एक क्रिकोडे

एका संघाचा फलंदाजीचा एक डाव असा होता :

अ‍ॅटकिन्स ६ धावा
बॉडकिन्स ८ धावा
डॉकिन्स ६ धावा
हॉकिन्स ६ धावा
जेनकिन्स ५ धावा
लार्किन्स ४ धावा
मिकिन्स ७ धावा
पर्किन्स ११ धावा
सिम्किन्स ६ धावा
टॉमकिन्स ० धावा
विल्किन्स १ धाव
अवांतर धावा शून्य.
एकूण सर्वबाद ६०.
गोलंदाजी :
पिचवेल १२.१ षटके, २ निर्धाव, १४ धावा, ८ बळी.
स्पीडवेल ६ षटके, ० निर्धाव, १५ धावा, १ बळी.
टॉसवेल ७ षटके, ५ निर्धाव, ३१ धावा, १ बळी.
हा सामना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होता :
  1. या सामन्यात धावा फक्त एकेरी धावा आणि चौकार या स्वरुपातच आल्या.
  2. कोणताही खेळाडू झेल घेऊ शकला नाही, कुणीही नो-बॉल टाकले नाहीत किंवा कुठेही शॉर्ट रन झाली नाही.
  3. स्पीडवेल आणि टॉसवेल यांनी एकाच हप्त्यात गोलंदाजी केली.
  4. पिचवेलने डावातील पहिला चेंडू टाकला- फलंदाज होता अ‍ॅटकिन्स. स्पीडवेल हा दुसरा सलामीचा गोलंदाज होता.
  5. प्रत्येक षटकात सहा चेंडू होते.
एवढ्या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या :
  1. स्पीडवेल आणि टॉसवेलला कुणाचे बळी मिळाले?
  2. नाबाद कोण राहिले?
  3. प्रत्येक गडी बाद होताना संघाची धावसंख्या काय होती?
संदर्भ : दी आर्ट ऑफ क्रिकेट– सर डोनल्ड ब्रॅडमन (पुस्तकात उत्तर मात्र नाही.)

 

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....