडत असतानाच देशाचे माजी कायदेमंत्री अनेक न्यायाधिश भ्रष्ट असल्याची माहिती देऊन प्रतिज्ञापत्र दाखल करतात, तेव्हा एकूणच व्यवस्थेला हादरा बसल्याशिवाय राहत नाही.
[…]

1 3 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..