नवीन लेखन...

पाऊस पहिला वळवाचा !

चाहूल पहिल्या वळवाची, मनात रिमझिम पावसाची, घोंग-घोंग वारे व्हायले, आकाशाने रंग बदलले !   पाऊस पहिला वळवाचा, मनात साठवून ठेवायचा, घन:शाम ढगांना घेऊन आला, आठवणींना उजाळा दिला !   पाऊस पहिला वळवाचा, अचानक धो-धो बरसायचा, डोंगर दर्यांना खुणवायचा, लता वेलींना हसवायचा !   पाऊस पहिला वळवाचा, बच्चे कंपनीच्या आवडीचा, कारण शाळेला दांडी मारायचे, पावसात मनसोक्त भिजल्याचे […]

ह्रदयाचा धोका टाळण्यास अजूनही उशीर झालेला नाही

तुमच्या कल्पनेपेक्षाही तुमचे ह्रदय क्षमाशील आहे– मुख्यत्वे करून प्रौढवयातील व्यक्तिंनी आरोग्य सुधारण्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले तर. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते कारण सर्वत्रच लठ्ठपणा फैलावताना दिसतोय. पूर्वीपेक्षा सध्याच्या व्यक्ति तरूण वयातच लठ्ठ होताना दिसतात आणि त्यामुळेच आशा व्यक्तीला त्याचे बरेचसे आयुष्य लठ्ठपणा बरोबर काढावे लागते. विशी, तिशी, आणि चाळीशीतील व्यक्ती जितकी दिर्घकाळ लठ्ठ राहते तितके […]

अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन – भाग २

माझ्या युनिव्हर्सिटी पासून, सू सेंटर १६०० मैलांवर होते. अमेरिकेत राहिलेल्या आणि रुळलेल्या लोकांच्या दृष्टीने, हा म्हणजे कारने दोन किंवा तीन दिवसांचा प्रवास. पण त्यावेळी माझ्याकडे गाडी नव्हती, त्यामुळे मी विमानाने जाणार होतो. अर्थात सू सेंटर हे अगदीच छोटं गाव असल्यामुळे तिथं जायला थेट विमानसेवा उपलब्ध नव्हती. सू सेंटरपासून साधारण तासाभराच्या अंतरावर सू सिटी हे ६५,००० लोकवस्तीचं […]

रामायण कथा – वाली पत्नी तारा – एक कुशल राजनीतीज्ञ

वाली पत्नी तारा, रामायणातील एक प्रखर व्यक्तित्व आहे. किष्किंधा नगरीची सम्राज्ञी तारा सौंदर्यवती तर होतीच, पण त्याच बरोबर वाकपटू आणि कुशल राजनीतीज्ञ ही होती. म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला रामायणातल्या सर्व स्त्रियांत सर्वात जास्त महत्व दिले आहे. वानर समाज पुरुष प्रधान होता. स्त्रिया केवळ भोग्य वस्तू. पतीच्या मृत्यू नंतर, त्याच्या भावाची अधीनता स्त्रीला स्वीकारावी लागत असे. इथे […]

गुळाची ढेप

आई सकाळीच म्हणाली, “चला चला बब्बड,लवकर लवकर आवरा. आज आपल्याला किनई वजन करायला जायचं आहे………………” आई आणखी पण पुढे खूप काही बोलली. पण नेमकी त्याचवेळी कुकरची शिटी इतकी जोरात वाजली, की आईचं बोलणं मला ऐकूच आलं नाही. मला कळेना “वजन करायचं म्हणजे नक्की काय करायचं?” ऑफिसला जाताजाता बाबा धावत-धावत आले आणि म्हणाले,’कशाला हवंय वजन नी भजन? […]

दोन बहिणी

तसा विचार केला तर त्या दोघी बहिणीच. एकाच घरात पण बाजू बाजूच्या खोलीत राहणाऱ्या. सकाळ झाली की त्या हातपाय ताणून आळस द्यायच्या. त्याचवेळी घरातून बाहेर डोकवायच्या. मग दिवसभर तशाच अवस्थेत दोघींच्या गप्पा आणि टिंगल टवाळ्या सुरूच. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांकडे त्या दोघी अगदी बारीक लक्ष ठेवायच्या. “हा कधी जातो? आणि तो कधी येतो? ही काय करते? आणि […]

1 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..