नवीन लेखन...

श्राद्धामागील ‘श्रद्धा’

या लेखातून संतांनी श्राद्ध करावं की नाही यावर प्रकर्षाने कटाक्ष टाकला आहे. ब-याच वेळेस श्राद्ध करावं की नाही हा लोकांसमोर प्रश्न असतो त्याचं उत्तर देणारा हा लेख. […]

पिंडी ते ब्रह्मांडी

हिंदू धर्म संस्कृतीला लाभलेलं देणं म्हणजेच हिंदू धर्मातील सणवार पण हेच सणवार कधी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर कधी बंधुत्व आणि प्रेमाचं प्रकटीकरण करण्यासाठी साजरे केले जातात. श्रावणातल्या सणासुदीची रीघ आणि गणेशोत्सवाची धामधूम संपली की, आपल्या पूर्वजांची आठवण काढणारा हा पितृ पंधरवडयाचा कालावधी सुरू होतो. हा पितृपक्षाचा काळ, त्यात केलं जाणारं पूर्वजांचं शास्त्रोक्त स्मरण, पितृपक्षाच्या अखेरच्या दिनी येणारी सर्वपित्री अमावस्या आणि तिचं महत्त्व यावर टाकलेला हा प्रकाशझोत. संतांच्या द़ष्टीतून श्राद्ध म्हणजे काय, तसेच या पक्षातील विविध तिथीवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख आहे. […]

घुसखोर की मुसलमान ?

अतिरेक्यांना धर्म नसतो, तसा तो घुसखोरांनाही नसतो, असं कुणाला वाटत नाही का? की म्यानमारमधून भारतात घुसलेल्या त्या घुसखोरांच्या आडून त्यांच्या ‘मुसलमान’ असण्याचं राजकारण केलं जात आहे? घुसखोर हा घुसखोरच असतो, असं कुणाच्या मनात कसं येत नाही. […]

शांत निद्रा

शांत अशा त्या मध्यरात्री, उंच पलंगी मऊ गादीवरी लोळत होतो कुशी बदलीत,  निद्रेची मी प्रतीक्षा करी….१, निरोगी माझा देह असूनी,  चिंता नव्हती मम चित्ताला अकारण ती तगमग वाटे,  बघूनी दिशाहिन विचारमाला….२, प्रयत्न सारे निष्फळ जावूनी,  निद्रा न येई माझे जवळी धूम्रपान ते करण्यासाठी,  उठूनी सेवका हाक मारली….३, बऱ्याच हाका देवून झाल्या,  परि न सेवक तेथे आला […]

स्मृति

जीवनाचा प्रवाह हा    भरला आहे घटनांनीं विसरुनी जातो  काहीं    काहीं राहती आठवणी  ।।१।। बिजे ज्यांची खोलवर    रुतुनी जाई त्या घटना देह आणि मनावर    बिंबवूनी जाई भावना  ।।२।। काळाचा असे  महिमा    आच्छादन टाकी त्यावरती परि काहीं काळासाठी    विसरुनी जातात स्मृति  ।।३।। प्रसंगी त्या अवचित    जागृत होती आठवणी पुनरपि यत्न होतो    जाण्यासाठीं त्या  विसरुनी  ।।४।। डॉ. भगवान […]

नक्की काय करावं?

कुणी नोंद घेतलीय की नाही हे कळायला काही मार्ग नाही, पण गेले काही दिवस एक जाहिरात इलेक्ट्राॅनिक मिडीयावर झळकतेय. ही जाहिरात आहे ‘सहारा श्री’ श्री. सुब्रतो राॅय सहारा यांची. तेच सुब्रतो राॅय सहारा, ज्यांच्यावर गुंतवणूकदारांचे हजारो करोड रुपये लुटल्याचा आरोप सिग्ध झालाय. त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना कारावासही भोगायला लागलाय. त्यातही त्यांचा आडमुठेपणा सुरुच होता. विविध कारणं दाखवून त्यांनी गुंतवणूकधारकांच्या पैशांतून खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तांचा लिलाव टाळण्याचे त्यांचे उद्योग सरु आहेतच. याला माज म्हणतात आणि हा माज सुप्रिम कोर्टाने बरोबर ओळखून त्यांना काट्यावर पकडलंय आणि कोर्ट त्यांना वेळोवेळी फटकारतंयही. […]

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर

२००० साली प्रदर्शित झालेल्या रिफ्यूजी या सिनेमातून करिना कपूरने आपल्या सिने करिअरची सुरुवात केली. करिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅमिली असलेल्या कपूर परिवाराशी संबंधित आहे. कपूर परिवाराचे भारतीय सिनेमाशी ८५ वर्षापासूनचे जुने नाते आहे. […]

कोकणातील ‘गावपळण’ ! भाग २

कोकणातील अनेक गावांमध्‍ये शेकडो वर्षांपासून चालत आलेली ‘गावपळणा’ची किंवा ‘देवपळणा’ची परंपरा आजही श्रद्धेने व आनंदी वातावरणात पाळली जाते. त्यामागे गावाचे सौख्य टिकवणे आणि गावक-यांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावे हा हेतू असावा. […]

नवरात्र – उत्सव सृजनाचा

आपले सर्वच महत्याचे सण ज्येष्ठ ते भाद्रपद या महिन्यांत येतात. हे चार महिने पावसाचे. आपला देश पुर्वापार कृषी प्रधान. आजही आपल्या देशातील बहुतांश शेती पावसावरच अवलंबून आहे. पावसाच्या या चार महिन्यांतच आपले सण का असावेत याचं उत्तर शेती आणि पाऊस यांच्या संबंधातच आहे. […]

बदलती पिढी

पिढी गेली रूढी बदलली,  बदलून गेले सारे क्षणा क्षणाला बदलून जाते,  मन चकित करणारे….१, सुवर्णाचे दाग दागीने,  हिरे माणके त्यात पिढ्यान पिढ्याचे मोल राहती,  श्रीमंतीचा थाट….२, चमचम आली तेज वाढले,  नक्षीदार होवूनी फसवे ठरले आजकालचे,  क्षणक जीवन असुनी….३, हासणारी ती फुले बघीतली,  आणिक इंद्र धनुष्य नक्कल करता निसर्ग कलेची,  दिसे त्यात ईश….४, ओबड धोबड बटबटती ते, […]

1 2 3 4 5 6 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..