नवीन लेखन...

समीक्षक वा. ल. कुलकर्णी

१९४० साली ‘ समीक्षक ‘ चे संपादक असलेल्या कुलकर्णी यांनी अभिरुची , सत्यकथा , छंद यासारख्या नियतकालिकातून सातत्याने समीक्षा-लेखन केले. त्यांचे समीक्षा लेखनाचे ऐकून आठ संग्रह आहेत. याशिवाय श्री. कृ . कोल्हटकर , ह . ना. आपटे , न.चि . केळकर यांच्या वाङ्मयासबंधी स्वतंत्र लेखन केले. त्यांच्या उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ म्ह्णून त्यांच्या वाङ्मयीन टिपा आणि टिप्पणी आणि श्रीपाद कृष्ण वाङ्मयदर्शन या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषेंके मिळाली आहेत. […]

सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅन

वयाच्या सतराव्या वर्षी त्याने ब्रूस ली च्या ‘ फिस्ट ऑफ फ्यूरी ‘ आणि ‘ एंटर द ड्रॅगन ‘त्याने मध्ये स्टंटमन म्ह्णून काम केले. एटर द ड्रॅगन मध्ये तो ब्रूस ली बरोबर फाईट करताना दिसतो. पुढे त्याने अनेक चित्रपटात कामे केली . रश अवर , पोलीस स्टोरी , शांघाय नून , शांघाय नाइट्स अशी कित्येक नावे घेता येतील. तो अनेक वेळा स्टंट करताना जखमीही झालेला आहे. […]

अजरामर महाराष्ट्र गीताचे लेखक राजा बढे

राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. शाहीर साबळे यांनी तर त्यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे अजरामर ‘ महाराष्ट्र गीत ‘ गायले. […]

निळ्या डोळ्यांचा जादूगार !

राजकपूर ही खरंतर एक संस्थाच ! निर्विवाद अधिराज्य करणारी, पूर्णतेचा ध्यास घेणारी. कोठलीही तडजोड न करणारी. तो स्वतःच एक पांढरा रुपेरी पडदा होता – बाह्यतः सारं काही मिरविणारा, पण आतमध्ये कुठेतरी खोलवर एक धुमसत्या कलागुणांचा ज्वालामुखी घेऊन हिंडणारा ! “जोकर ” च्या नेमक्या अपयशापाशीच खरंतर राज कपूर संपला. हे मरण जिव्हारी बाळगत त्याने ” बॉबी “, ” सत्यम शिवम ” सारखी आपल्या पराभवाची थडगी बांधली. […]

माझा मित्र सतीश भिडे

अखंड भारताच्या घोषणांनी मसुरी, नैनितालची थंडी गायब. देशातील अब्दुल -नारायण – डिसुझा हाच भारताचा मालक असून, खरा धर्म हा केवळ राष्ट्रधर्म आहे असे कळकळीचे आवाहन वीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे ह्यांनी नुकतेच मसुरी, नैनिताल येथे केले. […]

माझा मित्र कवी प्रवीण दवणे

नुकतेच प्रवीण दवणेचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले , त्यापैकी एकाचे प्रकाशन दुबईमध्ये झाले. ‘ आमी ‘ नावाची आखाती देशांची आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यांनी मिळून पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा दुबईत नुकताच झाला झाला .,तेथे प्रवीण दवणेचा ‘ नवी कोरी सांज या मराठी कविता संग्रहाचे प्रकाशन झाले , त्या कवितांचे वाचन तिथे झाले तेव्हा सर्व जणांनी त्याला उस्फुर्त प्रतिसाद दिला. […]

दु:खी अनूभवी

दु:ख जाणण्या दु:खी व्हावे, या परि अनूभव दुजा कोणता सत्य समजण्या कामी न येई, तेथ कुणाची कल्पकता  १ धगधगणारे अंगारे हे, जाळती जेथे काळीज शब्दांचे फुंकार घालूनी, येईल कधी का समज  २ मर्मा वरती घाव बसता, सत्य येते उफाळूनी चेहऱ्यावरले रंग निराळे, हलके हलके जाती मिटूनी ३ त्या दुःखीताला जाणीव असते, जीवनामधली निराशा कशी झेप घेवूनी […]

कवी, गीतकार प्रवीण दवणे

अनेक कविता प्रवीण दवणे यांनी लिहिल्या दुर्देवाने का सुदैवाने तो कुठल्याही कंपूत सामील झाला नाही हे महत्वाचे . आजही त्याचा कार्यक्रम झाला की तो तिथून निघतो , नंतरचा अंक नसतो , म्हणून संयोजकांना तो परवडतो. पाकीट घेतले, झोळी घेतली की निघाला इतका प्रक्टिकल . कार्यक्रम झाला आता ‘ बसू ‘ हा सर्वमान्य प्रकार त्याच्या आयुष्यात नाही , कारण तो कधीच स्वतःला ‘ संपवणारी ‘ कामे करत नाही . तो तसे करत नाही म्हणून तो आजही भरपूर लिहितो, टीकाकार काहीही बोलो त्याला काहीही फरक पडत नाही , फरक टीकाकार यांनाच पडतो कारण त्याच्यावर जळण्यातच त्यांची शक्ती खर्च होते. […]

तुळस : कल्पवृक्ष

आपल्या अंगणात असलेली तुळस. हिची आपण तुलसी माता म्हणून पूजा करतो. त्याचे कारण काय आहे हे माहीत आहे का तुम्हाला ? ….. हे झाड अनेक आजारावर गुणकारी औषध पुरविते. तुळस म्हणजे ‘वनस्पती लहान पण गुण महान’’ असे आहे. […]

भुविका…

मुळात भुविकाचा दोष काय होता??? ती सुंदर होती हा तिचा दोष??? की तिने समीरला नकार दिला हा तिचा दोष…अद्याप समीर फरारच…आपल्या कायद्यात एवढ्या पळवाटा आहेत, तो सापडला तरी त्याला शिक्षा होणार का??? हा मोठा प्रश्न आहे. भुविका सारख्या अनेक निष्पाप तरुणींचा बळी घेणारे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत…… […]

1 12 13 14 15 16 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..