नवीन लेखन...

कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ

मनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. ईश्वरी संकल्पना दुरावते हे जाणले तो फक्त प्रयत्न असतो, विचार असतो, आत्मा असतो. मात्र त्या संगीतामध्ये जेव्हा एकरुप होऊन जातो,  स्वत:ला विसरुन जातो, त्याचवेळी ते ईश्वरी सानिध्यात असते. त्याची  उकलन करता येणार नाही, ज्याचे विश्लेषणही करता येणार नाही. ज्या विषयाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. ती स्थीती ब्रह्मानंदाची Ecstasy of joy म्हणतात , ते हे नव्हे का?

माझ्या तंद्रीमधून मी बाहेर आलो, माझ्या दुसऱ्या अवयवाचा विचार करु लागलो. माझी दृष्टी माझी नजर, माझे बघणे, माझे डोळे हे सारे आतूर असतात. सतत त्या ईश्वराच्या शोध संकल्पनेला गुरफटलेले असतात. माझ्या साऱ्या प्रयत्नांचे ध्येय … फक्त एकच असते. त्या ईश्वराचे दर्शन मिळवणे. त्याला डोळे भरुन बघणे. त्याचे स्वरुप जाणणे आणि तो ईश्वर कोण, कसा हे  विचाराने नजरेसमोर येवू लागते. तो ईश्वर ज्याला नाव दिलेले असते. त्याला रंग रुप, आकार, वेषभूषा, पेहेराव, अयुध्ये अथवा कोणत्यातरी पवित्र वस्तू ज्या संगीतल्या गेल्या आहेत. जसे कमलपुष्प, ओमकार, स्वस्तीक, शंख, इत्यादी. अशाच त्या ईश्वराला, त्याच्या वर्णन केलेल्या दृष्यामध्ये मी माझ्या चक्षुपटलांवर आणू इच्छितो. ग्रंथकारांनी महान थोर संतांनी देखील त्याला खऱ्या अर्थाने बघीतलेले नाही. तो निर्गुण निराकार, सर्वव्यापी, सर्व साक्षी असे अंतीम वर्णन केलेले आहे. आणि हे वर्णन जगातील सर्वच धर्म ग्रंथ मान्य करतात. सगुण, रुप हे फक्त , लक्ष केंद्रीत करण्यासाठी. पंरतु आपण आपली विचारांची हद्द तेथ पर्यंतच नेवून ठेवतो. व त्याला कोणत्यातरी स्वरुपांत दृष्टीपटलावर बघायचा प्रयत्न करतो. हे देखील त्याला ईश्वरानी दिलेल्या पंचेद्रीयातील एक इंद्रीय, ज्याच्या मार्फत हा आपला प्रयत्न असतो. ते दृष्य स्वरुप म्हणून त्याला अंतीम ध्येयामध्ये नेवून ठेवले जाते. त्याचवेळी जीवनाचे ध्येय ईश्वराच्या स्वरुप दर्शनात जावून बसते. त्याच्या लहरीप्रमाणेच त्याच्या दृष्यमय आविष्कारात.  वस्तू जाणणे आणि ती वस्तू अनुभवाने ह्या संकल्पनेत खूप फरक आहे.  सुंदर गुलाबाचे  फुल  बघताना, उंचावरून  पडणाऱ्या  धबधब्याकडे बघताना, पौर्णिमेच्या  शीतल चन्द्राकडे  बघताना, कोकिळेची मधुर तान ऐकताना, इंद्रधानुशाचे रंग बघताना, मोराचा  पिसारा फुललेला  असताना नाच  बघताना,  एक नाही अनेक अश्या गोष्टी बघताना ऐकताना प्रत्येकजण नुसता आनंदात डुबून जात नसतो, तर तो काही क्षण  स्वता:ला विसरून जातो. हीच त्याची ध्यानधारणा होय. आणि जे अशा नैसर्गिक वातावरणाशी एकरुप होतात, तोच त्याचा ईश्वरी अनुभव होय. समोर पसरलेल्या अथांग आणि अगणित वस्तूमध्ये अगदी अनुरेणुमध्ये तो ईश्वर पसरलेला आहे. त्याला अनुभवण्यासाठी दिव्यद्र्ष्टीची गरज आहे म्हणतात, हे सत्य आहे. आमच्या द्दष्टीला वस्तू दिसते,  ती त्या वस्तूची जाण. त्यालाच जेंव्हा दिव्यद्रीष्टी अनुभवते  तोच ईश्वर नव्हे काय? .  म्हणूनच त्याचे स्वरूप निराकार आहे. अपल्या द्दिष्टीक्षेपात, जाणीवेत ज्या ज्या वस्तू येतात ते सारे त्याचेच अंग असते. थेट तुम्ही मी आणि सारा सभोवताल.

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..