नवीन लेखन...

नाटककार, दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर

कट्यार काळजात घुसली’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणणारे नाटककार, दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर हे नाट्य वर्तुळात दारव्हेकर मास्तर या नावाने परिचीत होते. अतिशय अभ्यासू,विचारवंत,आणि वक्तशीर असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. अनेक नाटकांना त्यांचे दिग्दर्शन लाभले होते. ते संगीत आयुष्यभर जगले आणि त्याची परिणति म्हणजे संगीत नाटक कट्यार काळजात घुसली. […]

सिंधुदुर्गातले सुपुत्र – “बाबी कलिंगण”

दळणवळणाची अपुरी साधने आणि शेतीवर पोट असलेल्या या कलावंतांने अखेरपर्यंत कलेची कास सोडली नाही. काही वर्षांपूर्वीच पडद्याआड गेलेले बाबी नालंग आणि बाबी कलिंगण हे दोन दशावतारी कलेचे शिलेदार होते. “श्री. बाबी कलिंगण यांना राज्यस्तरीय लोककला पुरस्काराने गौरविण्यात आले होते “.सिंधुदूर्गात दशावतारी म्हणजे ” रात्री राजा आणि सकाळी कपाळावर बोजा ” अशी स्थिती एके काळी होती. त्या वेळपासून लोककलेची सेवा हाच परमधर्म असे समजून हा कलाकार राबला त्याची शासनाने दखल घेतली हे बरं झालं. […]

अफझलखानाचा वध – भाग १

शिवराजांचा विजयरथ चौखूर उधळतच होता. त्यामुळे आता शिवाजीला रोखलाच पाहिजे असे आवाहन केले की, कोण रोखेल या शिवाजीला..? पण कोणीच तयार होईना.. तेवढ्यात एक सरदार उठला आणि बोलला “मै….! मै लाऊंगा.. शिवाजीको.. ! जिंदा या मुर्दा …!” सारा दरबार सुन्न झाला.., त्याचे नाव “अफझलखान” खरेतर ‘अफझल’ ही पदवी आहे त्याचे खरे नाव होते ‘अब्दुल्लाखान भटारी’ […]

कोकणातील ‘गावपळण !’ भाग १

धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांचा अमूल्य ठेवा गावांनी जपलाय. बर्‍याचदा रूढी आणि परंपरांमुळे गावांचे महत्त्व कमी झाल्याची टीका होते, पण या रूढी आणि परंपरांच्या पाठीमागे असलेल्या चांगल्या कल्पना, वागणूक, संस्कृती या महत्त्वाच्या बाबी विसरता येत नाहीत. गावाला शांतता लाभावी, सुख-समाधान लाभावे ही गावकर्‍यांची इच्छा त्यांच्या कृतीतून जेव्हा स्पष्ट होते तेव्हाच त्यांच्या परंपरांना एक वेगळा साज चढतो. अशीच एक धार्मिक परंपरा म्हणजे ‘गावपळण..!’ […]

ती बोल्ली

तू ‘ असं ‘  कर मी “हो” बोल्लो ती बोल्ली तू ‘ तसं ‘  कर मी “हो” बोल्लो तिने  बोल्ली तूने असं ‘ कामून ‘ केलं मिने बोल्लो “चुकलं” तिने  बोल्ली तूने असं कामून ‘नै’  केलं मिने बोल्लो “चुकलं” ती बोल्ली तूझ  ‘प्रेम’च  नाही बुवा माझ्यावर मी कळवळलो ‘असं नाहीये गं ‘ तिची अजुनी  आळी मिळी ‘हुप्प’ […]

‘वारी संसाराची’

कडकड भांडली अन तरातरा गेली बडवायला थंड्यानं ऐकलं अन लागला बेशरम हादडायला तिने राग काढला याने पोटात ढकलला ती केकाट हा मुकाट विठ्ठल रुख्माई वाट ती पाहते तहान भूक विसरून येऊ द्या कुणी गेला हा विसरून तिने कढ काढला याने कड लावली ती मुकाट हा सुसाट विठ्ठल रुख्माई ताटा खालचं मांजर करून नाचवते फार खरं करतो […]

माझे मन तुझे झाले !

माझे मन तुझे झाले नवनितावणी होते झाले ! बंध रेशमाचे त्यास मुलायम तंतूने विणलेले ! तुझ्या टपोऱ्या डोळ्यात मन माझे तुंतत जातं, वटारल्या डोळ्याने परत ते भानावर येतं ! माझ्या मनातील घालमेल तुझ्याही मनात होत होती! काय सांगावे किती सांगावे तुझ्या मुक्या संमतीने, मानाने सोडले मौन, बोलता तुझ्याशी एकरूप झाले केव्हा मन ! स्पर्शाने बऱ्याच गोष्टी […]

मन हिंदोळ्यावरी !

मन माझे हिंदोळ्यावरी बघते धरू आभाळ, विहरते किती उंच ठाऊक खितीज मृगजळ ! मना मनाच्या साखळ्या गुंतता गुंती गुंता, सोडविण्या त्या सगळ्या हैराण जीव पुरता ! मना मनाचे द्वैत भांडते आतल्या आत, भांड भांडूनिया भूस नकळे कशात अंत ! होण्या मन मोकळे फिरे गरगरा भोवर्यावाणी, पळे इकडून तिकडे, मग भटके रोनोमाळी ! मन गेले बुद्धीकडे विचाराव्या […]

पैलं …जे आसन ते

मरेंगे लेकिन किसीको मानलेली बहीण नहीं करेंगे! जे मजसंग हुलालतं ते पैली बार हुलालतं का हुलालता? कुणामुळं हुलालतं ? अन आकिरला झालं त झालं काय ? तेच समदं लिव्हलं हाय […]

1 3 4 5 6 7 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..