नवीन लेखन...

पुण्यनगरी काशी – भाग २

दरभंगा, गंगामहाल, सिंदीया, नेपाळ या घाटांची भव्यता व शिल्पकला डोळयात भरणारी. पुढे अहिल्याबाई होळकर, नागपूरकर भोसले, वैद्य अशा अनेक घाटांची मालिकाच आहे. प्रत्येकामागे इतिहास आहे. विष्णु, पार्वती, विनायक व अनेक देवतांची मंदिरे यांनी घाट सजलेला आहे. काशीचे घाट आणि रंगीबेरंगी छञ्या यांचे अतूट नाते आहे. छञ्यांच्या खाली पुरोहित व न्हावी आपली कर्मे मन लावून उरकत असतात. […]

मक़्ता – शब्दार्थ आणि उगम

हा मूळ अरबी शब्द फारसीद्वारें भारतात शिरलेला आहे. ग़ज़लच्या अखेरच्या शेरला मक़्ता कां म्हणतात ? तर, यानंतर गज़लाच शेवट होतो, आणि त्यानंतर शायर व श्रोते यांची ताटातूट होते. उर्दूतील हल्लीची प्रथा अशी आहे की, शायरचें गुंफलेल्या शेरला ‘मक़्ता’ म्हणतात, आणि शायरचें नांव नसलें तर त्याला  केवळ ‘आ.खरी शेर’ असें म्हणतात. […]

मनांत घर केलेलं तरंगतं अदभुत खेडं – पेरु – उरोस

चारेकशे वर्षांपूर्वी स्पॅनिश लोकांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ‘इंकापूर्व’ लोकांनी तलावाच्या पाण्यात तरंगती घरे बांधून अशा त-हेने आश्रय घेतला. पूर्वीची दोन-तीन हजार कुटुंबाची संख्या आता पाच सहाशे कुटुंबापर्यंत आली आहे. अशी अंदाजे साठ-पासष्ट तरंगती खेडी आहेत म्हणे लेक टिटिकाकामध्ये. सगळी दहा ते बारा फूट खोल पाण्यात. तोतोरा गवत वाळवून त्याचे भारे उलट सुलट एकमेकावर पसरून व भक्कम लाकडांच्या व दोरीच्या साहाय्याने बांधून तयार केलेल्या सहा ते आठ फूट जाडीच्या चटया म्हणजे ही तरंगती खेड्याची जमीन. ही खेडी साधारण तीस ते तीनशे चौ. मीटरपर्यंत कोणत्याही आकाराची. […]

अहिल्योध्दार : गोमंतकीय रंगभूमीचा पाया

गोव्यात गावागावात जेवढी म्हणून देवस्थाने आहेत, तेवढाच नाट्यमंडळांचाही आकडा आहे. गोव्यातील नाट्यपरंपरा कधीपासून सुरू झाली, याला अनेकांचे दुमत आहे. परंतु “अहिल्योध्दार” नाटकाच्या मूळप्रतीवरून एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच गोमंतकीय रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असावी असे अनेक जाणकारांचे मत. गोव्याचे संतकवी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर लिखित “अहिल्योध्दार” या नाटकाच्या प्रतीवरून आणि त्यांंच्या इतर लिखाणावरून जाणकारांनी कृष्ण जगन्नाथ […]

1 14 15 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..