नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहार भाग ९

रोटी आणि चपाती यांच्यात आणखी काही फरक आहेत.
भाकरीचे पीठ भिजवताना त्यात तेल घालावे लागत नाही कारण ते हाताला चिकटतंच नाही.
जिथे चिकटपणा जास्त तिथे चिकटपणा कमी करण्यासाठी आपण तेल वापरत असतो.

चपातीचे पीठ (म्हणजे कणिक) मळताना, मात्र त्यात तेल घालावे लागते. म्हणजे ते हाताला चिकटत नाही. तेल घालून देखील कणिक हाताला चिकटतेच. एवढा चिकटपणा या गव्हामधे आहे.

हा चिकटपणा येण्याचे कारण ?
त्यातील ग्लुटेनीन नावाचे द्रव्य. अतिशय चिकट असते.

आणि हे ग्लुटेनीन जसे हाताला चिकटते तसे आतड्यांनाही चिकटून बसते. केवळ आपणच चिकटते असे नाही तर, मागून येणाऱ्या चांगल्या अन्नालापण चिकटवते. मग ट्रॅफीकजाम होणारच !

एक गाडी अडकली की मागून येणारी सर्व वाहाने सुस्थितीत जरी असली तरी, काहीही हालचाल करू शकत नाही. जैसै थे पोझिशनमधे राहातात. अगदी तसेच होते, या ग्लुटेनीनच्या चिकटपणामुळे. म्हणजेच गव्हामुळे !

आतड्याला चिकटलेला हा ग्लुटेनीनचा भाग मागून येणाऱ्या सकस अन्नाला पण पुढे जाऊ देत नाही. म्हणजे आपण स्वतःही गडबड करतो, आणि दुसऱ्यालाही चांगले काम करू देत नाही.

या सर्व दुर्गुणांमुळे आज पाश्चात्य देशात ग्लुटेन फ्री डाएट ही संकल्पना जोर धरत आहे. त्यांच्या कुत्र्यांना देखील ग्लुटेन फ्री बिस्कीटस बनवू लागले आहेत.

दिवाळीसाठी सुद्धा ग्लुटेन फ्री बिस्कीट खायची ? अशा आशयाची एक जाहीरात आपणदेखील सध्या टीव्हीवर पाहात आहोतच.

बहुतेक पाश्चात्य देश हे थंड हवामानाचे आहेत, त्यांच्याकडे ऊत्पादीत होणाऱ्या पिकांमधे गहू हे मुख्य पिक आहे. हवामान गव्हासाठी पोषक आहे. साहाजिकच उत्पादन जास्त येते.

करायचे काय एवढ्या धान्याचे ?
मुळात लोकसंख्या कमी. मग खाऊन खाणार तरी किती ? उरलेला गहू पशुधनाचे पोषण करण्यासाठी, मांस आणि चरबी वाढवण्यासाठी वापरला जातो, अगदी धान्याची दारू, त्याच्या पीठाची दारू, कुजुन फुकट गेलेल्या गव्हाची दारू इ.इ. अनेक प्रकारची व्हिस्की ब्रॅण्डी रम असे उत्पादन करून देखील गहू उरतो.

त्यांच्या देशातील सरकारला त्यांच्या आरोग्याची खूप काळजी असल्याने ग्लुटेन फ्री डाएटची संकल्पना रूजली. आणि उरलेला गहू, शाकाहारी बहुलोकसंख्या असलेल्या आणि लोकांवर नियंत्रण नसलेल्या, देशात खपवायला सुरवात केली. जनतेची काळजी नसलेल्या सरकारला विदेशी प्रशिक्षण दिल्यावर ते सरकार नमते घेते, असा पुर्वानुभव असल्याने अशा देशात सरकारी वरदहस्ताने गहू प्रमोशन मोहीम सुरू झाली. त्यामुळे आमचे माजी कृषीमंत्री यांनी, शेतकऱ्यांनी शेती सोडून मद्य निर्मिती करावी, असा सल्ला दिल्याचे आपणाला स्मरत असेलच.

आणि…….
घरच्या उत्पादीत तांदुळाऐवजी विकतचा गहू आणून खाण्याला आम्ही भारतीय स्वतःला धन्य समजू लागलो.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
25.10.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..