नवीन लेखन...
Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

डॉक्टरेट

एका अती शिक्षित व्यक्तीने मला काहीसे नाराजीने म्हटले की “विद्यापीठ उगाच नाही डॉक्टरेट देत कोणाला ! त्यासाठी डोकंही असावं लागतं”…अर्थात त्या व्यक्तीचही म्हणणं खरंच आहे.तुमचा अभ्यास तुम्हाला ती डॉक्टरेट देतो.पण ह्याचा अर्थ असा नाही की एखाद्याने डॉक्टरेट मिळवली म्हणजे त्या व्यक्तीला सगळं काही समजते… […]

हम बनायेंगे एक आशियाँ !

काल पु.ल. वाचत बसलो होतो. ते एके ठिकाणी म्हणतात “तुम्हाला ‘मुंबईकर’ व्हायचं असेल तर तुम्हाला मुंबईत जन्माला येणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्या रहाण्याच्या जागेचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्यानीच सोडवायला हवा.” मी हे वाक्य वाचता वाचता विचारात पडलो… ‘अरे, हे तर अगदी माझ्या मनातले शब्द पुलं नी लिहिलेत’. कारण माझा ही जन्म मुबंईचाच की. […]

माझी घोडसवारी

साल कुठलं नेमकं आठवत नाही पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या गावी गेलो होतो.नुकताच नोकरीला लागलो होतो.सकाळच्या अकरा वाजल्या असतील . इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या रविवारचा दिवस असल्याने डवरी पतर भरण्यासाठी ( वाळलेल्या भोपळ्याचे पात्र,डमरु त्रिशूळ वगैरे घेऊन) भिक्षा मागण्यासाठी आला होता.त्यांच वय बरंच झालं होतं पण तरीही ते घोड्यावरून फिरत असतं.मला नवागत बघून विचारलं. […]

अपग्रेडेशन

माणसाच्या भाग्यात जसे चढ-उतार असतात ,भरती-ओहोटी असते तसे गाव आणि शहराचेही असावे.नालासोपारा या गावाच्या बाबतीत हे दिसून येते.मुंबई महानगर प्रदेशाच्या सीमेवर पश्चिम रेल्वेच हे एक लोकल स्टेशन. एकेकाळी म्हणजे यादवांच्या वगैरे काळात हे महत्त्वाचे व्यापारी बंदर. […]

कोजागरी – कोण जागे आहे?

‘पोर्णिमा’ ही समस्त जगातील प्रतिभावंतांची आदिम प्रेरणा झाली आहे. त्या एकमेवाद्वीतीय चंद्राच्या शीतल प्रकाशबिंदूंनी जणू प्रतिभेच्या कमळाला फुलण्याची अंतःप्रेरणा मिळते. ते शतदलकमल मग फुलून येतं मनस्वीपणे, चंद्रासारखंच! […]

मेरा भारत महान

मेरा भारत महान असं ट्रकच्या मागे लिहिलेले दिसतं. परंतु हे वाक्य वाचणारा मंत्री त्याचे कार्यकर्ते व देशातील इतर नागरिक त्यांच्या गाडीच्या मागे मात्र, ‘मेरा भारत महान’ असं लिहिताना दिसत नाहीत. ही बाब विचारतंद्री वाढवणारी आहे.असं का होतं? ट्रकवाला सोडून देशातील इतर लोकांना का वाटत नाही, की माझ्या गाडीच्या मागे मेरा भारत महान असं वाक्य असलेलं असावं. […]

मिरवणूक

घटस्थापना.. अर्थात घरोघरी देव बसतात. नऊ दिवस घरोघरी देवीची उपासना केली जाते.सप्तशतीचे पाठ पठण केले जातात. देवीची विविध स्तोत्रे, आरत्या म्हंटल्या जातात.याचवेळी नऊ दिवस विविध मंडळाच्या दुर्गादेवी पण बसतात. […]

कॅाफीपुराण

मी आणि आमच्या घरचे सर्वच चहावाले ! घरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा!तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफी बनवायची! […]

दिवाळी आणि रांगोळी…

दिवाळी आणि रांगोळी ह्यांचे अतूट नाते आहे. ह्या रांगोळीचा उगम कधी झाला , कोणी प्रथम रांगोळी सुरू केली ह्याबद्दल खूप कथा सांगितल्या जातात. काही म्हणतात अगस्त ऋषींच्या पत्नींनी , लोपामुद्रानी प्रथम यज्ञाच्या वेळी कोरडी रांगोळी काढली आणि सीतेनी रामासाठी ओली रांगोळी काढली. कोण म्हणतं द्वारका मध्ये कृष्णासाठी रूक्मिणीने रांगोळी सुरू केली . […]

आठवण काचेच्या विविधरंगी बांगड्यांची

गावात रामदास नावाचे कासार होते ..ते गल्लोगल्ली बांगडी, बिल्लोर म्हणून आवाज द्यायचे …मग त्यांना आवाज दिला की ते घरी येऊन….बांगड्या हातात भरून देत असत.. विविध रंगी बांगड्या काय मन मोहून घ्यायच्या म्हणून सांगू…..रामदास दादांचा स्वभाव खूप मिश्किल होता.सदोदित चेहऱ्यावर हास्य. […]

1 6 7 8 9 10 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..