नवीन लेखन...

बघून सूर्यपूजा पावन झालो

हांसत  आली सूर्य किरणे झरोक्यातून देव्हारयांत नाव्हू घालूनी जगदंबेला केली किरणांची बरसात पूजा केली किरणांनी जगन्माता देवीची प्रकाश स्पर्शुनी चरणाला केली उधळण सुवर्णांची तेजोमय दिसू लागले मुखकमल जगदंबेचे मधुर हास्य केले वदनी पूजन स्वीकारते  सूर्याचे रोज सकाळी प्रात:काळी येउनी पूजा तो करितो भाव भक्तीने दर्शन देउन स्रष्टीवर किरणे उधळतो कोटी कोटी किरणांनी तो देवीची पूजा करितो केवळ त्याची पूजा बघुनी मनी पावन मी होतो डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.com

पैस दाखवणारा मालकंस

रस्त्यासमोरील प्रचंड डोंगर चढताना, अंगावर पाउस झेलत आणि डोळ्यासमोरील धुकाळ वाटेत आपली वाट चाचपडत आणि शोधत, डोंगरमाथा खुणावत असतो. हळूहळू आजूबाजूच्या झाडांचा सहवास कमी होत जातो आणि वातावरण अत्यंत निरव, प्रशांत होत जाते. अखेरच्या टप्प्यात तर साधी झुडुपे देखील आढळत नाहीत आणि तरीही अनामिक ओढीने आपण, अखेर डोंगरमाथ्यावर येउन पोहोचतो आणि खाली नजर टाकतो!! खालचा विस्तीर्ण […]

गाण्याच्या कलेची किंमत

एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं डॉ. […]

यंत्रसंपदा आणि आरोग्य

यंत्रयुग, तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ह्यांनी आपली जीवनपद्धती पार बदलून टाकली आहे. आपले आरोग्य आपल्या हाती आहे ह्याची जाणीव आपल्याला व्हायला हवी – त्यासाठीच हा लेख-प्रपंच. यंत्रसंपदा पण वापरायची आणि आरोग्य पण राखायचे ह्याचा मंत्र समजून घ्यायला हवा. आपण वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि पुढच्या पिढीला जाणीवपूर्वक सांगितले पाहिजे. […]

शनिवारच साहित्य : कोजागिरी

आज थोड काहीतरी वेगळ चाललय वाटतं रोज कडू लागायचं आज गोड गोड वाटतंय रंगीत द्रव्य ग्लासा मधलं पांढर आज दिसतंय आज थोड काहीतरी वेगळ चाललय वाटतं कर्कश्य आवाजातील गाणी आणि चमकणारे दिवे आज सगळे शांत फक्त शीतल प्रकाशात नाहणे मैफिलीत आज नाही रोजच्या सारखं दुःख नाही डोळ्यात नमी नाही पैशाचीही कमी आज कसं सार काही सोज्वळ […]

आमचा कट्टा

अस्सा आमचा कट्टा बाई, अस्सा आमचा कट्टा मिळून सार्‍याजणी करतो, गप्पा थट्टा ।। अस्सा आमचा कट्टा कोण म्हणतो ग्रूप करावा, फक्त तरुणांनी आम्ही देखील करू शकतो, आमचि मनमानी भेदभाव नाही येते, छोटा आणि मोठा, अस्सा आमचा कट्टा रोजचा नाष्टा वेगळा, अन् रोजचा बेत वेगळा पावभाजी शेव चिवडा, शिरा चकली वडा लोणची, संत्री केळ्यांचाही, होता चट्टामट्टा अस्सा […]

देह ईश्वरी रूप

स्नान करूनी निर्मळ मनीं,   दर्पणापुढे  येऊन बसला  । जटा साऱ्या एकत्र बांधूनी,   भस्म लाविले सर्वांगाला  ।। ओंकाराचा शब्द कोरला,   चंदन लावूनी भाळावरती  । रूद्राक्षाच्या माळा बांधल्या,   गळा हात नि शिरावरती  ।। वेळेचे भान विसरूनी,   तन्मय झाला रूप रंगविण्या  । प्रभू नाम घेत मुखानें,  नयन आतूर छबी टिपण्यां  ।। पवित्र आणि मंगलमय,  वाटत होते स्वरूप बघूनी  । […]

आधुनिक नवीन शिक्षाशास्त्र

केलेल्या अपराधाच्या गांभिर्याप्रमाणे शिक्षा त्याच प्रमाणात व्हावी हा आधुनिक विचार आहे. गुन्हेगाराचे पुनर्वसन करण्याकरता त्याचे सुधारीकरण जास्त महत्वाचे आहे. त्याला समाजातून दूर करणे योग्य नाही. आधुनिक विचारांचा पाठपुरावा शिक्षाशास्त्रज्ञ श्रीयुत बेकारिया, गॅरोफेलो फेरी, तारडे, बेंथाम यांनी केला. त्यामुळे आरोपीला कडक शिक्षा न देता त्याला सुधारणे आणि समाजात चांगला नागरिक तयार करणे या विचारांचा प्रचार केला. […]

मला भावलेला युरोप – भाग ४

लंडन आणि पॅरिस ही फार मोठी अशी राजधानीची शहरं. नितांत सुंदर रचना असणारी. कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं अशीच. तेवढीच व्यापारीकरणाची लागण झालेली. सुंदर रचनेच्या उत्तुंग इमारतींनी सजलेली,आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी झकपक. येथून आम्ही निघालो ते बेल्जियम ची राजधानी ,ब्रुसेल्स च्या दिशेने. तोही आरामदायी बसने.आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत. युरोपातील देश आकाराने आणि लोक संख्येने […]

लोकल

(चाल : झुक झुक झुक रेल गाडी) आली नशिबी रेलगाडी रेल कसली जेल गाडी – झुक झुक … दादर हारबर सी.टी. लोकल हिशेब येथे असतो पळपळ कुणी गुदमरे कुणी लटकते कुणी मारते उडी । – झुक झुक … कमला, विमला, अमला आली कुणी नवोढा कुणी अवघडली वृद्ध कोणी, षोडश वर्षा कुणी चंचल गुड्डी । – झुक […]

1 2 3 4 5 6 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..