नवीन लेखन...

माणुसकी

कुणी नटसम्राट म्हणून गेले
मला घर हवंय घर,
इथे माणसाच्या आयुष्याला
लागलीय घरघर.
काँक्रिटचे या जंगलात
हरवलीय एक गोष्ट,
माणसा माणसातला
माणूस झालाय नष्ट.
चार घासांसाठी
प्राण जाती कुणाचे,
कुणी करी दान
उकिरडयाला अन्नाचे.
मुक्या प्राण्यांना
कुणी लावी लळा,
आपल्याच रक्ताचा
कुणी दाबे गळा.
कुणी करी मुस्कटदाबी
शक्तीच्या जोरावर,
कुणी भांडी खुर्चीसाठी
सत्तेच्या बळावर.
दाम करी काम
परी दाम होतो खोटा,
सर्व मिळूनही
कुणी कपाळकरंटा.
टीचभर जागेसाठी
कुणी होई बेघर,
महालात ही दिसे
इथे मोठे विवर.
कुणा अग्नी देण्या
असे बालक अजाण,
कुणा मातीत मिसळण्या
पडे माणसाची वाण.
इथे कुणास नाही
कुणाचीच पर्वा,
समजतो प्रत्येकजण
स्वतःला सर्वेसर्वा.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..