नवीन लेखन...

ए. के. हनगल

‘शोले’ चित्रपटातल्या ‘इतना सन्नाटा क्यों है भाई ?’ हा संवाद अजरामर करणारे आणि अनेक चित्रपटांमध्ये वयस्कर वडील आणि आजोबांच्या व्यक्तिरेखांमुळे सर्वसामान्यांच्या परिचयाचे असलेले चरित्र अभिनेते अवतार किशन उर्फ ए.के. हनगल म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१७ रोजी झाला. जुन्या चित्रपटांमध्ये नायक किंवा ना‌यिकेचे वडील म्हणजे ए.के. हनगल अशीच प्रतिमा चित्रपट रसिकांच्या मनांमध्ये होती. काश्मिरी पंडितांच्या घरात जन्मलेल्या हनगल यांचे मूळ पाकिस्तानमधील सियालकोट येथील. परंतु आईच्या निधनानंतर त्यांचे लहानपण पेशावर येथे गेले. १९३७-३८ मध्ये ‘जुल्म-ए-कंस’ या नाटकातील नारदाची व्यक्तिरेखा साकारून हनगल रंगभूमीवर पदार्पण करते झाले. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी शिंपी बनण्याचेठरवले. १९२९ च्या सुमारास त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातही उडीघेतली. १९४७ ते १९४९ अशी दोन वर्षे त्यांनी कराचीच्या मध्यवर्ती कारागृहात कारवासही भोगला. डाव्या विचारसरणीचे हनगल स्वातंत्र्यसंग्रामात लढत असतानाच रंगभूमीकडे आकर्षिले गेले. १९४७ मध्ये ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’च्या (इप्टा) अहमदाबाद येथील वार्षिक परिषदेला त्यांनी हजेरी लावली. भारतातील या पहिल्या प्रवासा नेत्यांना भुरळ घातली. तेथे सादर झालेल्या आशयघन नाटकांनी त्यांचे चित्त वेधले. के. ए. अब्बास, बलराज सहानी, डॉ. राजाराव आणि दिना पाठक यांच्या सारख्या मातब्बर सिनेकर्मींशी त्यांची मैत्री झाली.

पन्नासच्या दशकात अवघे २० रुपये घेऊन हनगल यांनी आपले वास्तव्य मुंबईला हलविले. बलराज साहनी आणि चेतन आनंद यांनी हनगल यांना चित्रपटात काम करण्यास प्रोत्साहन दिले. प्रारंभी काहीसे अनुत्सुक असलेले हनगल, राजकपूर यांच्या ‘तिसरी कसम’ या चित्रपटासाठी प्रथमच कॅमेरा समोर उभे राहिले. प्रत्यक्ष सिनेमात मात्र त्यांची व्यक्तिरेखा कापण्यात आली. चाळीशी उलटत असताना हनगल चित्रपटसृष्टीत आले. हनगल यांच्या वाट्याला फार महत्त्वाच्या भूमिका आल्या नाहीत. मात्र, प्रत्येक चित्रपटातील त्यांची भूमिका लक्षात राहणारी होती. शोले, शौकीन, नमक हराम, आइना, अवतार, अर्जुन, आंधी, कोरा कागज, बावर्ची, गुड्डी, अभिमान, अनामिका, परिचय अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये हनगल यांनी भूमिका केल्या होत्या. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये हनगल आणि राजेशखन्ना अशी जोडी काय जमलेली होती. ‘आपकी कसम’, ‘अमरदीप’, ‘नौकरी’, ‘थोडीसी बेवफाई’, ‘फिर वही रात’ या सारख्या चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले. त्यानंतर मात्र चरित्र भूमिकां मधून ते प्रेक्षकांच्या भेटतच राहिले. समंजस, तत्त्ववादी, सुसंस्कृत असे वडिल हनगल यांनी पडद्यावर उभे केले.

२००१ मध्ये आशुतोष गोवारीकरच्या लगान मध्ये ते शंभू काकाच्या भूमिकेत दिसले. त्या नंतर ही देवआनंद यांच्या मि. प्राइम मिनिस्टर, पहेली, हम से है जहां या चित्रपटात त्यांनी छोट्या भूमिका त्यांनी साकारल्या. कलर्सवरून प्रसारित होणाऱ्या मधुबाला या मालिकेतली पाहुण्या कलाकाराची भूमिका त्यांची अखेरची भूमिका ठरली. लाइफ अॅण्ड टाइम्स ऑफ ए. के. हनगल हे आत्म‌चरित्र त्यांनी लिहीले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी २००६ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. ७४ वर्षीय विजय हा त्यांचा मुलगा. कॅमेरामन असलेल्या विजय यांनी वृद्धत्वामुळे काम करणे सोडले. ए. के. हनगल यांचे २६ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..