नवीन लेखन...

श्री गुरुचरित्र जसे आहे तसे

ग्रंथराज श्री गुरुचरित्र आता गद्यस्वरूपात

सर्वसामान्य भाविकांसाठी उपलब्ध

अनेक वर्षांपासून वाङ्‌मय निर्मितीत बऱ्याच तात्त्विक, ऐतिहासिक, चारित्र्यपर साहित्य निर्माण होत असल्याचे आपल्याला आढळून येते. वेदांसारख्या अपौरुषेय वाङमयापासून प.पू.व्यासांच्या पुराणापर्यंत बऱ्याचसे सैधांतिक वाङ्‌मयाची निर्मिती झाली आणि काही वर्षे असे वाङ्‌मय मौखिक किंवा कंठस्थ राहिले. व्यासांनी लिहिलेल्या पुराण वाङमयातून अशाच काही सिद्धांतांची माहिती दिली. श्रीमद्‌भागवताचे द्वितीय स्कंधातून अशा तऱ्हेच्या पुराण ग्रंथातून सामान्य सृष्टी, विशेष सृष्टी संरक्षण, सृष्टिपोषण, कर्म वासना, निरनिराळ्या मन्वतरातील आचार धर्म, परमेश्र्वरी लीला, सृष्टिसंहार, मोक्ष आणि ईश्वरस्वरूप इत्यादी दहा विषयांचे वर्णन आले आहे. पुराण ग्रंथातून हे वर्णन कथा रूपाने केलेले आढळते; निरनिराळ्या कालखंडांतून लोकांच्या आकलन शक्तीत बदल होत गेल्याचे आढळते परंतु विशिष्ट सिद्धांतांविषयीची आस्था मात्र काही जणांची कायम राहिली. अशावेळी ङ्कपोथी वाङ्‌मयाचाङ्ख प्रकार सुरू झाल्याचे आढळून येते. हरिविजय, रामविजय, नवनाथभक्तीसार इत्यादी ङ्कपोथ्याङ्ख हळूहळू निर्माण होत गेल्या. अजूनही ही प्रथा सुरू आहे. अशा तऱ्हेची आवड हळूहळू अनेकांमध्ये निर्माण झाल्याने असे ग्रंथ ओवीबद्ध रचण्याचीही प्रथा सुरू झाली. अगदी श्री ज्ञानेश्वरांनी श्रीमद्‌भगवतगीतेवर भाष्य लिहून सर्वसामान्यांना गीतेतील तत्त्वज्ञान उघड करून दाखविले. हळूहळू काव्याची आवडही लोकांमधून कमी होत आहे, असे आढळून येते. काव्यामधील छंदशास्त्र, अलंकारशास्त्र इत्यादींचा लोप होत असल्याचे आढळून येत आहे. अशा वेळी काही महत्त्वाच्या तत्त्वांची ओळख, काही चरित्रांविषयीची माहिती ही गद्यामध्ये स्थानिक भाषेतून लोकांपर्यंत पोहचणे अत्यंत आवश्यक वाटते. बऱ्याच ग्रंथांचे भाषांतर हळूहळू होत आहे सर्वसाधारण माणसापर्यंत अशी माहिती पोहचत आहे, ही समाधानाची बाब आहे.

याच प्रथेतून नागपूरचे श्री. बाळ वामनराव पंचभाई यांनी गुरुचरित्र गद्य वाङ्‌मयाद्वारे लोकांपर्यंत पोहचविण्याचा जो प्रयत्न केला तो खरोखरच स्तुत्य आहे. त्यांनी अनेक वर्षे प्रयत्न करून सर्वसामान्य मराठी लोकांपर्यंत त्यांना समजू शकेल अशा भाषेत हे चरित्र गद्यस्वरूपात पोहचविले, याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.

असे ऐकिवात आहे की, ही मूळ पोथी पूर्वी कन्नड भाषेत होती. पुढे ती मराठी ओवीबद्ध स्वरूपात लोकांपर्यंत आली. श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज, श्री गांडा महाराज, श्री रंगाअवधूत महाराज यांनी निरनिराळ्या प्रांतांतून दत्तसंप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. हा सर्व संप्रदाय गुरुचरित्राच्या माध्यमातून वर्णन केलेल्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांना दत्तावतार मानतात. गुरुचरित्रातून त्यांच्या जीवन चरित्राचा बराचसा भाग आलेला असल्याने हा ग्रंथ अत्यंत पवित्र व मंत्रमय ठरला आहे, असे समजण्यास हरकत नाही. श्रद्धावान सांप्रदायिक व्यक्तींनी या ग्रंथाची एकामागून एक बरीच पारायणे केलेली आढळते. या श्रद्धेपोटी या ग्रंथाचे पावित्र्य कायम ठेवावे म्हणून काही ङ्कउपासना पद्धतीङ्ख ठरवून दिल्या असाव्यात. त्यात हा ग्रंथ सोवळ्यात वाचावा, पारायणात उपवास ठेवावा, रात्री दर्भासनावर (चटईवर) झोपावे, स्त्रियांनी हा ग्रंथ वाचू नये इत्यादी अनेक अटीही लावल्या गेल्या. त्यामुळे ह्या ग्रंथाचा अभ्यास बाजूला राहून श्रद्धेचे ऐवजी अंधश्रद्धाच निर्माण झाली.

