नवीन लेखन...

मेहता पब्लिशिंग हाउसचे अनिल मेहता

अनिल मेहता यांचा जन्म ३ मार्च १९४१ रोजी निपाणी येथे झाला.

पुस्तकविक्री व्यवसायाचा अर्धशतकाचा अनुभव गाठीशी असलेले आणि प्रकाशनाची चार दशकांची यशस्वी वाटचाल करणारे अनिल मेहता मूळचे निपाणीचे. अनिल मेहता शिक्षणासाठी पुण्यात आले. बी.कॉम. झाल्यावर वेगळे काही करण्याच्या उद्देशातून कोल्हापूरला आले. देवचंद शहा यांनी जागा मिळवून देण्यापासून ते भांडवल उभे करण्यापर्यंतची मदत केली. १९६५ मध्ये कोल्हापूरला ‘अजब पुस्तकालय’ नावाचं दुकान अनिल मेहता आणि त्यांचे बंधू उल्हास मेहता चालवत असत. पुढे पुण्यात अनिल मेहता यांनी मेहता पब्लिशिंग हाऊसची स्थापना केली. व त्याची जबाबदारी आपले चिरंजीव सुनिल मेहता यांच्यावर दिली.

१९८६-८७ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसचा व्यवसाय खूपच लहान प्रमाणात होता. काही मोठे प्रकाशक त्या वेळी डॉमिनेटिंग स्टेजला होते. तसंच आपणही मराठी प्रकाशन व्यवसायात आपलं वेगळं स्थान निर्माण करायला हवं असं ध्येय ठेवून ते व्यवसाय वाढवत गेले. पुढे मेहता यांनी मेहता पब्लिशिंग हाउसच्या माध्यमातून प्रकाशन आणि वितरण क्षेत्रात भरारी घेतली. अग्रगण्य प्रकाशक म्हणून मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशन विश्वात आपला ठसा उमटवला आहे. मराठीतील उत्तम साहित्य प्रकाशित करण्याबरोबरच जगभरातील उत्तम साहित्य मराठी भाषेत आणण्याचे काम मेहता पब्लिशिंग हाऊस गेल्या चाळीस वर्षांपासून करत आहे.

आनंद यादवांच्या ‘माळ्यावरची मैना’ या कथासंग्रहाने मेहता पब्लिकेशनचा प्रवास सुरू झाला. आत्तापर्यंत ४५०० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. विविध भाषांमधील पुस्तकांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांनी बंगाली, गुजराती, हिंदी, कानडी या भाषांमध्ये देखील पुस्तके करायला सुरुवात केली. रणजीत देसाई, वि.स. खांडेकर, व.पु. काळे, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, शांता शेळके, शंकर पाटील, द.मा. मिरासदार, आशा बगे, राजन गवस, दया पवार अशा अनेक मातब्बर लेखकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. २०१२ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसने आपली इ बुक्स तयार करायला घेतली. त्या वर्षभरात जवळपास ६०० ते ७०० पुस्तकं तयार करून त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली. त्या वेळी ॲमेझॉन नुकतंच सुरू झालं होतं आणि रिजनल लँग्वेजेसमध्ये ते आलेलं नव्हतं. २०१३ १४ मध्ये जेव्हा किंडल भारतात आलं तेव्हा यांनी जवळजवळ १६०० पुस्तकं तिथे उपलब्ध करून दिली.

मेहताच्या वाचकांसाठी ‘मेहता मराठी ग्रंथ जगत’, ‘ट्रान्सलेटेड बुक जगत’ यांसारखे ऑनलाईन क्लब्ज आहेत.२०१३ मध्ये डीआरएम तंत्रज्ञान वापरून पहिले मराठी इबुक तयार करणारे मेहता हे पहिले प्रकाशक ठरले.

अनिल मेहता २०१९ मध्ये चिपळूण येथे झालेल्या दुस-या लेखक-प्रकाशक राज्यस्तरीय संमेलनाचे अध्यक्ष राहिले आहेत.
साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, फेडरेशन ऑफ इंडिअन पब्लिशर्स यांच्या वतीने दिला जाणारा ‘एक्सलन्स इन बुक प्रॉडक्शन’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार मेहता पब्लिकेशनच्या पुस्तकांना लाभले आहेत.

अनिल मेहता यांचे चिरंजीव सुनिल मेहता यांचे जानेवारी २०२२ मध्ये निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..