नवीन लेखन...

पुण्यातील ‘राष्ट्रीय फिल्म संग्रहालय’ (नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया)

स्थापना : १ फेब्रुवारी १९६४ या ‘राष्ट्रीय फिल्म संग्रहालय’त भारतीय सिनेमाचा ऐतिहासिक खजिना आहे. खरं तर आजच्या ‘डिजिटल’ युगात कोणीही टेक्नोसॅव्ही चित्रपट चाहता म्हणतो, ‘माझ्याकडील हार्ड डिस्कमध्ये दोन हजार फिल्म्स आहेत.’ आज असा व्यक्तिगत संग्रह सहज शक्य आहे. पण गेल्या शतकात याचा मागमूसही नव्हता, त्या काळात ‘चित्रपट संग्रहालय’ ही कल्पना उदयास आली. खरं तर सिनेमा जन्माला […]

मराठी लेखक, समीक्षक, प्राचार्य मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर

म.द. हातकणंगलेकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे झाला. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हातकणंगलेत झाले. वडिलांच्या अकाली निधनामुळे ते मामाकडे सांगलीत आले आणि सांगलीकर होऊन गेले. १९४४ मध्ये ते मॅट्रिक झाले आणि १९४६ साली त्यांनी विलिंग्डन कॉलेजात असताना इंटर आर्ट्‌सच्या परीक्षेत तर्कशास्त्र या विषयासाठी ठेवलेले प्रसिद्ध असे सेल्बी पारितोषिक मिळविले. नंतर, १९४८ […]

जॅकी श्रॉफ

‘हिरो’ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या जॅकी श्रॉफ यांचा जन्म गुजराती कुटुंबात झाला होता. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९६० रोजी झाला. जॅकी श्रॉफ यांचे पूर्ण नाव जय किशन श्रॉफ. सिनेमांत झळकण्यापूर्वी जॅकी यांनी काही जाहिरातीत काम केले होते. सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ यांना ‘हिरो ‘ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये लाँच केले. या सिनेमात त्यांचे नाव जॅकी […]

ज्येष्ठ संगीतकार व संगीत संयोजक अनिल मोहिले

‘श्रावणात घननिळा बरसला’ या गाण्यातील गोडवा अथवा ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजीये’ या गाण्यातील ठसका योग्य वाद्यमेळाच्या आधारे खुलवून ती अधिक कर्णप्रिय करण्याचे कसब लाभलेले अनिल मोहिले यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. त्यांना त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि तरंगवाद्याचं बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी […]

ए. के. हनगल

‘शोले’ चित्रपटातल्या ‘इतना सन्नाटा क्यों है भाई ?’ हा संवाद अजरामर करणारे आणि अनेक चित्रपटांमध्ये वयस्कर वडील आणि आजोबांच्या व्यक्तिरेखांमुळे सर्वसामान्यांच्या परिचयाचे असलेले चरित्र अभिनेते अवतार किशन उर्फ ए.के. हनगल म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१७ रोजी झाला. जुन्या चित्रपटांमध्ये नायक किंवा ना‌यिकेचे वडील म्हणजे ए.के. हनगल अशीच प्रतिमा चित्रपट रसिकांच्या […]

महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव

सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांची ओळख महाराष्ट्रातील व्यासंगी-प्राच्यविद्यापंडित व मराठी कोशसाहित्यकार, महामहोपाध्याय अशी होती.डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळा’त सहसंपादक म्हणून त्यांची १९२१ मध्ये नियुक्ती झाली. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १८९४ पुणे येथे झाला. महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील वेदविद्या खंडाच्या संपादनकार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. महाराष्ट्रात ऋग्वेदविषयक अध्ययनाचा पाया घालून त्यांनी संपूर्ण ऋक्‌संहितेचे मराठी भाषांतर प्रथम प्रकाशित केले […]

नाटककार मो.ग.रांगणेकर

बहुरंगी आणि बहुढंगी अशा मिष्कील व्यक्तिमत्त्वाच्या मोतीराम गजानन रांगणेकर उर्फ मो.ग.रांगणेकर यांची १९२४ साली संपादक या नात्याने कारकीर्द सुरू झाली. त्यांचा जन्म १० एप्रिल १९०७ रोजी झाला. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी एक कवडी नसतानाही स्वत:चे साप्ताहिक काढले. ‘तुतारी’, ‘वसुंधरा’, ‘चित्रा’, ‘आशा’ ही त्यांची गाजलेली साप्ताहिके, त्याचप्रमाणे ‘अरुण’, ‘सत्यकथा’, ‘नाट्यभूमी’ ही त्यांची गाजलेली मासिके होत. संपादक या नात्याने नाना […]

प्रतिभावंत हृदयशल्‍यविशारद डॉ. मायकेल डिबाकी

डिबाकी कायमच प्रसिद्धीच्‍या झोतात राहिले. त्‍यांच्‍या ७० वर्षांच्‍या अत्‍यंत यशस्‍वी वैद्यकीय कारकीर्दीत साठ हजारांपेक्षा जास्‍त हृदय-शस्‍त्रक्रिया डिबाकी व त्‍यांच्‍या सहकार्‍यांनी डिबाकींच्‍या अध्‍यक्षेतखाली यशस्‍वी केल्‍या. यामध्‍ये अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जॉन एफ. केनेडी, लिंडन जॉन्‍सन, रिचर्ड निक्‍सन, ड्यूक ऑफ विंडसर, जॉर्डनचे राजे हुसेन, रशियाचे अध्‍यक्ष बोरिस येल्त्सिन, इराणचे शहा तसेच मार्लिन डिट्रिच यांच्‍यासारखे हॉलिवूड मधील तारे, तारका यांच्यावरील हृदय-शस्‍त्रक्रियांचा समावेश होता. […]

१ फेब्रुवारी १८८३ ला ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित

‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ कडून प्रकाशित केला जाणारा हा इंग्रजी भाषेतील शब्दकोश आहे. १८५७ साली इंग्लंडमध्ये ‘फायलॉजिकल सोसायटी’च्या काही अर्ध्वयूंना तेव्हा उपलब्ध असलेले सारेच शब्दकोश अपुरे आहेत, असे वाटू लागले आणि त्यातून ‘ऑक्सफर्ड’ या सुप्रतिष्ठित शब्दकोशाचा जन्म झाला. १८८४ मध्ये ‘A New English Dictionary on Historical Principles’ या नावाने पहिल्यांदा हा शब्दकोश प्रकाशित झाला. १८९५ मध्ये सर्वप्रथम […]

दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे

कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी… रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी […]

1 21 22 23 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..