नवीन लेखन...

गजाननासी वंदन करुनी

मराठी रंगभूमीवरील नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून दिवंगत बाळ कोल्हटकर यांचे नाव सर्वांना परिचित आहे. त्यांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘दुरितांचे तिमीर जावो’, ‘देव दीनाघरी धावला’ या नाटकांनी मराठी रंगभूमीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. कुटुंबातील सर्वांना एकत्र बसून बघता येतील अशी कुटुंबवत्सल, मध्यमवर्गीयांचे भावविश्व दाखवणारी नाटके त्यांनी रंगभूमीवर सादर केली. त्यांची ‘सीमेवरून परत जा’, ‘देणाऱ्याचे हात हजार’, ‘उघडले स्वर्गाचे दार’ ही नाटकेही रंगभूमीवर गाजली. आजच्या ‘गीतगणेश’मध्ये कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातील एक गीत घेतले आहे. हे नाटक १९६४ मध्ये रंगभूमीवर आले. त्यात स्वतः कोल्हटकर यांची प्रमुख भूमिका होती. याच नाटकातील हे गणेशगीत. जाहीर कार्यक्रम, प्रकट मुलाखत तसेच दूरदर्शनवरील कार्यक्रमातून कोल्हटकर यांनी हे गीत अनेक वेळा सादर केले. कोल्हटकर यांच्या खास शैलीत सादर होणारे हे गीत आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

हे गाणे स्वतः कोल्हटकर यांनीच लिहिले असून त्याचे संगीतही त्यांचेच आहे. पुढे त्याची कॅसेट निघाली आणि त्यात हे गाणे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांनी गायले. साधी, सोपी आणि प्रासादिक शब्दरचना हे या गाण्याचे वैशिष्ट्य. कोल्हटकर हे गाणे त्यांच्या खास शैलीत सादर करायचे. गणेशोत्सवाच्या काळात सध्या हे गाणे फारसे वाजवले जात नसले तरी एकेकाळी ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे नाटक आणि त्यात कोल्हटकर यांनी सादर केलेले हे गीत खूप गाजले होते.

गजननाला वंदन करोनी
सरस्वतीचे स्तवन करोनी
मंगल शिवपद मनी स्मरोनी
सद्भावाने मुदीत मनाने
अष्टांगाची करोनी ओंजळ
वाहतो ही दुर्वांची जुडी

अभिमानाला नकोच जपणे
स्वार्थासाठी नकाचे जगणे
विनम्र होऊनी घालव मनुजा
जीवन हे हर घडी
वाहतो ही दुर्वांची जुडी

विघ्न विनाशक गणेश देवा
भावभक्तीचा हृदयी ठेवा
आशिर्वाद हा द्यावा मजला
धन्य होऊ दे कुडी
वाहतो ही दुर्वांची जुडी

पार्वतीनंदन सगुण सागरा
शंकर नंदन तो दुःख हरा
भजनी पुजनी रमली देवा प्रतिभा नयनी खडी
वाहतो ही दुर्वांची जुडी

-शेखर जोशी, डोंबिवली

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मध्ये प्रकाशित झालेला  श्री शेखर जोशी यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..