नवीन लेखन...

पंख फुटता !

ते जातील उडूनी पंख फुटता   पाहत राहशील, डोळे भरुनी आजवरी जे प्रेम दिले तू   शक्ती त्याची उरी बाळगुनी माया, वेडी कशी असे बघ   वाटते तुजला तुझीच पिले ती हसून, खेळून बागड्तील  सदैव तुझ्या पदारा खालती जेंव्हा पडले पाउल पहिले   आधाराविण तुझ्या अंगणी नांदी होती दूर जाण्याची   तुजपासुनी त्याच क्षणी परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला   मायेचा तो पडदा असता टिपून घेशी अश्रू आज ते   परिस्थितीची जाणीव होता डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

प्रमुख आहारसूत्र – भाग १३

‘घुसळण्याची’ प्रक्रिया महत्वाची. दही ‘घुसळण्याच्या’ प्रक्रियेमधे आत तयार झालेला वायु बाहेर पडतो, नंतर त्यातील लोणी बाहेर येते. या प्रक्रियेमधे थोड्याफार प्रमाणात अग्निचा संचार होतो. घर्षण झाले की अग्नि तयार होतो. जसे खूप बोलल्यामुळे घसा गरम होतो, तळहात एकमेकांना घासले की हात गरम होतात, कपालभाती केली की छाती गरम होते, भ्रामरी केली की कपाळ गरम होते, खूप […]

आरोग्य म्हणी

१. खाल गाजर, मुळे तर होतील सुंदर डोळे. २. सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेले धान्य करावे फस्त. ३.डाळी भाजीचे करावे सूप, बाळाला येईल सुंदर रूप. ४. तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त ,आरोग्य तुमचे ती राखेल मस्त. ५.जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटाची वाजंत्री ६. पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड. ७.पालेभाज्या घ्या मुखी; […]

गायिका सुमन कल्याणपूर

सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांचा २८ जानेवारी १९३८ रोजी झाला. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली तितक्याच त्या प्रसिद्धिपासुन अलिप्त राहिल्या. सुमन हेमाडी हे नाव लग्नाआधीचे. रामानंद कल्याणपुर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्व परिचित झाल्या. मराठी भाव तसेच सिनेसंगीतात सुमन कल्याणपूर या गायिकेचे […]

सुधीर गाडगीळ यांचा गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यावरील लेख

सुप्रसिद्ध निवेदक, लेखक सुधीर गाडगीळ यांची खासियत म्हणजे नवनव्या चवी शोधणं, मनापासून खाणं आणि खाण्यावर बोलणं. त्यांचं ‘मानाचं पान’ हे पुस्तक म्हणजे आपल्या आवडत्या सेलेब्रिटींबरोबर मांडलेली पंगतच जणू. कलयांकित व्यक्ती काय खातात, त्यांच्या खाण्याच्या आकडीनिकडी याबाबत आपल्याला उत्सुकता असतेच. सुधीर गाडगीळ यांनी या विषयाला धरून घेतलेल्या खुसखुशीत मुलाखती लेख स्करूपात या पुस्तकात आहेत. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका […]

संरक्षणक्षेत्र भरीव तरतुदींच्या प्रतिक्षेत

‘गतवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षणक्षेत्रासाठीची तरतूद ४.८ टक्क्यांनी वाढली होती. गेल्या १० वर्षांतील ही सर्वांत कमी वाढ होती. पाकिस्तानसारखा देश जीडीपीच्या ३.५ ते ४ टक्के पैसे संरक्षण क्षेत्रावर खर्च करतो. चीनचे संरक्षण बजेट हे आपल्या संरक्षण बजेटच्या कमीत कमी तिप्पट आहे. भारताची सध्याची तरतूद जीडीपीच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. ती कमीत कमी तीन टक्क्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आज अर्थसंकल्पापैकी […]

प्रमुख आहारसूत्र – भाग १२

प्रमेह हा कफाशी संबंधित आजार आहे. कफ दोषाचं विकृत झाल्यानंतरचं नाव क्लेद. क्लेद वाढवणाऱ्या पदार्थामधे दह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.पण दही न आवडणारा प्राणी तसा दुर्मिळच. दही म्हटलं की फक्त एकच प्राणी नाखुश असतो, तो म्हणजे आयुर्वेद वैद्य. खरंतर त्याच्याही जीवावर येतं, दही खाऊ नका म्हणून सांगायला. पण काय करणार? जे सत्य आहे ते कोणीतरी शेवटी […]

जीवन परिघ

एक परिघ आंखले ,  विधात्याने विश्वाभोवतीं, जीवन फिरते ,  त्याचे वरती ।।१।। वाहण्याची क्रिया चाले,  युगानुयुगें ह्या जगतीं, कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा,  एकांच परिघात फिरती ।।२।। जेंव्हां कुणीतरी थकून जाई  दुजा उठोनी मदत करी, जीवन मरणाची शर्यत  जिंकण्यासाठीं लक्ष्य धरी ।।३।। मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी  नियंत्रित करी जगाला, परिघ सोडूनी जाण्यासाठीं  दिसत नसे मार्ग कुणाला […]

प्रेम म्हणजे…..

प्रेम म्हणजे चांगूलपणा कळणं असतं प्रेम म्हणजे सुखी स्व—जिवाला उगीचंच छळणं असतं ! प्रेम म्हणजे तिने हाय म्हणताच कळवळणं असतं प्रेम म्हणजे तिने बाय म्हणताच तळमळणं असतं ! प्रेम म्हणजे उगीचंच तिच्यामागे पळणं असतं प्रेम म्हणजे बोलायच्या वेळीच बोबडी वळणं असतं ! प्रेम म्हणजे खिसा रिकामा होईस्तोवर पिळणं असतं प्रेम म्हणजे अापण मित्रंच अाहोत हा मूग […]

स्वरभास्कर भीमसेन जोशी आणि मी

पांढरा शुभ्र सदरा ..लेंगा ..खांद्यावर शाल असा साधासा पोशाख असलेले भीमसेन जोशी सवाईच्या मंडपात जेव्हा सगळीकडे नजर ठेवून असत तेव्हा दरारा वाटे. […]

1 2 3 4 5 6 43
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..