नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ९)

हळू हळू लोक मला बऱ्यापैकी ओळखु लागले होते. माझे काव्य वाचन, कथाकथन , साहित्य, कला ,संस्कृती , माझे संत , माझी चित्रे , संतांचा कल्याणकारी स्पर्श , ज्येष्ठत्वाची जाणीव अशी अनेक विषयावरची व्याख्याने होत राहिली अजुनही होत आहेतच . संतांचा कल्याणकारी स्पर्श हे व्याख्यान आतापर्यंत पुण्यात व पुण्याबाहेर तर सुमारे 250 वेळ झाले . […]

प्रसिद्ध सनईवादक पं. शैलेश भागवत

शैलेश भागवत यांचे आकाशवाणी वरून अनेक वेळा सनई वादनाचे कार्यक्रम झाले आहे. त्यांनी भारताबरोबरच दुबई,अमेरिका, युरोप आणि श्रीलंका येथे ही अनेक कार्यकम केले आहेत. शैलेश भागवत यांनी अनेक मोठ्या कलाकारांच्या बरोबर सनईच्या जुगलबंदीचे कार्यक्रम केले आहेत.तसेच परीक्षक म्हणून शैलेश भागवत यांनी अनेक स्पर्धेसाठी काम केले आहे.  […]

गीतकार मजरुह सुलतानपुरी

मजरुह सुलतानपुरी आणि एस. डी. बर्मन यांची जोडी चागलीच जमली होती त्यांनी अनेक हिट गाणी दिली. परंतु त्यांनी नौशाद , मदन मोहन , रोशन , रवि , शंकर जयकिशन , ओ . पी . नय्यर , उषा खन्ना , लक्ष्मीकांत-प्यारेलाल , अन्नू मलिक , आर. डी . बर्मन , राजेश रोशन , जतीन – ललित , लेस्ली लेज लेव्हीज , आनंद मिलिंद , आणि ए . आर. रहमान या संगीतकारांबरोबर गाणी केली. नीट पाहिले तर तीन-ते-चार पिढ्याबरोबर काम केले. संगीतकार बदलले , हिरो बदलले परंतु बदलत्या काळाबरोबर , लोकांबरोबर ते लिहीत राहिले. त्याशिवाय उत्तमोत्तम गजल त्यांनी लिहिल्या. […]

कलामहर्षी बाबूराव पेंटर

दादासाहेब फाळके यांनी सिनेमा कलेला जन्म दिला. पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! ‘बाबूराव’ करवीर नगरीतील म्हणजे त्या काळच्या कोल्हापूर संस्थानातील एक असामान्य कलावंत! बाबूरावांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेतील त्यांचे असामान्य कौशल्य पाहून कोल्हापुरातील चाहत्यांनी त्यांचे नामकरण बाबूराव पेंटर केले. ते एक चतुरस्र् कलाकार होते. […]

जागतिक दुध दिन

भारतीय ग्रामीण भागातील विकासात धवल क्रांतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉ. कुरियन यांनी अनेक ग्रामीण भागात स्वाभिमानाने व स्वैराचाराने व्यवसायाला चालना दिली व दुधाचा महापूर घडवून आणला. स्वत: ला एक थेंब ही दुध आवडत नसणारे डॉ. कुरियन यांनी सहकार चळवळीतून धवल क्रांती साकारून दुग्ध व्यवसायातून ग्रामीण विकासाचे श्वासात आणि यशस्वी मॉडेल उभे केले. व्हर्गीस कुरीअन यांना जगात Milk Man म्हणून ओळखत असत. […]

मायमाऊली मराठी

माऊली मराठीच माझी मायबोली.. ज्ञानयोगीयांची कनवाळू माऊली.. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या.. स्वसंवेद्या मराठी माझी मायबोली..।।..१ ज्ञानेश्वरी , ही ज्ञानेश्वर माऊलीची.. अभंगगाथा तुकयाची भक्तीरंगली.. भाषाबोध सकल संतसद्गुरूंचा.. माऊली मराठीच माझी मायबोली..।।..२ शब्द मराठीच अस्मिता अंतरीची.. गीता,भागवत,दासबोधादी ग्रंथाली.. अक्षर , अक्षर , साक्षात्कार कृपाळू.. माऊली मराठीच माझी मायबोली..।।..३ माझ्या मराठीचा मला स्वाभिमान.. जगतवंद्य ! ती जगतवंद्य शोभली.. […]

दीपस्तंभ – मी आणि ती (कथा)

खरे तर ती माठ होती माठ . मुख्य म्हणजे तिलाही त्याची कल्पना होती. तरीपण त्याचे बऱ्यापैकी नाव होते,चित्रकलेच्या समीक्षेत अर्थात तिला चित्रे काढणे नीट जमत नव्हती.समीक्षकांचे हेच दुखणे आणि हाच प्लेस पॉईन्ट असतो.हे पण तिला माहीत होते फक्त , बडबड्या बिन्धास स्वभावामुळे ती सर्वाना परिचित होती. […]

कोकण – ग्रीष्माचे आणि पावसाळ्याचे

कोकणी माणूस  दणक्यात होळी साजरा करून सुखावलेला असतो. चैत्राचे आगमन होते. चैत्रपालवी झाडांवर फुलू लागलेली असते. चैत्र संपून वैशाख सुरु होतो. कोकणाला उन्हाचे चटके जाणवू लागलेले असतात. मातीचा लाल रंग उठून दिसू लागतो……. […]

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ९

सगळे परत त्रिकोणी नगरात आले होते. एरटोस्थिनिस काकांचेही कांम आटोक्यात आले होते. आज संध्याकाळी सगळे एकत्र जेवण करत होते… सायलीला इथली शेपूची भाजी खावी लागत होती आणि आता थोडी थोडी आवडू लागली होती… (कुणाला सांगू नका प्लिज)… नॉट बॅड, पटकन गिळून टाकली की झालं… […]

लढा सीमेचा- लढा अस्मितेचा !! (भाग २)

राजकीय स्वार्थापोटी मराठी माणसात फूट पाडून हे आंदोलन कायमचे बंद पाडण्याचा घाट कर्नाटक सरकारने चालविला आहे. राष्ट्रीय पक्षाचे नेते राष्ट्रीयत्वाचे धडे देऊन मराठी माणसाला आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपमतलबी नत्यांचे कुटील कारस्थान ओळखून मराठी माणसाने आता वेळीच सावध झाले पाहिजे. नाहीतर सगळेच गमावून बसावे लागेल … कायमचे! हुतात्म्यांनी बलिदान दिले ते माय मराठीच्या रक्षणासाठी… संस्कृतीच्या संवर्धनासाठी! […]

1 24 25 26 27 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..