नवीन लेखन...

ये है बम्बई मेरी जान !!!

 
मी नेहमी मुंबईला कामाला येतो . पहिल्या दिवशी VT स्टेशन पाहून छाती दडपून गेली होती. त्या नंतर प्रत्येक वेळी या स्टेशन वर उतरलो की असेच होते. आज ही या स्टेशन च्या भव्यतेची बरोबरी भारतातील कोणते ही स्टेशन करू शकत नाही. आज तर स्टेशन बांधले की महिन्याभरात त्याचे नुतनीकरण सुरु होते. पेव्हर चे अर्थकारण आणि राजकारण फार मोठे आहे. कायद्याने रस्त्यावर पेव्हर टाकणे बंद करावे. बेलार्ड पिअर, ते लायन गेट किंवा प्रिन्स ऑफ वेल्स पर्यंत, डॉक यार्ड रोड.. हा विभाग तर अत्यंत रमणीय आहे. येथे आल्यावर भारतात आहे असे जाणवत नाही. गर्दीत ही रमतगमत फिरण्यास येथे मजा येते.

मुंबई या नावाचा दबदबा भारतात फार मोठा आहे. महाराष्ट्र बाहेर परराज्यात गेलो की कोठे राहतात विचारले की माझे गाव ते कोठे आहे कस आहे हे सांगत बसण्या पेक्षा सरळ मुंबईत राहतो म्हणुन सांगतो. समोरचा माणूस आदराने तुमच्या कडे पाहत अर्धा खल्लास होतो. एव्हढी जादू या नावाची आहे. मध्यरात्री उशीरा मराठी नाटक/सिनेमा पाहून रस्त्याने एकट्या जाणाऱ्या स्त्रियांचे उत्तर भारतीयांना विशेषता:ह दिल्ही च्या नागरिकांना भलतेच आश्चर्य आणि कौतुक वाटते. हे मी स्वतः अनेकदा अनुभवले आहे.

CID मधील बदरुद्दीन जमालुद्दीन काजी उर्फ़ जॉनीवॉकर जे मुंबई मध्ये बस कंडक्टर होते आणि ज्यानी मुंबई चे जीवन स्वत: अनुभवले होते. बस मध्ये टिकिट काटता काटता लोकांचे मनोरंजन करत करत एक दिवस हिंदी सिने जगात प्रवेश करते झाले. येथे कधी कोणाचे नशीब उजळेल हे सांगता येत नाही तसे कधी रावाचा रंक होईल हे ही सांगता येत नाही. CID मध्ये त्यानी मुंबई वर गायलेले गाणे आज ही ताजे वाटते. आणि तेच गाणे मुंबईची खरी

ओळख आहे.

कहीं बिल्डिंग कहीं ट्रामे, कहीं मोटर कहीं मिलमिलता है यहाँ सब कुछ इक मिलता नहीं दिलइन्साँ का नहीं कहीं नाम-ओ-निशाँये है बम्बई मेरी जान

— ठणठणपाळ परभणीकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..