नवीन लेखन...

आजुनी रुसुन आहे

मला हे गाणं आवडतं.तसच रुसायला पण खूप आवडतं. रुसायला कारण लागतं आणि कोणावर रुसायचं हे ही लागतं. परंतु मला कधीच रुसायला मिळाले नाही याच फारच वाईट वाटते. कारण लहानपणी मोठ्या कुंटुबात अशी संधी नव्हतीच. खाणे. कपडे. शिक्षण फार काय लग्नाच्या बाबतीतही आवडनिवड सांगण्याची सोय नव्हती. गपगुमान मोठी माणसं जे सांगतील ते ऐकायचं मग सांगा कसं रुसायचं आणि कोणावर.
पुढे शाळेत गेल्यावरही हीच परिस्थिती होती. सगळ्या आम्ही मुली याच वातावरणात वाढलेल्या. दहा ते पाच शाळा. त्यामुळे तेवढाच वेळ भेट. शिवाय अभ्यास. असायचा जाणे येणे वेळेवरच. पार्टी. सहली. नाटक सिनेमा या ठिकाणी जाण्याचे ठरवणे हे तर अजिबातच नाही. शाळेत ना डबा न पाणी नाही. अर्धा तास मधलीसुट्टी तेव्हा खेळ. गाणी. गप्पा हेच देणे न घेणे. स्पर्धा तर एकमेकीत कशाचीच कधीच नाही. मग सांगा कशाला रुसायचं आणि कोणावर रुसायचं.
लग्नाच्या नतंरही हेच. स्वभावच होता जे आहे त्यात समाधान मानायचे. आणि रुसणे हा प्रकारही नव्हता आमच्या काळी. आहे ते खूप छान आहे असे वाटायचे. तुलना कधीच केली नाही. आणि आपल्या नशिबात जे आहे तेच खरे अशीही एक प्रवृत्ती. त्यामुळे रुसायचा प्रश्नच नाही. पण हल्ली मी बऱ्याच वेळा ऐकते. प्रत्यक्षात कसे रुसायचं आणि रुसवा कसा काढला जातो हे मात्र मी मालिका व चित्रपटात बघते. किती विनवण्या करतात. काय काय देण्याची वचने देतात. अगदी कान पकडून उठाबशाही काढतात. अगदी मलाही कधी कधी वाटतं की समजा मी रुसुन बसले असते तर माझे आहो. हो अहोच म्हटले पाहिजे नवरा म्हणायचे नाही. तर काय सांगत होते. हं मी रुसुन बसले असते तर..
बापरे विचारही करवत नाही. गेली उडत असे दाखवून दिले असते. आणि एवढेच नव्हे तर मलाच उठाबशा काढायला लावले असते. बरं झालं मी कधीच रुसले नाही ते. मग आता सांगा रुसायला कारण नाही तर रुसायचं कस आणि कोणावर रुसायचं.
अस करता करता आयुष्य संपायची वेळ आली. तरीही रुसायला जमले नाही आता कोणावर कशासाठी रुसायचं. एका पोस्ट मध्ये लिहिले होते की जो परावलंबी आहे तो दु:खी म्हणजेच दु:ख असते आणि जो स्वावलंबी आहे तो सुखी म्हणजेच सुख. किती छान शब्दात सांगितले आहे ना? आणि अगदी सोप्या भाषेत व सत्य तेच. आणि आता इतक्या वर्षांनी रुसायला कारण मिळाले आहे आणि तो वरुन सगळे बघतोय आहे ना त्याचावर रुसायचं आहे आणि म्हणायचे आहे की. आज मी रुसुन आहे.
— सौ कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..