नवीन लेखन...

मद्यानंद

साडेतीन मोहर्तातला पहिला गटारी अमावस्या , दुसरा शिमगा , तिसरा एकतीस डिसेम्बर आणि अर्धा एक जानेवारी . या मोहर्तावर थोडी का होईना घ्यावी असे ‘पिता मह दत्तू मामा ‘ यांची आज्ञा आहे . तसेच या प्रसंगी एखाद्यास तरी त्याची ‘दीक्षा ‘ जरूर देऊन हा ‘सम्प्रदाय ‘ वाढवण्यास साहाय्य भूत ठरावे , असेहि त्यांनी प्रतिपादन केले आहे . ‘दीक्षांताचा ‘ विधी पण त्यांनी आपल्या ‘मद्यानंद ‘ ग्रंथात लिहून ठेवला आहे . तो येणे प्रमाणे . […]

संगीताचे जादूगार ओ. पी. नय्यर

ओ. पी. नय्यर यांचे पूर्ण नाव ओंकार प्रसाद नय्यर. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२६ रोजी पश्चिम पंजाबमधील लाहोर येथे झाला. १९४९ मधे ” कनीज” या चित्रा पासून संगीतकार म्हणून कारकीर्द ओ.पी.नी सुरवात केली पण त्यांचे पहिले गीत गाजले ते चंद्रू आत्मा यांचे प्रीतम आन मिलो. ओपीना या गीतसाठी २५ रू इतके प्रचंड मानधन मिळाले. दलसुख पांचोली यांच्या “आसमान” या […]

टिप्पणी : इच्छामरण – विभाग -१

हल्ली इच्छामरण-दयामरण या विषयावर बरीच चर्चा चालूं आहे. यावर भारत सरकार एक कायदा करणार आहे, आणि सरकारच्या ‘फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट’नें दीड वर्षांपूर्वी या विषयाबद्दल जनतेकडून मतें मागवली होती. वेळी मीही त्या डिपार्टमेंटला, माझ्या इंग्रजी लेखाद्वारें , माझें मत कळवलें होतें. […]

हिंदी पटकथालेखक व अभिनेत्री हनी ईरानी

हनी ईरानी यांना डर, कोई मिल गया, और लम्हे साठी ओळखले जाते. त्या लेखक व अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९५५ रोजी झाला. हनी ईरानी या जावेद अख्तर यांची पहीली पत्नी आहेत. योगायोग हा की हनी ईरानी यांच्या वाढदिवसाबरोबर जावेद अख्तर यांचा पण वाढदिवस असतो. १९७२ मध्ये त्यांनी लग्न केले. फरहान अख्तर व जोया अख्तर ही […]

ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर

कविता, गाणी, शेर-शायरी, पटकथेचे ‘शब्दप्रभू’ आणि आपल्या लेखणीची रसिकांवर मोहिनी घालणारे ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. जावेद अख्तर यांचं नाव लहानपणी ‘जादू’ असं होतं. शायरीचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे आणि वडिलांनी लिहिलेल्या उर्दू शेरमधील एका वाक्यातून त्यांचं नाव निवडलं गेलं होतं. गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द त्यांनी […]

‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर

स्वरराज छोटा गंधर्व व पं. कुमार गंधर्व यांचे समकालीन असलेले परंतु फारसे परिचित नसलेले असे एक गंधर्व म्हणजे ‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर. ते गोमांतकात जन्मले. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे दीनानाथ, बालगंधर्व व कृष्णराव यांना गुरुस्थानी […]

बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गार्बो’ – अभिनेत्री सुचित्रा सेन

किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत. […]

जेष्ठ निर्माता-दिग्दर्शक कमल अमरोही

कमल अमरोही यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून, महल, पाकीज़ा, रज़िया सुलतान असे भव्य कलात्मक चित्रपट स्क्रीनवर दिले. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९१८ रोजी झाला. कमल अमरोही हे सर्वोत्तम गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी भारतीय चित्रपटसुर्ष्टीत खूप मोठे योगदान दिले आहे. कमाल अमरोही व मीनाकुमारीचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशीच एक दंतकथा. आणि त्यातील सारी […]

कलामहर्षी बाबूराव पेंटर

दादासाहेब फाळके यांनी सिनेमा कलेला जन्म दिला.  पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! त्यांचा जन्म २ जून १८९० रोजी झाला. ‘बाबूराव’ करवीर नगरीतील म्हणजे त्या काळच्या कोल्हापूर संस्थानातील एक असामान्य कलावंत! बाबूरावांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेतील त्यांचे असामान्य कौशल्य पाहून कोल्हापुरातील चाहत्यांनी त्यांचे नामकरण बाबूराव पेंटर केले. ते […]

लताकरंज/सागरगोटा

ह्याचे मोठे प्रसरणशील काटेरी गुल्म असते.खोड व फांद्यावर काटे असतात.पाने ३ सेंमी लांब पक्षाकार असून फुले फिकट पिवळ्या रंगाची मंजिरी स्वरूप असतात.खालचे फूल फळात रूपांतरित होते.फळ ६ सेंमी लांब,चपटे,काटेरी व आत १-२ बिया ज्याला आपण सागर गोटा म्हणतो त्या असतात.बिया गोलाकार,निळसर करड्या व कठिण आवरण असलेल्या असतात. ह्याचे उपयुक्तांग बीज असून ते चवीला तिखट,कडू,तुरट असून उष्ण […]

1 7 8 9 10 11 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..