नवीन लेखन...

मुक्या वेदना

प्रेमाच्या जुन्या आठवणीं आता सुन्या झाल्या आहेत अव्यक्त अश्या त्या वेदना आता मुक्या झाल्या आहेत माझ्या सुंदर अश्या जीवनातून तू का गेली ते कळलच नव्हतं तू नसलेल्या त्या गोष्टींमध्ये मन माझं कधी रमलच नव्हतं अडकलेल्या पाशातून स्वतःला मुश्किलीनं सोडवलं मी नव्या स्नेह बंधनात मनाला अगदी हलकेच गुंतवलं मी माझा तर प्रेमावरचा विश्वासच असता उडाला कोमल नव्या […]

तो

सहवास होता तुझा, सदोदित साथ देणारा…! संयम होता तुझा, माझे बोल झेलनारा…! जिद्द होती तुझी, नितांत प्रेम करण्याची…! तुझ माझ नातं कस्तुरीचं, एक थेंब सागरात मिसळलेलं….! एक थेंब सागरात मिसळलेलं….! – श्र्वेता संकपाळ

पंचपदी (लिमरिक)

आधी ‘पेपर’ होता ‘वीकली’ इलेक्शनआधी बनवला ‘डेऽली’ इलेक्शनसाठी झालं सिलेक्शन पण डिपॉझिट जप्त, हरला दणक्यानं नंतर त्यानं प्रिंटिंग-प्रेसच विकली . – सुभाष स. नाईक

प्रेम अर्ध्या वाटेवरचं

मागून जे मिळतं ते कवडीमोल ठरतं, अमूल्य असूनही, भावनांच्या कचाट्यात पडतं, थोडं झुलतं – थोडं डुलतं, थोड रडून पुन्हा हासतं, तरी मनाच्या हिंदोळ्यावर , निवांत बहरत असतं, प्रेम अर्ध्या वाटेवरचं, काट्यासारखं रुतून बसतं, कारण मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…! मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…! – श्वेता‌ संकपाळ

यशोगाथा

Ideal hero तुम्ही आमचे, नेहमी स्वाभिमानानेच जगलात, रात्रीचा दिवस केलात, पण परस्थितिसमोर नाही झुकलात!! तुमचा गौरव पाहुनी , आज मनही झाले तृप्त, जन्मदाते तूम्ही आमचे, शब्दही झाले सुप्त!! संस्कारांची दिली शिदोरी, त्यास गरजेची नाही तिजोरी, कर्तव्य पूर्ती करून यथांग, कधी खेळलीत बालपणीची लगोरी!! अभिमानाने मान उंचावली, आकाश आम्हा ठेंगणे झाले, आनंद गगनी भिडला आमचा, यशात मी […]

आशेची साऊली

ती दिसती दूर अंधुक छायेसी मूर्ती अतिरम्य पण मज ती दिव्य प्रतिमा गमती ते गंभीर”स्थित”वितरीतसे कृष्णकांती मनोहर दृश्य ते निम चांदण्या राती न नाव कुठले,गाव,नाही माहित कुठली जाती न दिसते त्या जाणिवांच भाव म्हणुनी राहती तिजपाहुनी असे वाटते आहेत गतजन्माची नाती मज भेटाया आलेली ती भूतकुळातील व्यक्ती असेल वा तो कोणी परलोकीचा देवदूत जो घेऊनि आला […]

फवारे हास्याचे – (4)

साहित्याचा चोर मी तरि साहित्यिक थोर मी थोर वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी पण लढतो  घनघोर मी  ।। -सुभाष स.नाईक

फवारे हास्याचे – (3)

पांडेजी बसले पंगतीला चेलेही होते संगतीला खाउन भरपुर पांडेजींनी ग्लास ग्लास रिचवले पाणी . ‘आता भरपेट जेवणार कसे? ’ एक चेला त्यांना पुसे. ‘पाणी शिंपडल्याने वरती खाली दबली जाते माती. तसेच पाणी पिऊन घडते दबते जेवण, जागा होते. आता पहा रिचवीन भराभर ताटातिल भाताचे डोंगर’. -सुभाष स. नाईक

फवारे हास्याचे – (२)

ग्लास भर whisky थेंबभर पाणी असे ग्लास मी सात-आठ  ‘हाणी’ त्यानंतर झाले आजार डॉक्टरने केले बेजार हे खा, ते घ्या,  हे नको कंटाळून गेली बायको तरी अजुन मी भरतो पेला ग्लासभर पाणी, थेंबभर हाला . – (हाला – मदिरा ‘हाणणें’ – भरपूर खाणें-पिणें  ) सुभाष स. नाईक

फवारे हास्याचे (१)

पाहत असतां सिनेमा ‘सिंघम’ अविरत चघळत होतो चिंगम हाणामारी दावी पडदा जोराने मी करी ओरडा गिळलें चिंगम, चिकटे गळ्यात धावत गेलो इस्पितळात . – (चिंगम – च्युइंग गम् ) सुभाष स. नाईक  

1 5 6 7 8 9 21
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..