नवीन लेखन...

क्षणीं अशा या

 

भिडतांच नजरेस ती, कुण्या एके क्षणीं ।
कुठेतरी अंतरीं, उठले तरंग प्रतीचे क्षणीं ।।
नयन-कटाक्षांतुनि एकाच, केलेस विद्ध तूं ।
लोटूनि गर्तेत विरहाच्या, गेलीस निघून तूं ।।
क्षणीं अशा या,
एकदां तरी, येशील कां परतूनि तूं ।।१।।

गुंफल्या, स्मृती-पाशीं, मोहक क्षणांच्या पाकळ्या ।
हलकेच हृदय-कोंदणी, ठेविण्या जपून अवघ्या ।।
रम्य तव सहवासांतल्या, परी-कथा त्या आगळ्या ।
कळे न मजसी, कशा त्या, विरुनि सार्‍या गेल्या ।।
क्षणीं अशा या,
एकदांतरी, येशील कां परतुनि तूं ।।२।।

कधी कळीं अंतरी, डोकावले जरी मी खुषित ।
तरल तव प्रीति-गंध, असेल तरळत स्मृतींत ।।
धुंद गंधातल्या, भाव-विभोर क्षणांच्या मस्तीत ।
कातरवेळीं असशील तूं, माझ्या स्मृतींच्या मिठीत ।।
क्षणीं अशा या,
एकदांतरी, येशील कां परतुनि तूं ।।३।।

भाग्य माझे, लाभला स्वप्नवत, तव सहवास ।
जीवनीं उरल्या, निश्चये, पुरे तो मधुमास ।।
असेल स्मृती-पटलावरी, कोरलेली तव आस ।
गेलो विस्मृतीत तरी, साथीस असेल ती खास ।।
क्षणीं अश या,
एकदांतरी, येशील कां परतुनि तूं ।।४।।

-गुरुदास / सुरेश नाईक
१० फेब्रुवारी २०१२
ओम् नम: शिवाय”
पुणे – ३०
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..