पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-क / ११

[ मराठी काव्य : (पुढे चालू) ]

मृत्यूचा उल्लेख असलेली , काव्याची आणखी कांहीं उदाहरणें  पहा –

आतां जायाचंच की कवातरी पट्.दिशी

  • वसंत बापट

मरणाच्या मुहूर्तावर

ओठीं गाणं ओथंबून यावं.

  • सदानंद रेगे

कोणत्याही क्षणीं आम्ही जीवनाच्या प्रवाहातून

मरणाच्या कुरळ्या लाटा कधीच वेगळ्या केल्या नाहींत

करूं शकलो नाहीं , करूं इच्छीत नव्हतो

आणि हेंही आमच्या मरणाचं वैशिष्ट्यच आहे.

  • दिलीप पुरुषोत्तम चित्रे

 

तिरडीवरील शव   :   मी

वाहून नेणारे        :    मी

                                    मागे                  :     मी

अग्नी देणारा        :     मी .

  • वसंत आबाजी डहाके

अगदी हल्लीच्या , म्हणजे २०१० च्या दशकातील, काव्य-संकलनांमधल्या  (anthologies), मासिकांमधल्या आणि अन्यत्र उपलब्ध काव्यातील मरणोल्लेखाची कांहीं उदाहरणें पाहूं या.

खालील दोन कविता-अंश पहा. एकीत, जिच्या आईचा मृत्यू झालेला आहे, अशा अगदी-लहान मुलीचा आक्रोश वर्णला आहे ;  तर दुसरीमध्ये, एका अकाली-मरण-पावलेल्या बालकानें साधलेला संवाद आहे.  –

मम्मी, तूं गेलीस देवाघरी

पोरके झालोय् आम्ही

अवकळा पसरलेय सारी

ह्या अपुल्या घरीं.

  • व्हॅलेरियन डिसोजा

 

मला आतां  कबरस्थानात शोधूं नका

फुलांनी माझी खाच सजवूं नका

अखंड वाहाणार्‍या अश्रूंनी मला भिजवूं नका.

  • जेम्स मा. परेरा

( दोन्हीसाठी संदर्भ : ‘सुवार्ता’, डिसेंबर २०१६, नाताळ विशेषांक ) .

एक वृद्धाची, जीवन-संगिनीच्या मृत्यूमुळे उद्भवलेल्या चिर-विरहाची, ही व्यथा पहा –

अशीच अचानक निघून गेलीस

आतां मी कोणाच्या आधारें जगावें ?

…..

सर्व प्रश्न कसे अनुत्तरित आहेत,

सर्व प्रश्नांचें उत्तर फक्त एकच आहे –

‘मी तुझ्यामागें असेंच निघून यावें’ .

  • रणछोड गडे

शेतकर्‍याच्या हताश मनाची, मरणाला कवटाळण्याची ओढ पहा –

नाहीं कुणाचा आधार , असा झालो मी बेजार

आणि शेवटी घेतला मी

आत्महत्येचा आधार , आत्महत्येचा आधार.

  • संतोष वसंत तावडे

एका व्याधिग्रस्ताने पेऽन-किलर (Pain-Killer) व मरणाचा संबंध जोडलेला इथें पहा –

.. बंदुकीची गोळी परवडली

ती एकदाच मारते

पेऽन-किलर

कणाकणानें मारतें

नकळत.

…..

पेऽन-किलरशिवाय

पर्याय नाहीं

आजचें मरण

उद्यावर ढकलणे

रहात नाहीं.

( पेऽन किलर :  Pain Killer)

  • निशिकांत नाईक.

 

मरण दूर आहे असें हा कवी म्हणतो खरा, पण तें त्याला रोज दिसत असतें. खरें तर, ‘Wearer knows where the shoe pinches’ , या उक्तीप्रमाणें,  व्याधिग्रस्ताची व्यथा, आणि, ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असा त्याचा मरण-दर्शनाचा अनुभवही,  एक व्याधिग्रस्तच योग्य प्रकारें जाणूं शकतो. तरीही, व्याधिग्रस्ताची व्यथा, त्याला होत असलेलें रोजचें मृत्युदर्शन, त्याच्या माथ्यावर लटकणारी Democles’ Sword या गोष्टी आपल्या मनाला भावविवश करतात.

देहाच्या-अंताशी संबंधित, हा  आगळा विचार पहा  खालील कांहीं कवितांमध्ये –

मी मेल्यावर माझ्या मृत शरीरास

नका देऊं अग्नीचे चटके

एक मात्र करा जरूर,

जवळच्या देहदान स्वीकारणार्‍या

हॉस्पिटलला फोन करा जरूर .

  • सुभाष शांताराम जैन

 

खडतर जगणें क्रमप्राप्त आहे , मरण अटळ आहे

आतां एकच इच्छा आहे , देहदान तरी घडावें.

  • साधना कृ. खाडीलकर

 

सुंदर ते दान । असे देहदान ।

पुण्ण्याचे निधान । हेची जाण ।।

गात्रांचे रोपण । रोखणे मरण ।

दु:खाचे हरण । संजीवन  ।।

–    संजीव अंबिके

(पुण्ण्याचें  : पुण्य-चें)

एका मासिकाच्या हल्लीच्या अंकातील एका कवितेचें शीर्षकच आहे, ‘मला मरण आवडूं लागलें आहे’ ( संदर्भ – मासिक ‘साहित्य चपराक, अंक एप्रिल २०१७, कवी राजू मेहकरकर) . म्हणजे, कालच्या काय, आणि आजच्या काय, अनेक कवींना ‘मरण’ या विषयावर विचार करावासा वाटतो, लिहावें असें वाटतें.

*

 

(पुढे चालू) ….

— सुभाष स. नाईक
Subhash S. Naikसुभाष नाईक
About सुभाष नाईक 211 लेख
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची तीन पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. ‘The Earth In Custody’ हे पुस्तक ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी कवितांचें पुस्तक आहे. इतर दोन पुस्तकें ही, ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर आणि इतर अनेक वृत्तपत्रांत/नियतकालिकांत, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…