नवीन लेखन...

सणांचा महिना

या वर्षीचा हा ऑगस्ट महिना म्हणजे खर्याप अर्थाने सणांचा महिना म्हणता येईल. या एकाच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गोपाळकाला आणि श्री गणेश चतुर्थी इ. सण साजरे होत आहेत. भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्व सार्याल जगालाच परिचित आहे पण आज होत चाललेला भारतीय सांस्कृतीचा र्हातस हे सण साजरे करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल होण्यास कारणीभूत होत आहे. त्यातील काही बदल स्वागतहार्य तर काही बदल आक्षेपाहार्य आहेत. नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष नागाला दुध पाजून त्याची पुजा न करता त्याच्या प्रतिमेची पुजा करणे स्वागतहार्यच आहे त्यामुळे नागांच्याच जीवाचे रक्षण होणार आहे. हजारो वर्षापासून या सणांच्या माध्यमातून लोक निसर्गाबद्दलची त्याच्या आपल्या वरील उपकारा प्रतिची कृतज्ञता व्यक्त करीत आले आहेत पण ती करताना आपण वृक्षतोडीमुळे, आपण वापरत असलेल्या सुखसाधनांमुळे आणि प्रगतीच्या नावाखाली उभारलेल्या प्रकल्पांमुळे निसर्गाची जी अपरिमित हानी होत आहे त्याकडे मात्र सोयिस्करपणे काना डोळा करतो. नागपंचमी हा सण साजरा करताना आपण निसर्गाचे जतन आणि संरक्षण कराण्या बाबतची आपली जागरूकता दाखवायला हवी .

त्यानंतर येणारा रक्षाबंधन हा सण आजही आपल्या देशात मोठ्या उत्साहाने जवळ- जवळ सर्वच जाती- धर्मात थोड्या फार फरकाने साजरा केला जातोय. हा सण साजरा करण्याच्या स्वरूपात फारसा बदल झालेला नाही. फक्त भावानी ओवाळणी म्हणून देण्याच्या भेट वस्तूत बदल झालेला आहे. आजची बहिण पुर्वीच्या बहिणीसारखी भावाकडून तिच्या रक्षणाची अपेक्षा करीत नसेल पण तरीही आपल्या भारतीय संस्कृतीसाठी भावाने रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला दिलेले तिच्या रक्षणाचे वचन आयुष्यभर पाळायलाच हवे. सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात नातेसंबंधातील बंध नाजूक झालेले असताना भावा- बहिणीच्या नात्यातील बंध, गोडवा आणि प्रेम टिकून रहावे म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीची देण असणारे हे सण महत्वाची भूमिका बजावतात. रक्षाबंधनासारख्या सणांमुळेच काहीही नाते नसणारे ही कधी कधी भावा – बहिणीच्या नात्यात बांधले जातात आणि ते त्या नात्याचा आयुष्यभर आदर राखतात. एका धाग्याने नाते निर्माण करून ते आयुष्यभर जपण्याची शिकवण देणारा रक्षाबंधनासारखा सण जगाच्या पाठीवर फक्त भारतीय संस्कृतीतच साजरा होऊ शकतो. या अशा सणांच आपल्या जीवनातील महत्व यकिंचितही कमी होता कामा नये. बहिणीला भावाच्या मदतीची गरज फक्त तिच्या रक्षणासाठीच नसते तर जीवनात अनेक संकटे आणि समस्या येत असतात तेंव्हा मानसिक आधाराची गरज असते तेंव्हा भाऊ- बहिणच एकमेकाच्या कामी येतात हे ही दुर्लक्षित करून चालणार नाही.

15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन तो ही आपण सणासारखाच साजरा करतो. हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करताना स्वातंत्र्याबरोबर आपल्याला वाट्याला आलेल्या कर्तव्याचे आपण स्मरण करतो का ? स्मरण करीत असतो तर आपला देश आज असा भ्रष्टाचाराच्या किडिने पोखरलेला नसता. आपण सर्वांनी स्वातंत्र्य दिन सण म्हणून आनंदाने साजरा करताना भ्रष्टाचारूपी राक्षसाला ठेचून मारण्याचा संकल्प करायला हवा तरच आपल्याला खर्याट अर्थाने स्वातंत्र दिन साजरा केल्याचा आनंद मिळेल. स्वातंत्र्य दिनाच्या दुसर्यार दिवशी देशाच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिमा इकडे- तिकडे पडलेल्या दिसतात ते होता कामा नये. एक दिवस राष्ट्रीय ध्वज आपल्या छातीवर लावून मिरवून झाल्यावर दुसर्याल दिवशी तो ध्वज व्यवस्थित सुरक्षित जागेवर ठेवण ही आपली नैतिक जबाबदारी नाही का?

त्यानंतर येणारा गोपाळकाला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई सारख्या शहरात या उत्सवाच्या निमित्ताने एका दिवसात करोडोची उलाढाल होते. हा एक दिवस लोकांच्या मनात वर्षभरासाठीचा जल्लोश उत्साह निर्माण करून जातो. कित्येक व्यायामशाळा या उत्सवची वर्षभर वाट पाहत असतात. उंचच उंच मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी होणारी स्पर्धा स्वागतहार्यच आहे पण उंचच उंच मानवी मनोरे रचण्याच्या नादात सुरक्षिततेकडे डोळे झाक करणे सर्वस्वी चुकीचेच आहे. कोणताही सण हा कोणाच्या ही जीवापेक्षा महत्वाचा कधी ही नसतो. उत्सव हा जीवनाचा भाग आहे उत्सव जीवनासाठी आहेत जीवन उत्सवासाठी नाही हे विसरून चालणार नाही. प्रत्येक सण हा लोकांनी आपल्या जीविताचे आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेला अधिक महत्व देऊनच साजरे करायला हवेत.

या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी येणारा श्री गणेश चतुर्थी हा सण हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण समजला जातो जो घरा – घरात आणि सार्वजणिक रित्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या सणाचा आनंद लुटण्यासाठी अगदी जगभरातून पर्यटक महाराष्ट्रात येत असतात. या उत्सवाच्या निमित्ताने आजच्या कलियुगातही लोकांची देवावर नितांत श्रध्दा आहे याची खात्री पटते. आजही लोकांच्या मनात थोडा बहोत चांगुळ्पणा देवभोळेपणा शाबूत आहे तो या अश्या सणांमुळेच हे सत्य नाकारता येणार नाही. देवासाठी आपल्या रोजच्या कामातून थोडा वेळ काढून त्याच्या भक्तीत लीन होण्यास भाग पाडणारा हा सण लोकांना अपरिमित मनशांती देऊन जातोच त्याच सोबत त्यांना जीवन जगण्यासाठी एक नवीन उत्साह नवीन प्रेरणा ही देऊन जातो. जोपर्यत आपल्या देशात आपल्या भारतीयसंस्कृतीने आपल्याला देणगी स्वरूपात दिलेले हे सण साजरे होता आहेत तो पर्यत आपल्या भारतीय संस्कृतीच्या अस्तित्वाची काळजी करण्याची आवश्यकता नाही…

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..