तसे या ग्रंथातून गाणगापूर तीर्थ स्थळ माहात्म्य, काशी विश्र्वेश्र्वर माहात्म्य इत्यादी अनेक यात्रा स्थळांची बरीच उपयुक्त माहिती आहे. अनेक व्रतवैकल्यांबद्दलची माहिती आहे. अनेक कथांची माहिती आहे. ही सर्व माहिती सर्वसामान्य व्यक्तींना मिळाल्यास काय हरकत आहे ? स्मृतींनी वर्णन केलेल्या आचारधर्माची माहितीही ह्या ग्रंथातून मिळू शकते. अशी माहिती मिळाल्याने लोकांची धार्मिक वृत्तीही बदलू शकते. फक्त या पोथीतील अध्याय 36-37 यात नित्यविधीबद्दल जी माहिती आहे ती फक्त विशिष्ट अभ्यास केलेल्या वर्गातील जाणकार लोकांकरिता आहे. त्याचे आकलन सर्वसामान्यांना एकदम होणार नाही. नित्यकर्मामध्ये वापरावयाच्या मंत्रातील फक्त सुरुवातीचा शब्द देऊन या मंत्राने अमुक कर्म करावे, असे येथे नमूद केलेले आहे. कदाचित हा पूर्ण मंत्र सर्वच सांप्रदायिक श्रद्धावंतांना माहीत नसेल आणि पारायण करताना त्या मंत्राने मार्जन करावे इत्यादी ओव्या तशाच म्हटल्या जात असाव्यात; परंतु याचा अर्थ नित्यकर्माची अंगे मंत्र म्हटल्याशिवाय करूच नये, असा नाही. मंत्राचा शोध घेऊ म्हटल्यास हे सर्व मंत्र पूर्णपणे औपनिषदिक आहेत व ते सापडू शकतात. त्यामुळे श्री गुरुचरित्राच्या पोथीतून श्री गुरूंनी शिष्याला आचरणाविषयी जी माहिती दिली ती गद्यरूपाने वाचल्यास सर्वसामान्यांना त्याबद्दल माहिती मिळेल. सांप्रदायिक तथा इतरांनीही हा ग्रंथ संग्रही ठेवून सतत वाचत रहावा, असा आहे.

काव्याच्या बाजूची माहिती नसतानाही गद्यरूपाने या पुस्तकातून (पोथी) बरीच उपयुक्त माहिती ङ्कजसे आहे तसेङ्ख लोकांपुढे मांडण्याकरिता श्री. बाळ पंचभाई यांनी जे प्रयत्न केले व अखंड 20 वर्षे तपस्याही केली. त्यामुळे ईश्र्वर त्यांना त्याचे फळ देईलच. आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या त्यांना सदिच्छा व ईश्र्वराजवळ प्रार्थना की आजच्या काळात असे वाङ्‌मय निर्माण करण्याची सद्‌बुद्धी अनेकांना देवो.

उत्तम जाड मॅपलिथो, पांढरा शुभ्र कागद, मजबूत कडक पुठ्ठा बांधणी, बहुरंगी मुखपृष्ठ, सविस्तर अनुक्रमणिका, भरपूर परिशिष्टे आदींमुळे या ग्रंथाचे संग्राह्य मूल्य निश्चितच वाढले आहे.

नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने अशा पुस्तकांचे प्रकाशन करून ङ्कग्रंथ संपदेतङ्ख भर टाकल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.

पुस्तक : श्री गुरुचरित्र ङ्कजसे आहे तसेङ्ख

लेखक : बाळ वामनराव पंचभाई, पृष्ठ : 384, किंमत : 400 रु.

नचिकेत प्रकाशन,24, योगक्षेम ले-आऊ ट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर -440 015.

टेलीफॅक्स : 0712 – 2285473 (: 6536653, 6535167, भ्र. 9225210130

— मराठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..